tgindex
1 611
подписчиков
Охват к подписчикам
126,6%
ERR
Реакции к просмотрам
0,72%
295 на 20 постов
Пересылки к просмотрам
0,00%
2
Постов в день
0,0
всего 20

Где отзываются чаще

доля реакций к просмотрам
  • 22 нояб. 2024 г.नमस्कार मंडळी! गेल्या काही दिवसांतील कामाचे व्याप आणि त्यानंतर इलेक्शन ड्युटीमुळे मला ट्विटरवर येणे शक्य झाले नाही. त्यात घर बांधायचे काम सध्या हाती घेतले आहे, त्यामुळे अजूनच अवघड झाले आहे. पण याकाळात मी तुम्हा सर्वांना आणि ट्विटरला मिस करत होतो एवढं मात्र नक्की. म्हणूनच, आता आमच्या 'सौ' ट्विटरवर पदार्पण करत आहेत. तसा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे, पण ट्विटर वर काम कसं होतं? हे त्यांनी मी काम करत असताना जवळून बघितलं आहे. बाकी, वेळ मिळेल तसा मीही त्यांच्या या कार्यात मदत आणि सहभाग दोन्ही देणार आहेच. मला तुम्ही सगळ्यांनी नेहमीच पाठबळ आणि प्रोत्साहन दिले आहे. याही वेळी द्याल असा मला विश्वास आहे. पण, त्याहूनही जास्त मला या गोष्टीचा विश्वास आहे की माझ्याकडून खंड पडलेले काम पुढे नेण्यासाठी, आमच्या सौ. प्रयत्नांत तरी 100% कमी पडणार नाहीत. त्यासाठी त्यांना भले मलाच घोडे लावावे लागले तरी बेहत्तर..😬 असो! आशीर्वाद राहुद्या..🙏🏼 Profile Link👇 https://x.com/MHNewsBuzz1,78%
  • 13 мая 2024 г."नेहरूंनी केलेल्या चुकांसाठी काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जबाबदार धरतेय." -मंत्री एस. जयशंकर1,42%
  • 13 мая 2024 г."मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पोलिसांच्या मदतीने पैसे वाटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला नुसतं ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी कायद्याचा आदर राखायला हवा आणि या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहायला हवं. राधाकृष्ण विखे पाटलांचा चिरंजीवांना म्हणजेच सुजय विखे पाटलांना अहमदनगरमध्ये खुलेआम पैसे वाटताना पकडलं आहे. त्यांनी मतदारसंघात लाखो रुपये वाटले ते आता समोर आलं आहे, हीच स्थिती नाशिक आणि रायगडची देखील आहे." -खासदार संजय राऊत1,40%
  • 13 мая 2024 г."रायबरेली ही माझ्या दोन्ही मातांची कर्मभूमी आहे, त्यामुळे मी येथून निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे." -कॉंग्रेस नेते राहुल गांधी1,35%
  • 13 мая 2024 г."महाराष्ट्रात भाजपाप्रणीत एनडीएला तब्बल २० जागांचा फटका बसू शकतो, असा अंदाज योगेंद्र यादव यांनी वर्तवला आहे. सध्या राज्यातल्या ४८ जागांपैकी ४२ जागा एनडीएकडे असून त्यातल्या त्यांच्या २० जागा कमी होणार आहेत, असे ते म्हणाले.0,88%
  • 13 мая 2024 г."2024 ची लोकसभा निवडणूक ही विचार विरुद्ध अहंकाराची लढाई आहे. महाराष्ट्रात मी प्रचारासाठी फिरलो तेव्हा सर्वत्र नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तीव्र संताप लोकांमध्ये दिसला. महायुतीला अहंकार आहे, त्यांच्या राज्यात 45 प्लस जागा येतील अशी त्यांची मस्ती होती. इस बार 400 पार अशी घोषणा देणाऱ्या भाजपाला इस बार भाजप तडीपार असा नारा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आणि तो आवाज देशात घुमला. महाराष्ट्रात 36 सभा मोदी आणि शाह घेतील, पण महाविकास आघाडीच्या राज्यात 36 प्लस जागा येतील." -शिवसेना UBT आमदार भास्कर जाधव0,80%
  • 13 мая 2024 г.मुंबईतील घाटकोपर इथं लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १०० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती असून आतापर्यंत जवळपास ५० जखमींना बाहेर काढण्यात यश आलं आहे. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच होर्डिंगखाली अडकलेल्या इतर नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अॅक्शन मोडवर असून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.0,71%
  • 13 мая 2024 г."राज्यात चारही टप्प्यात झालेले मतदान महायुतीला अनुकूल असून चौथ्या टप्प्यापर्यंत चांगले यश महायुतीला मिळेल असा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत सभा होत असून या सभेचे नियोजन तिन्ही पक्षांचे नेते करत आहेत. मी स्वतः बुधवारी कल्याण येथील सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे. मोदींची मुंबईतील सभा यशस्वी करणे हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे व घटक पक्षाचे कर्तव्य आहे." -राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे0,58%
  • 13 мая 2024 г.दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी एका जैन मंदिरात छोटेखानी सभा घेण्यात आली. या सभेत नयपद्मसागरजी यांनी मुंबईतल्या जैन बांधवांना भाजपाला मतदान करण्याचं आणि महायुतीच्या पाठिशी उभं राहण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र आहे तर भारत आहे. महाराष्ट्रात मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. धूप मे तपना मंजूर है पर नरेंद्र मोदीजी को एक वोट कम गिरना मंजूर नहीं असंही वक्तव्य त्यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी विषाचा घोट घेतला आहे. फडणवीस महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत कोणी महाराष्ट्राच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही. फडणवीस यांनी ज्यांना साथ दिली, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला, असे आचार्य नयपद्मसागरजी महाराज यांनी म्हटले. दक्षिण मुंबईमध्ये भाजप मोठ्या प्रमाणात महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना जिंकून आणण्यासाठी कामाला लागलेली आहे. या मोहीमेतंर्गत सोमवारी विशेष संपर्क अभियान जैन मंदिरात पार पडले. या अभियानाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव आणि मंत्री मंगल प्रभात लोढा हे उपस्थित आहेत. दक्षिण मुंबईतील जैन मतदार महायुतीकडे वळवण्यासाठी विशेष संपर्क अभियान आज राबवले जात आहे.0,54%
  • 13 мая 2024 г."विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जागा आहेत तर शेवटच्या टप्प्यात मुंबईसह ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक आहे त्यामुळे आणखी वेग येईल. महायुतीची लाट आहे असे विरोधक म्हणणार नाहीत, ते स्वाभाविकच आहे. त्यांना कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवायचे असल्यामुळे आणि पाचव्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार लढत असल्यामुळे मतदारांच्या मनात किंवा कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास टिकून रहावा या हेतूने त्यांनी ते वक्तव्य केले जात आहे. पण यापेक्षा ग्राऊंड रिअ‍ॅलिटी फार वेगळी आहे." -राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे0,50%
  • 13 мая 2024 г.घाटकोपर! “घटना अतिशय दुर्दैवी आहे. अधिकाऱ्यांना तातडीने सूचना दिल्या आहेत. जवळपास 57 लोकांना बाहेर काढलं आहे. अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व रेस्क्यू टीम काम करत आहे. नागरिकांना आधी बाहेर काढलं जाईल. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. होर्डिंगविषयी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. अनधिकृत होर्डिंगवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या दुर्घटनेत मृतकांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांच्या मदत केली जाईल. तसेच या दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.0,40%
  • 13 мая 2024 г."मतदारांमधील उत्साह पाहता महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझा विजय होईल. पार्थ पवार यांचा २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाला. याबद्दल अद्यापही मनात दुःख आहे. तेव्हा मी राष्ट्रवादी पक्षाचा शहराध्यक्ष होतो." -महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे0,34%