- Последний пост
- 29 дек.
- Последнее чтение
- 14 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- und
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
🔥विद्यार्थ्यांच्या मागणीपेक्षा ही शासनाची स्वतःची जबाबदारी असावी !!! यालाच तर ' Good governance' म्हणू शकतो🔥 👉Combine पूर्व 2025 असेल किंवा राज्यसेवा पूर्व 2025 या दोन्ही परीक्षांच्या जाहिराती त्यांच्या मागील जाहिरातीच्या कालावधीच्या तब्बल दीड ते दोन वर्षे उशिरा आल्या व 2024 हे वर्षं कोणत्याही जाहिरातीविना गेले. 👉त्यामुळे वर्ष 2024 मध्ये वयाची अट पूर्ण करणाऱ्या मुलांना केवळ जाहिरात उशिरा आल्यामुळे एक तर फॉर्म भरता आला नाही किंवा खुल्या प्रवर्गाच्या पदांना मुखावे लागत आहे. 👉जाहिरात उशिरा येणे किंवा एखाद्या पूर्ण वर्षात जाहिरात न येणे यात विद्यार्थ्यांची कोणतीही चुकी नसून अशा वेळी विद्यार्थ्याची वयाची अट ठरवताना मागील वर्षाची ठरवून याबाबत योग्य तो न्याय MPSC आणि राज्यशासनाने द्यावा हीच अपेक्षा.
नुकतीच कॉलवर मिळालेल्या माहिती नुसार असे समजले आहे की, या विषयावर वरिष्ठ पातळीवर बैठक झालेली आहे. आपल्या PSI वयवाढीच्या मुद्द्याची तीव्रता संबंधित सर्वांना पूर्णपणे समजलेली असून, तो विषय गंभीरपणे विचाराधीन आहे. 👉 सध्या काम अंतिम टप्प्यात आहे. निर्णय पुढील एका तासात आला तर येईल, अन्यथा उद्या थेट GR जाहीर होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत शांत राहून सकारात्मक अपेक्षा ठेवूया. 🙏 एकजूटचा 🤝 विजय नक्कीच होईल .. . . सर्वानी सकारात्मक रहा. ————————————— — GDC Sir | GDC ACADEMY ————————————— Join : https://t.me/GDCAcademy Join : https://t.me/GDCAcademy
видео или голосовое, без подписи
2024 ला GAD ने MPSC कडे सुरुवातीला फक्त PSI पदासाठी वयोमर्यादा वाढवली होती तर आयोगाने सर्व पदे एकत्रित COMBINE असल्यामुळे सर्व पदांसाठी वयवाढ लागू करावयास सांगितली होती.. त्यामुळे फक्त पीएसआय पदासाठी वयोमर्यादा वाढवता येणार नाही संपूर्ण गट ब च्या सर्व पदांसाठी वयोमर्यादा वाढवावी लागेल.. हा GR गेल्या वेळेस आपण नागपूरला जाऊन घेऊनच आलो होतो. ————————————— — GDC Sir | GDC ACADEMY ————————————— Join : https://t.me/GDCAcademy Join : https://t.me/GDCAcademy
https://x.com/targetprashasan/status/2005511578037497974?s=20
मित्रांनो... टेलिग्राम वरील गट-तट तुम्हाला माहीत झाले असतीलच, प्रचंड धमाल असती ह्या लोकांची, काय यांचे भांडण असतील कोणास ठाऊक. पण भावकीत तेवढे भांडण नसतील एवढे यांच्यात आहेत. कायम एकमेकांची काढत असतात ( बिन पाण्याची ) . बर यातलं प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही सगळं ( विश्व ) चालवतो, विद्यार्थ्यांचे हित म्हणजे आमचं अंतिम कर्तव्य, बाकी कुणाला काही कळतं का माहित नाही पण यांना सगळ्यात जास्त कळतं ( यांचा गोड गैरसमज ) काय तो विक्षिप्तपणा, वैफल्यग्रस्त असल्यागत सतत बरबळने, बेंबीच्या देठापासून नुसत्या *गीरी करणे, हेवेदावे, आरोप-प्रत्यारोप, माझीच *ल, सतत एकमेकांवर कुरघोडी करणे असे एक ना अनेक उद्योग सतत चाललेले असतात. यांचे डायलॉग तर प्रचंड फेमस... सर नाही ऐकणार... पोरं आता राडा करणार. कुणीतरी उठून हळूच म्हणतो, "उचल घेऊन काम करणाऱ्या टोळ्या " एक ना अनेक. सगळ्यात अगोदर... सगळ्यात विश्वसनीय अशा या स्वरूपात नेमक तुम्ही काय सादर करताय हा सतत पडलेला प्रश्न ? समाज माध्यमात ताकद आहे हे विसरता कामा नये पण त्याचा वापर तुम्ही किती घाणेरडे पद्धतीने करतात हा कायम प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात कधी नाही ती एवढी अस्थिरता निर्माण झाली ती फक्त टेलिग्रामच्या वैफल्यग्रस्त ऍडमिनच्या नालायक वृत्तीमुळे. कोविड पूर्वीच्या सगळ्या परीक्षा एकदा बघा, परीक्षापद्धती, ती राबवणारी यंत्रणा आणि सुरळीत पार पडणाऱ्या परीक्षा. कदाचित एखादी जाहिरात मागेपुढे होते असेल पण परीक्षा हमखास होत होत्या. कोविड नंतर वैफल्यग्रस्त आणि भरकटलेल्या बिनडोक माकडांची संख्या जास्त झालेली आहे, ह्या रिकामटेकड्या आणि सतत अस्थिर मानसिकतेतून जन्माला आलेल्या खुळचटांची मनोवृत्ती कायम अस्थिरता आहे. यांच्यावर बऱ्याच दिवसापासून लिहिण्याचा विचार होता परंतु कायम दुर्लक्ष करत आलोय. ( तडाख्यात ते कधी सापडले नव्हते ) आणि या अशा टेलिग्राम ला जोडणाऱ्या नालायक मेंबरच्या सुद्धा कानपट्टा हाणाव्या वाटतात, तुम्ही एवढ्या अस्थिर वातावरणात अभ्यास कसा करू शकतात हा मोठा प्रश्न आहे, जर तुम्ही एक पान धड नीट वाचू शकत नसाल, सतत पडणाऱ्या नोटिफिकेशन कडे तुमचा लक्ष जात असेल तर एकदा तपासून पाहायला पाहिजे. तुमच्या नाकर्ते पणामुळे सुद्धा बऱ्याच गोष्टी घडतात, हेही लक्षात असू द्या. नाही किंबहुना तुम्ही त्याला खतपाणी घालता. एकदा तुम्ही विचार करा अशा टेलिग्राम च्या माध्यमातून तुम्ही काय साध्य करताय. यापूर्वी विद्यार्थ्यांना फोन कुठे पडला हे माहित नसायचं, फार फार तर जेवणाच्या वेळेला कधीतरी फोन हाताला दिसायचा, आज प्रत्येक टेबल गणित फोन सतत चालू असतो. ( ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा हा कहर असेलही ) तुम्ही कुठल्या विचारधारेच्या आहात हे त्यातून स्पष्ट जाणवतं. त्यामुळे वेळी सावध व्हा...! टीप: - ज्याला हा मेसेज झोंबला त्याने तत्काळ टेलिग्राम लेफ्ट करावं आणि खुशाल तिकडे * असो... शहाण्यांना शब्दांचा मार, बाकी निर्लज्जांचे साम्राज्य सदा भरभराटीस येवो...
⭐✅सत्यता... ✅⭐ ⭐बऱ्याच लोकांचं मत आहे की फक्त पेपर आल्यावर च का वय वाढ वगैरे ह्या गोष्टी का आठवतात... 👉👉तर पेपर जवळ आल्यावर च पोर जागे नाही झाले❌❌ मुले 6 महिन्या पासून प्रयत्न करताय✅✅ आणि मुळात ह्या विषयाची file मागील 3 महिन्यात 2 वेळा CM साहेबानं पर्यंत जाऊन आली आहे... ✅✅✅ हे बाहेर कोणाला सत्य माहित नाही... त्यामुळे रास्त मागणी आहे... प्रयत्न करताय त्यांना करू द्या 🙏🏻🙏🏻🙏🏻 ✅🙏🏻👉सर्वसमावेशक न्याय 💯✅🙏🏻 @dreammpsc14
नगरपरिषद/नगरपंचायत गट क व गट ड सरळसेवा जाहिरात बद्दल अधिकृत संकेतस्थळ वर सर्वप्रथय टॅब तयार केला जाईल व लोकमत संपूर्ण जिल्ह्यात जाहिरात प्रसिद्ध होईल ✅ बाकी जिल्हा वेबसाइटवर पण ही जाहिरात प्रसिद्ध होईल.. जागा - 3138+ (जागा वाढ किंवा कमी जागा होतील) आता जाहिरात कधी? पेपर कधी? कोण परिक्षा घेणार? काही नगरपरिषद/नगरपंचायत ने अजूनही संपूर्ण माहिती स्पष्ट दिली नाही बेलापूर मुंबई ऑफिस ला म्हणून जाहिरात अजून आलेली नाही... आणि बाकी टेलिग्राम वाले उगाच काहीतरी टाकू नका लवकरच, उद्या, परवा असा टाईमपास करु नका... अभ्यास करा🙏🏻 @dear_mpsc
📌माझे मित्र वरिष्ठ अधिकारी CMO कडून मिळालेल्या माहिती नुसार CM सरांकडून Green Signal भेटला आहे. फक्त आपल्यापैकी काही लोकांनी ३ वर्ष चा विषय पाठवल आहे आणि आपला विषय १ वर्षाचा आहे. मित्रांनो आपलं काम होणार आहे GR १००% येणार आहे. फक्त दोन दिवस संयम ठेवा आणि थोडंसं पुश करा. सोमवारी GR येणार 👍👍👍 GondalGanesh ✍ 🍂🍂🍂🍂🍂🍂
⭐Psi वयवाढ साठी जी टीम जीवाचा रान करून प्रयत्न करत आहे.. त्यांना सपोर्ट करायलाच हवा.. 🙏🏻🙏🏻🙏🏻 ✅⭐Support PSI वयवाढ ✅🙏🏻
AMVI 2025 आणि लिंक ओपन या संदर्भात, point number 4.4 & 4.5 वाचून घ्यावा. त्यामुळे आयोग कोणत्याही अडचणी शिवाय 2025 च्या गट क मध्य AMVI समावेश करू शकतो.
💥💥💥💥🔥🔥🔥🔥 ♦️१८ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार MPSC च्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) वर्ग करण्यात आलेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सध्या सुमारे २८४ कॅडर MPSC मध्ये समाविष्ट करण्याचे काम सुरू आहे. उदाहरणार्थ – PSI हा एक स्वतंत्र कॅडर आहे, STI हा वेगळा कॅडर आहे. याच पद्धतीने एकूण २८४ कॅडर जोडले जात आहेत.☑️☑️👍👍 हे संपूर्ण काम पुढील ३ ते ४ महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 🔥🔥यानंतर येणाऱ्या गट-ब आणि गट-क च्या जाहिराती MPSC च्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जाहिराती असतील.💥💥 ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण होत आहे ✅ 👉 लक्षात ठेवा – ही MPSC च्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रिया ठरणार आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻✅🔥🔥🔥
✅⭐आरोग्यसेवक नवीन सेवा प्रवेश नियम..✅⭐ 👉17 डिसेंबर चा शासन निर्णय..✅✅
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://x.com/BaliramDoleyINC/status/1971437727036985585?t=ObZOuW7l-iE09yyFMoETnw&s=35
नगर विकास सुधारित अकृतीबंध.pdf
Harsh Reality Of Opting Out🤐 1. XYZ (सध्या कार्यरत ASO, 2023) 2. ABC (सध्या कार्यरत ASO, 2023) वरील दोन्ही महिला अधिकारी यांचे waiting list मधून STI 2023 पदी देखील निवड झाली आहे. यापैकी ABC यांनी STI 2023 साठी documents verification देखील केले आहे आणि लवकरच त्याची joining देखील येईल. नुकत्याच जाहीर झालेल्या Combined 2024 च्या तात्पुरत्या निवड यादीत XYZ यांची STI म्हणून निवड झाली आहे तर ABC यांची देखील अंतिम निवड यादीत STI पदी निवड निश्चित आहे. म्हणजे दोन्ही महिला अधिकाऱ्यांची याअगोदर ASO आणि STI अशा दोन्ही पदांवर निवड झालेली आहे आणि पुन्हा एकदा त्याच पदावर निवड होत आहे. XYZ यांना opting out बाबत विनंती केली असता त्यांनी positive response दिला. ABC यांनी तर ASO पदी कार्यरत असताना, महिनाभर पूर्वी STI 2023 चे document varification केले हे समजले. त्यांना 2024 STI merit list मधून opting out करायला विनंती केली असता त्यांनी नकार दिला. म्हटल्या 2023 chi STI ( जे 1 महिनाभर पूर्वी DV केलं होतं) मी join करणार नाही. 2024 मध्ये मी STI जरा late join करणार आहे कारण माझं राज्यसेवा इंटरव्ह्यू 2024 आहे तर मला कसलाही disturbance नकोय. अस उत्तर दिलं आहे त्यांनी. महिला जास्त संवेदनशील असतात अस आपण सगळीकडे ऐकतो.. पण जेव्हा आपल्या एका कृतीने दुसऱ्या महिलेच भल होणार असेल तर अशा वेळी ही संवेदनशिलता जाते कुठे.....काय करायचं अशा विचारसरणीच??? जेव्हा आपणदेखील या स्पर्धेत होतो तेव्हा आपल्यावर काय वेळ येत होती याचा अंतर्मनाने विचार करून थोडी तरी संवेदनशीलता दाखवा. आज सुपात असणारे उद्या जात्यात नक्कीच जाणार आहेत. एक अधिकारी म्हणून इतरांचा एकदा नक्की विचार करा आणि त्यांच्या घराबाहेर देखील अधिकाऱ्याची एक पाटी लागावी यासाठी आवर्जून पुढाकार घ्या. #Opt Out✅ #Dual Post❌
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
Hydrabad Gazzette GR dt.०२.०९.२०२५,.pdf
नमस्कार मित्र - मैत्रिणींनो ☺️☺️ काल Combine 2024 ची 2nd Answer key आली. काही जणांची अक्षरशः पायाखालची जमीनच सरकली. 8,10 आणि काही जणांचे 12-13 marks कमी झाले. अगदी Sure असणारे काठावर आले. काठावर असलेले बाहेर फेकले गेले असं वाटतंय. कदाचित हेच MPSC च वास्तव असावं. कारण MPSC म्हणजेच अनिश्चितता 😔. याला पर्याय काय? पर्याय एकच टिकून राहणं. सातत्यापूर्ण प्रयत्न आणि मैदानावर टिकून राहणं ☺️. आपल्या हातात काय आहे ती एकच गोष्ट सातत्य, टिकून राहणं आणि आपल्या प्रामाणिक प्रयत्नावर आपला दृढ विश्वास. अशा अडचणीच्या वेळी आपण स्वतःला सांगत राहायला हवं कि आपण जे प्रयत्न करतोय ते प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिक प्रयत्नांना शेवटी परमेश्वरदेखील साथ दिल्याशिवाय राहत नाही.आणि आपला तो एक दिवस म्हणजे निकालाचा दिवस त्यासाठी आपण सर्व काही करतोय. धावपळ करतोय फक्त तो आणि तोच दिवस डोळ्यासमोर ठेऊन आताच्या कठीण परिस्थितीला समोर जायला हवं. कारण आलेला दिवस जाणारच आहे फक्त तो कसा घालवायचा हे पूर्णतः आपल्या हातात आहे.कारण म्हणतात ना कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट केल्यावर यशालादेखील पर्याय नाही. जेवढे प्रामाणिक कष्ट तेवढाच मोठा यशाचा गुलाल ❣️. त्यामुळे सध्या फक्त धीर सोडू नका. प्रयत्न प्रामाणिक ठेवा. बाकी आम्ही तुमच्या सोबत आहोतच 🥰 ➖➖➖➖➖➖➖➖➖