मराठी व्याकरण - MPSCExams.com
Статистикаप्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★ म्हणी ★ अंलकार ★ शब्दभांडार ★ अर्थ आणि वाक्यप्रचार ★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न Join @Marathi_Grammar 🔗 व्हॉट्सॲप चॅनेल : https://bit.ly/JoinWhatsAppGrp
- Последний пост
- 18 июл.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
NICL Assistant Recruitment 2026: 500 Posts, Salary ₹53,000, Apply Online https://mpsctestseries.in/nicl-assistant-recruitment-2026/
BRO GREF Recruitment 2026 – 899 Draughtsman, SKT, Operator, Electrician & Hindi Typist पदांसाठी ऑफलाइन अर्ज https://mpsctestseries.in/bro-gref-recruitment-2026/
पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी Website सुरू झालेली आहे. https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Home.aspx
मुंबई पोलीस आयुक्तालय भरती 2024-25 अंतर्गत पोलीस शिपाई 2643 जागांसाठी भरती | Mumbai Police Bharti 2025 https://mpsctestseries.in/mumbai-police-bharti-2025/
🚨 खुशखबर! 🔥 अखेर महाराष्ट्र पोलीस भरती २०२४-२५ ची जाहिरात प्रकाशित! 🚔💥 https://mpsctestseries.in/maharashtra-police-recruitment-2024-25/
5_6339183733882494782.pdf पोलिस भरती जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत…….
सामान्य ज्ञान सराव पेपर 19 | सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त https://mpsctestseries.in/general-knowledge-question-paper-19/
दिल्ली पोलिस आणि CAPFs अंतर्गत 3073 सब-इन्स्पेक्टर (SI) जागांसाठी भरती https://mpsctestseries.in/ssc-cpo-recruitment-2025/
Marathi Varnamala | मराठी वर्णमाला। मुळाक्षरे। व्यंजन।स्वर | 52 वर्ण संपूर्ण माहिती https://mpsctestseries.in/marathi-varnamala/
मराठी व्याकरण संभाव्य सराव प्रश्नसंच 24 | सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त https://mpsctestseries.in/marathi-grammar-mock-test-24/ 🔴 टेस्ट सुरू करताना अडचण येत असल्यास हा व्हीडीओ बघा. https://youtube.com/shorts/0rdcLg8JQyU?si=fUVmbmZVqrNsdDWa 🪀मराठी व्याकरण चॅनेल : https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N 🪀Daily Free Test : https://whatsapp.com/channel/0029VanFeGnEQIaq2HM1eF0y Download App: : https://play.google.com/store/apps/details?id=com.iubtlv.jirfhd 👉🏻 आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका!
मराठी व्याकरण घटक 2 : संधी - विसर्ग संधी पोस्ट आवडली तर 1 Like 👍🏻 द्या. विसर्ग संधी १) विसर्ग उकार संधी विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा 'उ' होतो व तो मागील 'अ' मध्ये मिसळून त्याचा 'ओ' होतो. नोट: या संधियुक्त शब्दातील दुसऱ्या अक्षराला काना व मात्रा असतो. उदा. यशः + धन = यशोधन मनः + रथ = मनोरथ अधः + वदन = अधोवदन तेजः + निधी = तेजोनिधी मनः + रंजन = मनोरंजन तपः + बल = तपोबल मनः + राज्य = मनोराज्य रजः + गुण = रजोगुण यशः + गिरी = यशोगिरी २) विसर्ग र् संधी विसर्गाच्या मागे 'अ/आ' खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा 'र्' होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते. उदा. निः + अंतर = निरंतर दुः + जन = दुर्जन बहिः + अंग = बहिरंग दुः + आत्मा = दुरात्मा निः + विकार = निर्विकार धनुः + विद्या = धनुर्विद्या निः + इच्छा = निरिच्छा निः + लोभ = निर्लोभ ३) विसर्गाच्या मागे 'इ' किंवा 'उ' असून पुढे 'क, ख, प, फ' हे वर्ण आले तर विसर्गाचा 'ष्' होऊन संधी होते. उदा. निः + कर्ष = निष्कर्ष दुः + काळ = दुष्काळ निः + कारण = निष्कारण निः + पाप = निष्पाप निः + फळ = निष्फळ निः + कपट = निष्कपट दुः + कीर्ती = दुष्कीर्ती बहिः + कृत = बहिष्कृत दुः + परिणाम = दुष्परिणाम बहिः + कार = बहिष्कार 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N ४) विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असून पुढे 'क, ख, प्, फ्' ही कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो, परंतु पुढे स्वर आल्यास विसर्ग लोप पावतो. उदा. रजः + कण = रजःकण प्रातः + काल = प्रातःकाल अधः + पात = अधःपात इतः + पर = इतःपर तेजः + पुंज = तेजःपुंज इतः + उत्तर = इतउत्तर अतः + एव = अतएव ५) पदाच्या शेवटी 'र्' येऊन त्याच्यापुढे कठोर व्यंजन आल्यास 'र्' चा विसर्ग होतो. उदा. अंतर् + करण = अंतःकरण चतुर् + सूत्री = चतुःसूत्री ६) पहिल्या पदाच्या शेवटी 'स्' येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास 'स्' चा विसर्ग होतो. Join @Marathi_Grammar उदा. मनस् + पटल = मनःपटल तेजस् + कण = तेजःकण 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N ७) विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या 'र्' च्या मागे 'अ' व पुढे मृदू वर्ण आल्यास तो 'र्' तसाच राहून संधी होते. उदा. पुनर् + जन्म = पुनर्जन्म अंतर् + आत्मा = अंतरात्मा अंतर् + गत = अंतर्गत पुनर् + उक्ती = पुनरुक्ती पुनर् + उच्चार = पुनरुच्चार ८) विसर्गाच्या पुढे 'च् / छ' आल्यास विसर्गाचा 'श्' होतो. 'त् / थ्' आल्यास 'स्' होतो. उदा. निः + चल = निश्चल दुः + चिन्ह = दुश्चिन्ह मनः + ताप = मनस्ताप निः + तेज = निस्तेज मनः + चक्षु = मनश्चक्षु ९) विसर्गाच्या पुढे 'कृ' धातूची रूपे असल्यास विसर्गाचा 'स्' होऊन संधी होते. Join @Marathi_Grammar उदा. नमः + कार = नमस्कार पुरः + कार = पुरस्कार वयः + कर = वयस्कर १०) विसर्गाच्या पुढे: - च, छ आल्यास → विसर्गाचा श् होतो - ट, ठ आल्यास → विसर्गाचा ष् होतो - त, थ आल्यास → विसर्गाचा स् होतो उदा. अधः + तल = अधस्तल / अधःस्थल शनैः + चर = शनैश्चर अधः + छवि = अधश्छवि चक्षुः + तेज = चक्षुस्तेज रामः + टीकते = रामष्टीकते ११) विसर्गाच्या पुढे श्, स्, ष् आल्यास विसर्ग कायम राहतो. उदा. दुः + शासन = दुःशासन निः + स्वार्थी = निःस्वार्थी निः + संदेह = निःसंदेह निः + संशय = निःसंशय निः + शेष = निःशेष १२) विसर्गाच्या मागे इ / उ असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र् होतो; परंतु पुढे पुन्हा र् आल्यास मागील र् चा लोप होतो व त्याच्या मागील ऱ्हस्व स्वराचा दीर्घ स्वर होतो. Join @Marathi_Grammar उदा. निः + रव = नीरव निः + रस = नीरस 📌 संस्कृत संधी व निव्वळ मराठी संधी तुलना: - मंत्र + आलय = मंत्रालय - मंत्री + आलय = मंत्रालय - एक + ऊन = एकोन - एक + ऊन = एकूण - एक + एक = एकैक - एक + एक = एकेक - किती + एक = कित्येक - किती + एक = कितीक ⭐ वैशिष्ट्यपूर्ण संधी: अ / आ सोडून इतर कोणत्याही स्वरापुढे स् आल्यास, स् चा ष् होतो. उदा. अनु + संग = अनुषंग 📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N पोस्ट आवडली तर 1 Like 👍🏻 द्या.
मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संबंधी महत्वाचे चॅनेल नक्की जॉइन करा. मराठी व्याकरण https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N आरोग्य विभाग परीक्षा 2025 https://whatsapp.com/channel/0029VbBMBd584OmCChaCVr1B मराठी नोकरी संदर्भ https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K Daily - Free Online Test https://whatsapp.com/channel/0029VanFeGnEQIaq2HM1eF0y Learn English Grammar https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H Current Affairs | चालू घडामोडी 2025 https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v पोलीस भरती मार्गदर्शन 2025 https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03 MPSCExams Job Update https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I Daily Motivation Quotes https://whatsapp.com/channel/0029VbBGQjDBadmj6q3LLC2f
नागपूर महानगरपालिका (NMC) भरती 2025: पदनिहाय अभ्यासक्रम जाहीर! https://mpsctestseries.in/nmc-recruitment-2025-syllabus/
दिल्ली पोलीस भरती 2025 अंतर्गत 7565 जागांसाठी भरती https://mpsctestseries.in/delhi-police-constable-recruitment-2025/
🚨 मराठी व्याकरण - समानार्थी शब्द 5 🎯 इशारा = सूचना इंद्र = सुरेंद्र, नाकेश, वसाव, सहस्त्राक्ष, वज्रपाणी, देवेंद्र इहलोक = मृत्युलोक ईर्षा = चुरस इच्छा = आकांक्षा, आस, मनीषा, स्पृहा, लिप्सा, अपेक्षा ईश्वर = देव, ईश, निर्जर, परमेश्वर, अलक्ष, सूर, विभूध, अलख, प्रभू, त्रिदश उत्सव = समारंभ, सण, सोहळा उक्ती = वचन उशीर = विलंब उणीव = कमतरता उपवन = बगीचा उदर = पोट उदास = खिन्न 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N उत्कर्ष = भरभराट उपद्रव = त्रास उपेक्षा = हेळसांड उठावाची = उठायची ऊर्जा = शक्ती ॠण = कर्ज ॠतू = मोसम ऋषी = तपस्वी, मुनी, साधू, तापस एकजूट = एकी, ऐक्य ऐश्वर्य = वैभव ऐट = रुबाब, डौल 📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
मराठी व्याकरण घटक 2 : संधी - व्यंजन संधी / हल् संधी व्यंजन संधी / हल् संधी ━━━━━━━━━━━━━━━ १) प्रथम व्यंजन संधी : स्पर्श व्यंजनांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता, त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते. 👉 याला 'प्रथम व्यंजन संधी' असे म्हणतात. सूचना : संधी झालेल्या दोन वर्णांपैकी पहिले व्यंजन हे स्पर्श व्यंजन गटातील पहिल्या स्तंभातील (क्, च्, ट्, त्, प्) व्यंजनांपैकी असते. तेव्हा ती प्रथम व्यंजन संधी असते. उदाहरणे : - विपद् + काल → द् + क् = त्क् → विपत्काल - वाग् + पति → ग् + प् = क्प् → वाक्पति - वाग् + ताडन → ग् + त् = क्त् → वाक्ताडन - षड् + शास्त्र → ड् + श् = ट्श् → षट्शास्त्र ━━━━━━━━━━━━━━━ २) तृतीय व्यंजन संधी : स्पर्श व्यंजन गटातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास, त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते. 👉 याला 'तृतीय व्यंजन संधी' असे म्हणतात. नोट :संधी झालेल्या दोन वर्णांपैकी पहिले व्यंजन हे स्पर्श व्यंजन गटातील तिसऱ्या स्तंभातील (ग्, ज्, ड्, द्, ब्) व्यंजनांपैकी असते. उदाहरणे : - वाक् + विहार → क् + व् = ग्व् → वाग्विहार - षट् + रिपू → ट् + र् = ड्र → षड्रिपू - सत् + आचार → त् + आ = दा → सदाचार - उत् + गम → त् + ग् = दग् → उद्गम ━━━━━━━━━━━━━━━ अनुनासिक संधी : स्पर्श व्यंजन गटातील प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास, पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होते. 👉 याला अनुनासिक संधी म्हणतात. नोट : अनुनासिक संधीत झालेले दोन्हीही वर्ण अनुनासिक असतात. ━━━━━━━━━━━━━━━ उदाहरणे : १) षट् + मास ट् + म् = ण् + म् → षण्मास २) जगत् + नाथ त् + न् = न् + न् → जगन्नाथ ३) सत् + मती त् + म् = न् + म् → सन्मती ४) चित् + मय त् + म् = न् + म् → चिन्मय ━━━━━━━━━━━━━━━ ४. पहिल्या पदाच्या शेवटी प्रथम रांगेतील कठोर वर्ण येऊन त्यापुढे पुन्हा कठोर वर्ण आल्यास तो प्रथम कठोर वर्ण कायम राहतो व पुढील कठोर वर्णाबरोबर संधी होते. उदाहरणे: उत् + तम = उत्तम उत् + कर्ष = उत्कर्ष उत् + पत्ती = उत्पत्ती पृथक् + करण = पृथक्करण धिक् + कार = धिक्कार ५. त् या व्यंजनापुढे च्, छ् आल्यास त् बद्दल च् येतो व पुढील च् / छ बरोबर संधी होते. उदाहरणे: सत् + चरित्र = सच्चरित्र तत् + छत्र = तच्छत्र उत् + छेद = उच्छेद 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N ६. त् या व्यंजनापुढे ज् किंवा झ् आल्यास त् बद्दल ज् होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते. उदाहरणे: 1. उत्त + ज्वल त् + ज् = ज् + ज् → त् चा ज् → उज्ज्वल 2. सत् + जन त् + ज् = ज् + ज् → त् चा ज् → सज्जन 3. जगत् + जीवन त् + ज् = ज् + ज् → त् चा ज् → जगज्जीवन ७. 'त्' या व्यंजनापुढे 'ट/ठ आल्यास 'त्' बद्दल 'ट्' होतो. उदाहरण: तत् + टीका → त् चा ट् → तट्टीका ८. 'त्' या व्यंजनापुढे 'ल्' आल्यास 'त्' बद्दल 'ल्' येतो. उदाहरणे: उत् + लंघन → त् चा ल् → उल्लंघन उत् + लेख → त् चा ल् → उल्लेख तत् + लीन → त् चा ल् → तल्लीन विद्युत् + लता → त् चा ल् → विद्युल्लता ९. 'त्' या व्यंजनापुढे 'श्' आल्यास 'त्' बद्दल 'च्' होतो व पुढील 'श्' बद्दल 'छ' होतो. उदाहरणे: सत् + शिष्य → सच्छिष्य सत् + शील → सच्छील १०. 'त्' या व्यंजनापुढे 'ह' आल्यास 'त्' बद्दल 'द्' होतो व पुढील 'ह' बद्दल 'ध्' होतो. उदाहरण: तत् + हित → त् + ह = द् + ध् → तद्धित ११. 'म्' पुढे स्वर आल्यास तो 'म्' मध्ये मिसळतो; परंतु व्यंजन आल्यास 'म्' चा लोप होतो व मागील अक्षरावर अनुस्वार येतो. उदाहरणे: सम् + आचार = समाचार सम् + गती = संगती सम् + मती = संमती सम् + आलोचन = समालोचन सम् + ताप = संताप सम् + तोष = संतोष सम् + योग = संयोग किम् + कर = किंकर सम् + कल्प = संकल्प सम् + बंध = संबंध सम् + पूर्ण = संपूर्ण १२. 'छ' पूर्वी हस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये 'च्' हा वर्ण येतो. उदाहरणे: रत्न + छाया → अ + छ् = च् + छ् → रत्नच्छाया रंग + छटा → अ + छ = च् + छ → रंगच्छटा शब्द + छल → अ + छ् = च् + छ् → शब्दच्छल १३. प्रथम पदाच्या शेवटी 'न्' असून पुढे तद्धित प्रत्यय असल्यास न चा लोप होतो. उदाहरण: हस्तिन् + दंत → न् + दं = दं → हस्तिदंत 📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
मल्याळी जेष्ठ अभिनेते मोहनलाल यांना 2023 या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर दादासाहेब फाळके पुरस्कार: संक्षिप्त माहिती - २०२५ ची अपडेटसह 📌 परिचय - नाव: दादासाहेब फाळके पुरस्कार - स्थापना: १९६९ मध्ये भारत सरकारने - उद्देश: भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांचा सन्मान - सन्मान: स्वर्ण कमळ पदक, शाल, १० लाख रुपये रोख 📌 महत्त्वाची माहिती - प्रदाता: माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत चित्रपट महोत्सव संचालनालय - निवड: चित्रपट तज्ज्ञ व सरकारी प्रतिनिधींची समिती 📌 २०२५ ची अपडेट - प्राप्तकर्ता (२०२३): मोहनलाल (मलयाळम अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता) - प्रस्तुती: २३ सप्टेंबर २०२५, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, विज्ञान भवन, नवी दिल्ली - कारण: ३००+ चित्रपट, दिग्दर्शन व निर्मितीतील योगदान 📌 प्रमुख प्राप्तकर्ते - १९६९: देविका रानी (पहिली प्राप्तकर्ता) - २०२२: मिथुन चक्रवर्ती (अभिनेता) - २०२३: मोहनलाल (प्रस्तुती: २३ सप्टेंबर २०२५) 📌 इतर मुद्दे - दादासाहेब फाळके (१८७०-१९४४): भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, 'राजा हरिश्चंद्र' (१९१३) - सर्वोच्च चित्रपट सन्मान
४) औ + इ = आव् + इ = आवि - नौ + इक = नाविक ५) ओ + अ = अव् + अ = अव - पो + अन = पवन ६) औ + अ = आव् + अ = आव - पौ + अन = पावन 📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
मराठी व्याकरण घटक 2 : संधी - स्वरसंधी स्वरसंधी १) दीर्घत्व संधी : दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्हींबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो, याला दीर्घत्व संधी असे म्हणतात. दीर्घत्व संधी ओळखण्याची खूण – संधी होऊन तयार झालेल्या वर्णाला काना, दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी असते. सूत्रे : अ / आ + अ / आ = आ (काना) इ / ई + इ / ई = ई (दुसरी वेलांटी) उ / ऊ + उ / ऊ = ऊ (दुसरा उकार) --- उदाहरणे : १) अ + अ = आ - सूर्य + अस्त = सूर्यास्त - कट + अक्ष = कटाक्ष - रूप + अंतर = रूपांतर - स्वभाव + अनुसार = स्वभावानुसार - मिष्ट + अन्न = मिष्टान्न - स + अभिनय = साभिनय - प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय - सह + अध्यायी = सहाध्यायी - पुरुष + अर्थ = पुरुषार्थ - सह + अनुभूती = सहानुभूती - मंद + अंध = मंदांध २) अ + आ = आ - हिम + आलय = हिमालय - देव + आलय = देवालय - फल + आहार = फलाहार - अनाथ + आश्रम = अनाथाश्रम - गोल + आकार = गोलाकार - मंत्र + आलय = मंत्रालय - शिशिर + आगमन = शिशिरागमन - सिंह + आसन = सिंहासन - धन + आदेश = धनादेश 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N आदेश म्हणजे काय ? 👉 संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे. यालाच आदेश असे म्हणतात. २) गुणादेश संधी : 👉 दोन स्वर एकत्र आल्यावर ते बदलून ए, ओ, अर् असे रूप धारण करतात, त्यास गुणादेश संधी म्हणतात. सूत्र : अ / आ + इ / ई = ए अ / आ + उ / ऊ = ओ अ / आ + ऋ = अर् गुणादेश संधीची उदाहरणे : १) अ + इ = ए - ईश्वर + इच्छा = ईश्वरेच्छा - स्व + इच्छा = स्वेच्छा - लोक + इच्छा = लोकेच्छा - मनुष्य + इतर = मनुष्येतर - राष्ट्र + इतिहास = राष्ट्रिहास २) अ + ई = ए - गण + ईश = गणेश - राम + ईश्वर = रामेश्वर - गुण + ईश = गुणेश ३) आ + इ = ए - महा + इंद्र = महेंद्र - यथा + इष्ट = यथेष्ट ४) आ + ई = ए - रमा + ईश = रमेश - उमा + ईश = उमेश - महा + ईश = महेश ५) अ + उ = ओ - अयोध्या + ईश = अयोध्येश - राजा + ईश = राजेश - लंका + ईश्वर = लंकेश्वर - चंद्र + उदय = चंद्रोदय - सूर्य + उदय = सूर्योदय - पुरुष + उत्तम = पुरुषोत्तम - अन्य + उक्ती = अन्योक्ती - निसर्ग + उपचार = निसर्गोपचार - गणेश + उत्सव = गणेशोत्सव - प्रश्न + उत्तर = प्रश्नोत्तर - दीर्घ + उत्तरी = दीर्घोत्तरी - स्वभाव + उक्ती = स्वभावोक्ती - अल्प + उपाहार = अल्पोपाहार - राष्ट्र + उत्तेजक = राष्ट्रोत्तेजक - उत्तम + उत्तम = उत्तमोत्तम 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N ३. वृद्ध्यादेश : जर खालीलप्रमाणे दोन स्वर एकत्र येऊन ऐ, औ स्वर तयार झाल्यास त्यास वृद्ध्यादेश असे म्हणतात. अ / आ + ए / ऐ = ऐ अ / आ + ओ / औ = औ उदाहरणे : १) अ + ए = ऐ - क्षण + एक = क्षणैक - एक + एक = एकैक २) आ + ए = ऐ - सदा + एव = सदैव ३) अ + ऐ = ऐ - मत + ऐक्य = मतैक्य - जन + ऐक्य = जनैक्य ४) आ + ऐ = ऐ - प्रजा + ऐक्य = प्रजैक्य - विद्या + ऐश्वर्य = विद्यदैश्वर्य ५) अ + ओ = औ - जल + ओघ = जलौघ ६) आ + ओ = औ - गंगा + ओघ = गंगौघ - यमुना + ओघ = यमुनौघ ७) अ + औ = औ - वृक्ष + औदार्य = वृक्षौदार्य - बाल + औत्सुक्य = बालौत्सुक्य - वन + औषधी = वनौषधी ८) आ + औ = औ - महा + औदार्य = महौदार्य - क्षमा + औचित्य = क्षमौचित्य 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N ४. यणादेश : इ, उ, ऋ (हस्व / दीर्घ) यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास — - 'इ/ई' बद्दल 'य्' - 'उ/ऊ' बद्दल 'व्' - 'ऋ' बद्दल 'र्' हे वर्ण येतात आणि त्यात पुढील स्वर मिसळून संधी होते. अशा प्रकारे य्, व्, र् असे बदल होतात. त्याला यणादेश असे म्हणतात. उदाहरणे : १) इ + अ = य् + अ = य - प्रीति + अर्थ = प्रीत्यर्थ - अति + अल्प = अत्यल्प - अति + अंत = अत्यंत - प्रति + अक्ष = प्रत्यक्ष - प्रति + अंतर = प्रत्यंतर - कोटि + अवधि = कोट्यवधि २) इ + आ = य् + आ = या - इति + आदी = इत्यादी - अति + आचार = अत्याचार - अति + आनंद = अत्यानंद - वि + आसंग = व्यासंग महत्त्वाचे नियम : य्, व्, र् ऐवजी अनुक्रमे इ, उ, ऋ असे बदल होतात. तेव्हा त्याला संप्रसारण म्हणतात. उदा. - येथे → इथे - नव → नऊ - गाय → गाईला ५. आदेश नियम : 'ए, ऐ, ओ, औ' या स्वरांपुढे जर एखादा स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय्, आय्, अव्, आव् असे आदेश होऊन पुढील स्वर यात मिसळतो. उदाहरणे : १) ए + अ = अय् + अ = अय - ने + अन = नयन २) ऐ + अ = आय् + अ = आय - गै + अन = गायन ३) ओ + ई = अव् + ई = अवी - गो + ईश्वर = गवीश्वर
🚨 मराठी व्याकरण - समानार्थी शब्द 3 🎯 अही = साप, भुजंग, सर्प, व्याळ, पन्नग, फनी अश्रू = आसू अंबर = वस्त्र अंधार = काळोख, तिमीर, तम अमृत = पीयूष, सुधा अहंकार = गर्व अंक = आकडा आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर, आवकाश, अंतरीक्ष, व्योम, ख, अंतराळ, वियत, वितान आठवण = स्मरण, स्मृती, सय आठवडा = सप्ताह 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N आनंद = हर्ष, तोष, मोद, संतोष, प्रमोद, उल्हास, उद्धव आजारी = पीडित, रोगी आयुष्य = जीवन, हयात आतुरता = उत्सुकता आरोपी = गुन्हेगार, अपराधी आश्चर्य = नवल, अचंबा, विस्मय, अचरथ, आचोज आसन = बैठक आदर = मान आवाज = ध्वनी, रव आवाजमां = आवाजात आज्ञा = आदेश, हुकूम आपुलकी = जवळीकता 📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N