Vikram Bondre - VB sir Talks
Статистикаसंचालक -गुरुकुल अकॅडमी बारामती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक. संयुक्त पूर्व परीक्षा (PSI/STI/ ASO) , गट- क, गट- ड. पोलीस भरती, तलाठी , ग्रामसेवक . सरळसेवा परिक्षांबाबत सखोल मार्गदर्शन. https://youtube.com/channel/UCPB7nBHBkX9kOOVpERq0jMQ
- Последний пост
- 26 мая
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- und
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
आज झालेला एस आर पी एफ वरणगाव गटाचा पेपर अतिशय सर्वोत्कृष्ट पेपर होता. यामध्ये सर्व पाठ्यपुस्तक शालेय च्या माध्यमातून हा पेपर तयार करण्यात आला हीच खरी पोलीस भरतीची काठीण्यपातळी आहे. सगळ्यात मोठा बदल ह्या पेपरच्या माध्यमातून दिसून आला मनापासून धन्यवाद
без подписи
म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावला नाही पाहिजे
без подписи
SRPF गट क्र. ५ (दौंड) येथील पोलीस भरती प्रश्नपत्रिकेतील गंभीर प्रकाराबाबत... पोलीस भरतीची तयारी करणारा सामान्य घरातील तरुण रात्रंदिवस मैदानावर घाम गाळतो आणि अभ्यासासाठी रक्ताचं पाणी करतो. या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कष्टांची थट्टा काल दौंड येथील SRPF गट क्रमांक ५ च्या लेखी परीक्षेत पाहायला मिळाली, हे अत्यंत दुर्दैवी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या परीक्षेतील १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न एका खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसेच्या तसे ('As It Is') घेण्यात आले आहेत. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि गोपनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माझे स्पष्ट मत आणि आक्षेप: प्रशासकीय निष्काळजीपणा: प्रश्नपत्रिका संच तयार करण्याची जबाबदारी ही संबंधित प्रशासकीय निवड समितीची असते. स्वतःची बुद्धी न वापरता किंवा प्रश्नांची काठिण्यपातळी न तपासता, एखाद्या खाजगी पब्लिकेशनचा संच जसाच्या तसा कॉपी करणे, हा प्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा आहे. समान संधीचा अभाव: ज्या विद्यार्थ्यांनी ते विशिष्ट पुस्तक वाचले असेल, त्यांना याचा थेट फायदा झाला आणि ज्यांनी इतर साधनांतून प्रामाणिक अभ्यास केला, त्यांच्यावर हा मोठा अन्याय आहे. यामुळे 'गुणवत्ते'पेक्षा 'नशिबाचा' आणि 'विशिष्ट संचाचा' विजय झाला आहे. खाजगीकरणाचा संशय: सरकारी भरतीची प्रश्नपत्रिका खाजगी क्लास किंवा पब्लिकेशनच्या साहित्याशी ८५% जुळते, तेव्हा यामागे काही साटेलोटे तर नाही ना? अशी शंका येणे स्वाभाविक आहे. माझी मागणी: मी विक्रम बोंद्रे, एक पोलीस भरती मार्गदर्शक या नात्याने या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करतो. प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी. भविष्यात अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये आणि प्रश्नपत्रिका काढताना ती पूर्णपणे स्वतंत्र, दर्जेदार आणि गोपनीय राहील याची काळजी घ्यावी. कष्टाने पोलीस होणाऱ्या पोरांच्या न्यायासाठी मी सदैव खंबीरपणे उभा आहे! आपला नम्र, विक्रम बोंद्रे
без подписи
https://www.loksatta.com/nagpur/nagpur-srpf-police-recruitment-exam-paper-scam-private-book-questions-rds-00-5876764/
हे प्रशासनाचे अपयश की विद्यार्थ्यांच्या नशिबाशी क्रूर थट्टा? 🧐⁉️ महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या गरीब आणि होतकरू मुलांच्या स्वप्नांवर पुन्हा एकदा नांगार फिरवला जातोय का? SRPF गट ५, दौंड येथील पोलीस भरती परीक्षेच्या पेपरमध्ये जे घडलंय, ते अत्यंत धक्कादायक आहे! 🔴 नेमकं प्रकरण काय? अधिकाऱ्यांनी स्वतः प्रश्नपत्रिका काढण्याऐवजी एका खाजगी पब्लिकेशनच्या प्रश्नसंचातून १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे उचलले आहेत. हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर प्रशासकीय भ्रष्टाचाराची आणि अपयशाची मोठी साक्ष आहे! आमचे काही रोखठोक प्रश्न: १. ज्या मुलांकडे ते खाजगी पुस्तक आधीच होतं, त्यांना हे प्रश्न आधीच कळाले नाहीत का? २. जर प्रश्न जसेच्या तसे येत असतील, तर याला 'पेपर फुटी' म्हणायचं नाही तर काय? ३. स्वतःची प्रश्नपत्रिका तयार करण्याचं साकल्याने कष्ट घेण्याची तसदी पोलीस प्रशासनाने का घेतली नाही? प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कष्टाचं मोल काय? अशाने गुणवत्तेची कदर होणार की वशिल्याची? या घोटाळ्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे! ✊🔥 #MaharashtraPoliceBharti #SRPF #Daund #JusticeForStudents #PoliceBharti2026 EducationScam PaperLeak MaharashtraGovernment StudentPower PoliceBhartiVarta Corruption
без подписи
बऱ्याच मुली आता पोलीस भरती या क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत मी सर्व मुलींना आणि त्यांच्या पालकांना विनंती करेल की आपण कृपया ज्या संस्थांमध्ये आपण आपल्या मुली पाठवणार आहात तिथे सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊन आपण मुलींना पाठवलं पाहिजे. मागील वर्षभराचा काळ जर पाहिला तर असंख्य घटना घडलेल्या महाराष्ट्र मध्ये दिसतात मुलीसाठी सुरक्षितता आणि तेथील संपूर्ण व्यवस्था कशी आहे पाहून आपण महाराष्ट्रात कुठेही प्रवेश घ्या पण आई-वडिलांनी नातेवाईकांनी पूर्ण चौकशी केल्याशिवाय मुलीचा प्रवेश निश्चित करू नये असे मी अगदी ठामपणे सांगत आहे कृपया आपल्या घरातील मुलीची काळजी ही महत्त्वाची आहे
आत्तापर्यंत झालेले सर्व 35 घटकांचे पोलीस भरती पेपर VB sir Gurukul पॅटर्न सर्वांनी व्यवस्थित प्रिंट काढून स्पायरल करून ठेवा अधिक माहितीसाठी जॉईन करा गुरुकुल चॅनेल https://t.me/GurukulBaramatiacademy आपलाच VB sir
खास रामनवमी निमित्त आपल्या सर्वांना आतापर्यंत झालेल्या पोलीस भरतीच्या सर्व 35 प्रश्नपत्रिका सर्वांसाठी मोफत देण्यात येत आहे. सर्वांनी प्रश्न अचूक सोडवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्टडी मटरेल योग्य उपलब्ध व्हावं या हेतून आपल्या सर्वांसाठी हे मटेरियल तयार करण्यात आले आपण सर्वांनी हे xerox काढून सोडवावे. आपलाच VB SIR
आज झालेला पुणे लोहमार्ग चा पेपर सबसे अलग गुरुकुल पॅटर्न बारामती https://t.me/GurukulBaramatiacademy
गुरुकुल पोलीस भरती सराव पेपर दिनांक - 12 मार्च 2026 एकूण प्रश्न 100 कृपया प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रयत्न. प्रामाणिक मन लावून पेपर सोडवा. https://t.me/GurukulBaramatiacademy
आनंदाची बातमी गुरुकुल मधील प्रवेश प्रक्रिया दिनांक 15 मार्चपासून सुरू होत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 8600603715
गुरुकुल पोलीस भरती सराव पेपर दिनांक - 5 मार्च 2026 एकूण प्रश्न 100 कृपया प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रयत्न. प्रामाणिक मन लावून पेपर सोडवा. https://t.me/GurukulBaramatiacademy
महत्वपूर्ण सूचना गुरुकुल अकॅडमीच्या दर्जेदार टेस्ट पेपर आणि स्टडी मटेरियल साठी गुरुकुल अकॅडमी चा ऑफिशियल चॅनेल जॉईन करावा. 1) सराव टेस्ट पेपर 2) टॉपिक टेस्ट पेपर 3) चालू घडामोडी सराव पेपर 4) पोलीस भरती चालक IMP क्वेश्चन पेपर https://whatsapp.com/channel/0029Vb6ZIcs47Xe2zrrMKo0d
उद्यापासून सुरू होत असलेल्या पोलीस भरती मैदानी चाचणीसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. ज्या ज्या ठिकाणी तुमची मैदान आहेत त्या ठिकाणी तुम्ही कृपया वेळेत पोहचल पाहिजे. सोबत जाताना आपण सर्व आपली कागदपत्रे घेऊन जावा.. जोरदार मैदान मारा. आपलाच VB Sir
महाराष्ट्राचा 'दादा' हरपला! 🕊️ "शब्दाला जागणारा नेता, काळाच्या पडद्याआड गेला..." अजित दादा... फक्त एक नाव नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगता प्रवास! आज नियतीने घात केला आणि महाराष्ट्राच्या विकासाचा एक सुवर्ण अध्याय एका दुर्दैवी विमान अपघातात अकाली संपला. हे वृत्त ऐकून मन सुन्न झाले आहे आणि डोळे पाणावले आहेत. एक झंझावाती नेतृत्व दादा म्हणजे शिस्त, स्पष्टवक्तेपणा आणि कामाचा झपाटा. पहाटे ५ वाजल्यापासून प्रशासनाला कामाला लावणारा हा लोकनेता, महाराष्ट्राच्या मातीशी नाळ घट्ट धरून होता. मंत्रालयातील फाईल्स असोत किंवा ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा प्रश्न, दादांचा शब्द म्हणजे कामाची खात्री असायची. काळजाला भिडणारे कार्य प्रशासनाचा कणा: नियमांचे पक्के पण सामान्य माणसासाठी धावून जाणारे हळवे मन. विकासाचा महामेरू: पुण्याचा कायापालट असो किंवा महाराष्ट्राची तिजोरी सांभाळताना दाखवलेली दूरदृष्टी, दादांनी राज्याला नेहमीच प्रगतीच्या पथावर ठेवले. नऊ वेळा बजेट मांडणारा विक्रमवीर: महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारा 'अर्थमंत्री' म्हणून त्यांची ओळख कायम काळजात राहील. दादा, तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही. तुमच्या रांगड्या आवाजातील तो दरारा, ती कामाची जिद्द आणि आपल्या माणसांवर असणारं अफाट प्रेम आता फक्त आठवणींच्या रूपाने आमच्यासोबत राहील. "आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे तुम्ही चमकत राहाल, महाराष्ट्राच्या मातीत तुमचे विचार सदैव दरवळत राहतील." महाराष्ट्राचा लाडका दादा.. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 आपलाच Vikram Bondre