Vidarbha Academy
Статистика@VidarbhaAcademy विदर्भ अकॅडेमी चॅनेल वर आम्ही सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असलेले 5 सराव प्रश्नसंच रोज मोफत देत असतो. Free Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. https://bit.ly/VidarbhaAcademy @VidarbhaAcademy
- Последний пост
- 18 июл.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
NICL Assistant Recruitment 2026: 500 Posts, Salary ₹53,000, Apply Online https://mpsctestseries.in/nicl-assistant-recruitment-2026/
BRO GREF Recruitment 2026 – 899 Draughtsman, SKT, Operator, Electrician & Hindi Typist पदांसाठी ऑफलाइन अर्ज https://mpsctestseries.in/bro-gref-recruitment-2026/
पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी Website सुरू झालेली आहे. https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Home.aspx
मुंबई पोलीस आयुक्तालय भरती 2024-25 अंतर्गत पोलीस शिपाई 2643 जागांसाठी भरती | Mumbai Police Bharti 2025 https://mpsctestseries.in/mumbai-police-bharti-2025/
🚨 खुशखबर! 🔥 अखेर महाराष्ट्र पोलीस भरती २०२४-२५ ची जाहिरात प्रकाशित! 🚔💥 https://mpsctestseries.in/maharashtra-police-recruitment-2024-25/
5_6339183733882494782.pdf पोलिस भरती जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत…….
सामान्य ज्ञान सराव पेपर 19 | सर्व स्पर्धा परीक्षेस उपयुक्त https://mpsctestseries.in/general-knowledge-question-paper-19/
दिल्ली पोलिस आणि CAPFs अंतर्गत 3073 सब-इन्स्पेक्टर (SI) जागांसाठी भरती https://mpsctestseries.in/ssc-cpo-recruitment-2025/
मराठी व्याकरण घटक 2 : संधी - विसर्ग संधी पोस्ट आवडली तर 1 Like 👍🏻 द्या. विसर्ग संधी १) विसर्ग उकार संधी विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा 'उ' होतो व तो मागील 'अ' मध्ये मिसळून त्याचा 'ओ' होतो. नोट: या संधियुक्त शब्दातील दुसऱ्या अक्षराला काना व मात्रा असतो. उदा. यशः + धन = यशोधन मनः + रथ = मनोरथ अधः + वदन = अधोवदन तेजः + निधी = तेजोनिधी मनः + रंजन = मनोरंजन तपः + बल = तपोबल मनः + राज्य = मनोराज्य रजः + गुण = रजोगुण यशः + गिरी = यशोगिरी २) विसर्ग र् संधी विसर्गाच्या मागे 'अ/आ' खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा 'र्' होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते. उदा. निः + अंतर = निरंतर दुः + जन = दुर्जन बहिः + अंग = बहिरंग दुः + आत्मा = दुरात्मा निः + विकार = निर्विकार धनुः + विद्या = धनुर्विद्या निः + इच्छा = निरिच्छा निः + लोभ = निर्लोभ ३) विसर्गाच्या मागे 'इ' किंवा 'उ' असून पुढे 'क, ख, प, फ' हे वर्ण आले तर विसर्गाचा 'ष्' होऊन संधी होते. उदा. निः + कर्ष = निष्कर्ष दुः + काळ = दुष्काळ निः + कारण = निष्कारण निः + पाप = निष्पाप निः + फळ = निष्फळ निः + कपट = निष्कपट दुः + कीर्ती = दुष्कीर्ती बहिः + कृत = बहिष्कृत दुः + परिणाम = दुष्परिणाम बहिः + कार = बहिष्कार 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N ४) विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असून पुढे 'क, ख, प्, फ्' ही कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो, परंतु पुढे स्वर आल्यास विसर्ग लोप पावतो. उदा. रजः + कण = रजःकण प्रातः + काल = प्रातःकाल अधः + पात = अधःपात इतः + पर = इतःपर तेजः + पुंज = तेजःपुंज इतः + उत्तर = इतउत्तर अतः + एव = अतएव ५) पदाच्या शेवटी 'र्' येऊन त्याच्यापुढे कठोर व्यंजन आल्यास 'र्' चा विसर्ग होतो. उदा. अंतर् + करण = अंतःकरण चतुर् + सूत्री = चतुःसूत्री ६) पहिल्या पदाच्या शेवटी 'स्' येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास 'स्' चा विसर्ग होतो. Join @Marathi_Grammar उदा. मनस् + पटल = मनःपटल तेजस् + कण = तेजःकण 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N ७) विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या 'र्' च्या मागे 'अ' व पुढे मृदू वर्ण आल्यास तो 'र्' तसाच राहून संधी होते. उदा. पुनर् + जन्म = पुनर्जन्म अंतर् + आत्मा = अंतरात्मा अंतर् + गत = अंतर्गत पुनर् + उक्ती = पुनरुक्ती पुनर् + उच्चार = पुनरुच्चार ८) विसर्गाच्या पुढे 'च् / छ' आल्यास विसर्गाचा 'श्' होतो. 'त् / थ्' आल्यास 'स्' होतो. उदा. निः + चल = निश्चल दुः + चिन्ह = दुश्चिन्ह मनः + ताप = मनस्ताप निः + तेज = निस्तेज मनः + चक्षु = मनश्चक्षु ९) विसर्गाच्या पुढे 'कृ' धातूची रूपे असल्यास विसर्गाचा 'स्' होऊन संधी होते. Join @Marathi_Grammar उदा. नमः + कार = नमस्कार पुरः + कार = पुरस्कार वयः + कर = वयस्कर १०) विसर्गाच्या पुढे: - च, छ आल्यास → विसर्गाचा श् होतो - ट, ठ आल्यास → विसर्गाचा ष् होतो - त, थ आल्यास → विसर्गाचा स् होतो उदा. अधः + तल = अधस्तल / अधःस्थल शनैः + चर = शनैश्चर अधः + छवि = अधश्छवि चक्षुः + तेज = चक्षुस्तेज रामः + टीकते = रामष्टीकते ११) विसर्गाच्या पुढे श्, स्, ष् आल्यास विसर्ग कायम राहतो. उदा. दुः + शासन = दुःशासन निः + स्वार्थी = निःस्वार्थी निः + संदेह = निःसंदेह निः + संशय = निःसंशय निः + शेष = निःशेष १२) विसर्गाच्या मागे इ / उ असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र् होतो; परंतु पुढे पुन्हा र् आल्यास मागील र् चा लोप होतो व त्याच्या मागील ऱ्हस्व स्वराचा दीर्घ स्वर होतो. Join @Marathi_Grammar उदा. निः + रव = नीरव निः + रस = नीरस 📌 संस्कृत संधी व निव्वळ मराठी संधी तुलना: - मंत्र + आलय = मंत्रालय - मंत्री + आलय = मंत्रालय - एक + ऊन = एकोन - एक + ऊन = एकूण - एक + एक = एकैक - एक + एक = एकेक - किती + एक = कित्येक - किती + एक = कितीक ⭐ वैशिष्ट्यपूर्ण संधी: अ / आ सोडून इतर कोणत्याही स्वरापुढे स् आल्यास, स् चा ष् होतो. उदा. अनु + संग = अनुषंग 📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N पोस्ट आवडली तर 1 Like 👍🏻 द्या.
मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संबंधी महत्वाचे चॅनेल नक्की जॉइन करा. मराठी व्याकरण https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N आरोग्य विभाग परीक्षा 2025 https://whatsapp.com/channel/0029VbBMBd584OmCChaCVr1B मराठी नोकरी संदर्भ https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K Daily - Free Online Test https://whatsapp.com/channel/0029VanFeGnEQIaq2HM1eF0y Learn English Grammar https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H Current Affairs | चालू घडामोडी 2025 https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v पोलीस भरती मार्गदर्शन 2025 https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03 MPSCExams Job Update https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I Daily Motivation Quotes https://whatsapp.com/channel/0029VbBGQjDBadmj6q3LLC2f
नागपूर महानगरपालिका (NMC) भरती 2025: पदनिहाय अभ्यासक्रम जाहीर! https://mpsctestseries.in/nmc-recruitment-2025-syllabus/
दिल्ली पोलीस भरती 2025 अंतर्गत 7565 जागांसाठी भरती https://mpsctestseries.in/delhi-police-constable-recruitment-2025/
मराठी व्याकरण घटक 2 : संधी - व्यंजन संधी / हल् संधी व्यंजन संधी / हल् संधी ━━━━━━━━━━━━━━━ १) प्रथम व्यंजन संधी : स्पर्श व्यंजनांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता, त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येते. 👉 याला 'प्रथम व्यंजन संधी' असे म्हणतात. सूचना : संधी झालेल्या दोन वर्णांपैकी पहिले व्यंजन हे स्पर्श व्यंजन गटातील पहिल्या स्तंभातील (क्, च्, ट्, त्, प्) व्यंजनांपैकी असते. तेव्हा ती प्रथम व्यंजन संधी असते. उदाहरणे : - विपद् + काल → द् + क् = त्क् → विपत्काल - वाग् + पति → ग् + प् = क्प् → वाक्पति - वाग् + ताडन → ग् + त् = क्त् → वाक्ताडन - षड् + शास्त्र → ड् + श् = ट्श् → षट्शास्त्र ━━━━━━━━━━━━━━━ २) तृतीय व्यंजन संधी : स्पर्श व्यंजन गटातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास, त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते. 👉 याला 'तृतीय व्यंजन संधी' असे म्हणतात. नोट :संधी झालेल्या दोन वर्णांपैकी पहिले व्यंजन हे स्पर्श व्यंजन गटातील तिसऱ्या स्तंभातील (ग्, ज्, ड्, द्, ब्) व्यंजनांपैकी असते. उदाहरणे : - वाक् + विहार → क् + व् = ग्व् → वाग्विहार - षट् + रिपू → ट् + र् = ड्र → षड्रिपू - सत् + आचार → त् + आ = दा → सदाचार - उत् + गम → त् + ग् = दग् → उद्गम ━━━━━━━━━━━━━━━ अनुनासिक संधी : स्पर्श व्यंजन गटातील प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास, पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होते. 👉 याला अनुनासिक संधी म्हणतात. नोट : अनुनासिक संधीत झालेले दोन्हीही वर्ण अनुनासिक असतात. ━━━━━━━━━━━━━━━ उदाहरणे : १) षट् + मास ट् + म् = ण् + म् → षण्मास २) जगत् + नाथ त् + न् = न् + न् → जगन्नाथ ३) सत् + मती त् + म् = न् + म् → सन्मती ४) चित् + मय त् + म् = न् + म् → चिन्मय ━━━━━━━━━━━━━━━ ४. पहिल्या पदाच्या शेवटी प्रथम रांगेतील कठोर वर्ण येऊन त्यापुढे पुन्हा कठोर वर्ण आल्यास तो प्रथम कठोर वर्ण कायम राहतो व पुढील कठोर वर्णाबरोबर संधी होते. उदाहरणे: उत् + तम = उत्तम उत् + कर्ष = उत्कर्ष उत् + पत्ती = उत्पत्ती पृथक् + करण = पृथक्करण धिक् + कार = धिक्कार ५. त् या व्यंजनापुढे च्, छ् आल्यास त् बद्दल च् येतो व पुढील च् / छ बरोबर संधी होते. उदाहरणे: सत् + चरित्र = सच्चरित्र तत् + छत्र = तच्छत्र उत् + छेद = उच्छेद 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N ६. त् या व्यंजनापुढे ज् किंवा झ् आल्यास त् बद्दल ज् होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते. उदाहरणे: 1. उत्त + ज्वल त् + ज् = ज् + ज् → त् चा ज् → उज्ज्वल 2. सत् + जन त् + ज् = ज् + ज् → त् चा ज् → सज्जन 3. जगत् + जीवन त् + ज् = ज् + ज् → त् चा ज् → जगज्जीवन ७. 'त्' या व्यंजनापुढे 'ट/ठ आल्यास 'त्' बद्दल 'ट्' होतो. उदाहरण: तत् + टीका → त् चा ट् → तट्टीका ८. 'त्' या व्यंजनापुढे 'ल्' आल्यास 'त्' बद्दल 'ल्' येतो. उदाहरणे: उत् + लंघन → त् चा ल् → उल्लंघन उत् + लेख → त् चा ल् → उल्लेख तत् + लीन → त् चा ल् → तल्लीन विद्युत् + लता → त् चा ल् → विद्युल्लता ९. 'त्' या व्यंजनापुढे 'श्' आल्यास 'त्' बद्दल 'च्' होतो व पुढील 'श्' बद्दल 'छ' होतो. उदाहरणे: सत् + शिष्य → सच्छिष्य सत् + शील → सच्छील १०. 'त्' या व्यंजनापुढे 'ह' आल्यास 'त्' बद्दल 'द्' होतो व पुढील 'ह' बद्दल 'ध्' होतो. उदाहरण: तत् + हित → त् + ह = द् + ध् → तद्धित ११. 'म्' पुढे स्वर आल्यास तो 'म्' मध्ये मिसळतो; परंतु व्यंजन आल्यास 'म्' चा लोप होतो व मागील अक्षरावर अनुस्वार येतो. उदाहरणे: सम् + आचार = समाचार सम् + गती = संगती सम् + मती = संमती सम् + आलोचन = समालोचन सम् + ताप = संताप सम् + तोष = संतोष सम् + योग = संयोग किम् + कर = किंकर सम् + कल्प = संकल्प सम् + बंध = संबंध सम् + पूर्ण = संपूर्ण १२. 'छ' पूर्वी हस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये 'च्' हा वर्ण येतो. उदाहरणे: रत्न + छाया → अ + छ् = च् + छ् → रत्नच्छाया रंग + छटा → अ + छ = च् + छ → रंगच्छटा शब्द + छल → अ + छ् = च् + छ् → शब्दच्छल १३. प्रथम पदाच्या शेवटी 'न्' असून पुढे तद्धित प्रत्यय असल्यास न चा लोप होतो. उदाहरण: हस्तिन् + दंत → न् + दं = दं → हस्तिदंत 📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
मल्याळी जेष्ठ अभिनेते मोहनलाल यांना 2023 या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर दादासाहेब फाळके पुरस्कार: संक्षिप्त माहिती - २०२५ ची अपडेटसह 📌 परिचय - नाव: दादासाहेब फाळके पुरस्कार - स्थापना: १९६९ मध्ये भारत सरकारने - उद्देश: भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांचा सन्मान - सन्मान: स्वर्ण कमळ पदक, शाल, १० लाख रुपये रोख 📌 महत्त्वाची माहिती - प्रदाता: माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत चित्रपट महोत्सव संचालनालय - निवड: चित्रपट तज्ज्ञ व सरकारी प्रतिनिधींची समिती 📌 २०२५ ची अपडेट - प्राप्तकर्ता (२०२३): मोहनलाल (मलयाळम अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता) - प्रस्तुती: २३ सप्टेंबर २०२५, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, विज्ञान भवन, नवी दिल्ली - कारण: ३००+ चित्रपट, दिग्दर्शन व निर्मितीतील योगदान 📌 प्रमुख प्राप्तकर्ते - १९६९: देविका रानी (पहिली प्राप्तकर्ता) - २०२२: मिथुन चक्रवर्ती (अभिनेता) - २०२३: मोहनलाल (प्रस्तुती: २३ सप्टेंबर २०२५) 📌 इतर मुद्दे - दादासाहेब फाळके (१८७०-१९४४): भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, 'राजा हरिश्चंद्र' (१९१३) - सर्वोच्च चित्रपट सन्मान
🎯 मराठी व्याकरण - शब्दसमूहाबद्दल एक शब्द १) ज्याचा थांग लागत नाही असे – अथांग २) देव आहे असे मानणारा – आस्तिक ३) ‘भले होवो’ अशी मंगल कामना – आशीर्वाद ४) दक्षिण सामु्द्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यंत – आसेतुहिमाचल ५) अग्नीची पूजा करणारा – अग्नीपूजक ६) मोजता येणार नाही इतके – असंख्य, अमाप ७) ज्याचा कधीच विसर पडत नाही असा – अविस्मरणीय ८) अन्नदान करणारा – अन्नदाता ९) खूप दानधर्म करणारा – दानशूर १०) जिवाला जीव देणारा – जिवलग ११) जाणून घेण्याची इच्छा असणारा – जिज्ञासू १२) दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा – कनवाळू १३) कामाची टाळाटाळ करणारा – कामचुकार १४) धर्मस्थान करणारा – धर्मसंस्थापक १५) देशासाठी झटणारा – देशभक्त, देशभक्ती १६) कोणत्याच पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा – निष्पक्षपाती १७) हट्टीपणा करणारा – दुराग्रही १८) ईश्वराचे अस्तित्व न मानणारा – नास्तिक १९) दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी २०) जुन्या मतांना चिकटून राहणारा – पुराणमतवादी, सनातनी 📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N पोस्ट आवडली तर 1 Like 👍🏼 द्या.
Ladki Bahin Yojana e-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: जाणून घ्या e-KYC करण्याची संपूर्ण प्रक्रिया! https://mpsctestseries.in/mukhyamantri-ladki-bahin-yojana-ekyc-compulsory-for-all-check-how-complete-this-process/
मित्रांनो, स्पर्धा परीक्षा संबंधी महत्वाचे चॅनेल नक्की जॉइन करा. मराठी व्याकरण https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N आरोग्य विभाग परीक्षा 2025 https://whatsapp.com/channel/0029VbBMBd584OmCChaCVr1B मराठी नोकरी संदर्भ https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K Daily - Free Online Test https://whatsapp.com/channel/0029VanFeGnEQIaq2HM1eF0y Learn English Grammar https://whatsapp.com/channel/0029VbBBni78F2p7W6ougd3H Current Affairs | चालू घडामोडी 2025 https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v पोलीस भरती मार्गदर्शन 2025 https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03 MPSCExams Job Update https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I Daily Motivation Quotes https://whatsapp.com/channel/0029VbBGQjDBadmj6q3LLC2f
अंकगणित सराव पेपर 12 https://mpsctestseries.in/math-practice-paper-12/
✒️ लेखक परिचय लेखक नाव: अण्णा भाऊ साठे जन्म आणि मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९ नाव / टोपणनाव: तुकाराम भाऊराव साठे (_लोकशाहीर अण्णा भाऊ साठे_) कादंबरी: आवडी, गुलाम, चंदन, चिखलातील कमळ, चित्रा (१९४५), पाझर, फकिरा (१९५९), मथुरा, माकडीचा माळ (१९६३), रत्ना, रानगंगा, रूपा, वारणेचा वाघ (१९६८), वैजयंता, वैर, तारा, रानबोका, संघर्ष, सुगंधा कथा संग्रह: आबी, खुळंवाडा, गजाआड, निखारा, नवती, जिवंत काडतूस, फरारी, चिरानगरची भुतं (१९७८), पिसाळलेला माणूस, बरबाद्या कंजारी (१९६०), कृष्णाकाठच्या कथा 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N नाटक: इनामदार (१९५८), पेंग्याचं लगीन, सुलतान लोकनाट्य: अकलेची गोष्ट (१९४५), कापऱ्या चोर, देशभक्त घोटाळे (१९४६), पुढारी मिळाला (१९५२), बेकायदेशीर (१९४७), माझी मुंबई, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२), शेटजींचे इलेक्शन (१९४६) प्रवासवर्णन: कविता आणि माझा रशियाचा प्रवास काव्ये: अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या इतर योगदान: मराठी चित्रपटांसाठी लेखन (वैजयंता, सौख्यभरे), आयपीटीएशी संलग्नता, साम्यवादी आणि आंबेडकरी विचारसरणीचा प्रसार 📲 जॉइन करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा 👇 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb7StG1LSmbWk1X6w81N
❓ प्रश्न: जागतिक ओझोन दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? (a) १५ सप्टेंबर (b) १७ सप्टेंबर (c) १६ सप्टेंबर (d) १८ सप्टेंबर ✅ उत्तर: (c) ℹ️ स्पष्टीकरण: जागतिक ओझोन दिन १६ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस १९८७ च्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रांनी घोषित केला. २०२५ ची संकल्पना "विज्ञानापासून जागतिक कृतीकडे" होती. ------------------------------------------------------------ ❓ प्रश्न: २०२५ च्या महिला आशिया हॉकी चषक स्पर्धेत कोणता देश उपविजेता ठरला? (a) जपान (b) दक्षिण कोरिया (c) चीन (d) भारत ✅ उत्तर: (d) ℹ️ स्पष्टीकरण: भारत उपविजेता ठरला, चीनने अंतिम फेरीत भारताला ४-१ ने पराभूत केले. ------------------------------------------------------------ ❓ प्रश्न: २०२४-२५ आर्थिक सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र जगातील कितव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे? (a) २५ वी (b) २८ वी (c) ३० वी (d) २४ वी ✅ उत्तर: (b) ℹ️ स्पष्टीकरण: महाराष्ट्र जगातील २८ व्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असून राज्याचा जीडीपी ५३६ अब्ज डॉलर आहे. ------------------------------------------------------------ ❓ प्रश्न: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ मध्ये कोणता वाढदिवस साजरा केला? (a) ७४ वा (b) ७५ वा (c) ७६ वा (d) ७३ वा ✅ उत्तर: (b) ℹ️ स्पष्टीकरण: नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी ७५ वा वाढदिवस साजरा केला. ------------------------------------------------------------ Join : https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v ❓ प्रश्न: मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? (a) १५ सप्टेंबर (b) १७ सप्टेंबर (c) १६ सप्टेंबर (d) १८ सप्टेंबर ✅ उत्तर: (b) ℹ️ स्पष्टीकरण: मराठवाडा मुक्ती दिन १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. ------------------------------------------------------------ ❓ प्रश्न: भारतीय क्रिकेट संघाच्या २०२५-२८ सत्रातील नवीन जर्सीचा प्रायोजक कोण आहे? (a) ड्रीम११ (b) जेके टायर (c) अपोलो टायर्स (d) कॅनवा ✅ उत्तर: (c) ℹ️ स्पष्टीकरण: अपोलो टायर्सने बीसीसीआयसोबत ५७९ कोटी रुपयांचा करार केला. ------------------------------------------------------------ ❓ प्रश्न: २०२५ मध्ये झालेल्या महिला आशिया हॉकी चषक स्पर्धेत कोणता देश विजेता ठरला? (a) जपान (b) दक्षिण कोरिया (c) भारत (d) चीन ✅ उत्तर: (d) ℹ️ स्पष्टीकरण: चीन विजेता ठरला आणि भारत उपविजेता राहिला. ------------------------------------------------------------ ❓ प्रश्न: जागतिक नवसंशोधन निर्देशांक (GII) २०२५ मध्ये भारताची क्रमवारी किती आहे? (a) २५ वी (b) ३८ वी (c) ४७ वी (d) ५६ वी ✅ उत्तर: (b) ℹ️ स्पष्टीकरण: भारत ३८ व्या क्रमांकावर असून स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावर आहे. ------------------------------------------------------------ ❓ प्रश्न: १७ सप्टेंबर २०२५ रोजी साजऱ्या झालेल्या जागतिक रुग्ण सुरक्षा दिनाची संकल्पना काय होती? (a) सुरुवातीपासून रुग्णांची सुरक्षा! (b) औषधे आणि निदानाची सुरक्षितता (c) आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षितता (d) रुग्ण आणि कुटुंबाची सहभागिता ✅ उत्तर: (a) ℹ️ स्पष्टीकरण: २०२५ ची संकल्पना "सुरुवातीपासून रुग्णांची सुरक्षा!" होती. ------------------------------------------------------------ ❓ प्रश्न: १७ सप्टेंबर २०२५ रोजी कोणत्या देशाने राष्ट्रीय शोकदिन म्हणून हा दिवस घोषित केला? (a) श्रीलंका (b) भूतान (c) नेपाळ (d) बांगलादेश ✅ उत्तर: (c) ℹ️ स्पष्टीकरण: नेपाळने आंदोलनात मृत्यू पावलेल्या ७३ जणांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय शोकदिन घोषित केला. ------------------------------------------------------------ Join : https://whatsapp.com/channel/0029Vb6YIw9A89McXe6ytC3v