🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨
СтатистикаCOMBINE MENTOR टीम. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हक्काचं व्यासपीठ..!!❤️ या एकत्र लढू परीक्षेशी आणि परिस्थितीशी सुद्धा..!!🌿 App Link👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml 👉अधिक माहितीसाठी - 8308598007 I'd - @Combinementortop1
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 20:10
- Постов за неделю
- 15
- Всего постов
- 38
- Тип
- открытый
- Язык
- английский
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 12 авг.
- 1/24сутки в ленте
- 17 887
- 1/48двое суток
- 21 277
- 1/72трое суток
- 22 947
Медиана по постам, которые мы застали свежими и померили через сутки.
Посты
https://www.youtube.com/live/9MwevDMLGRM?si=LSmN-b7V0Bs8nQqZ STI करीना कोळी Live🤞🏻 वडील रिक्षाचालक,कठीण परिस्थितीवर मात करून वयाच्या 22 व्या वर्षी अधिकारी ❤️
शेवटी संयमाचा विजय झाला..!!❤️ 2024 च्या जाहिरातीतून CMO ची करीना गंगाराम कोळी STI झाली. 2024 ची तिची पहिलीचं पूर्व परीक्षा होती, पूर्व परीक्षा देऊन ती मुख्य परीक्षेला पात्र झाली. मुख्य परीक्षाही अतिशय ताकदीने दिली आणि 400 पैकी 276 मार्क्स घेतले. STI होईल…
ही 1 mb ची Pdf इकडचं आयुष्य तिकडं करून टाकते. या Pdf मधील प्रत्येक मुलगा आत्तापर्यंत विद्यार्थी होता आणि ही Pdf आल्यापासून तो महाराष्ट्र शासनाचा अधिकारी झाला. यावेळी कुणाचे वडील शेतात काम करत असतील तर आई घरातील आवरावर करत असेल आणि आत्ता त्यांना एक फोन जाईल पण हा फोन नेहमीप्रमाणे नसेल. या फोनला आनंदाच्या अश्रूचा हुंदका असेल आणि रडत रडत सांगितलं जाईल की आई/पप्पा मी अधिकारी झालो/झाले.🤞🏻 50-55 वर्षाच्या बापाला त्याच्या आयुष्यात आज पहिल्यांदा गाढ झोप लागेल❤️ @रेवण..
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
ASO निवड यादी 2025👆
बऱ्याच प्रयत्नानंतर ईश्वरपूर शहरात CMO चे समन्वयक महेश चव्हाण सर यांच्या मदतीने ऑफलाईन टेस्ट सिरीज घेण्यासाठी व्यवस्था झाली आहे.गेले 3 दिवसांपासून सातत्याने महेश सरांनी केलेली मेहनत यशस्वी झाली.आयोग ज्या पद्धतीने नियोजन करते त्या पद्धतीने 150 विद्यार्थी बसतील असे दर्जेदार नियोजन केले आहे. आज सायंकाळी 5:00 वाजता ईश्वरपूर शहरासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु होईल..🙏
2021 ते 2026 या वर्षांत गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी विचारलेले भूगोल विषयाचे PYQ एकत्रित करून दिले आहेत 🌿 बदलत्या प्रश्नांचा अंदाज यावा यासाठी प्रत्येक विषयाला 2021 पासून 2026 पर्यंत जोडून देतं आहोत.भूगोल विषय अभ्यासताना हे प्रश्न एकत्रित रित्या नक्की पहा ज्यामुळे प्रश्न कसा विचारला जातो,प्रश्नांची बदलती पद्धत,प्रश्नात कुठे चुकवले जाते आणि आयोगाची उत्तर देण्याची पद्धत काय आहे हे सहजरित्या समजेल.आयोगाने विचारलेले प्रश्न सातत्याने पहा, निरीक्षण करा,ज्यामुळे झालेला बदल तुम्हाला जाणवेल आणि येणाऱ्या परीक्षेत खात्रीशीरपणे फायदा होईल. विशेष म्हणजे आयोगाची चौकट लक्षात येईल..!! या पद्धतीने प्रत्येक विषयाची Pdf तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल,तूर्तास CMO नोट्स या व्यासपीठाशी जोडून राहा 👇 https://t.me/CMOnotes1
आठवड्याभरातील CMO नोट्स 🌿 पार्ट - 8 जपून ठेवा 🙏🏻 Join CMO Notes 👇 https://t.me/CMOnotes1
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 तलाठी | लिपिक | AMVI टेस्ट सिरीज आयोगाची प्रश्न विचारण्याची बदलती पद्धत पाहता आपण टेस्ट सिरीजमध्ये योग्य तो बदल केला आहे. गेले 3 महिन्यापासून टेस्ट सिरीज वरती CMO टीम अतिशय बारकाईने काम करत आहे. 2021 पासून 2026 पर्यंत प्रत्येक विषयात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची रचना, झालेला बदल काळजीपूर्वक लक्षात घेतला आहे.PYQ फिरवून विचारण्याची आयोगाची पद्धतही लक्षात घेतली आहे. कोणत्या विषयात कश्या पद्धतीने चालू घडामोडीची जोड दिली जातेय यावर भयंकर काम केलं आहे आणि यानंतर आम्ही सगळे सरावाची मोहीम घेऊन तुमच्यापर्यंत येत आहोत. टेस्ट सिरीजच्या विश्लेषणामधून केवळ ज्ञान देणं हा हेतू नसेल तर प्रश्न कसा सोडवायला हवा होता, नमूद प्रश्नाला धरून अजून कसा प्रश्न तयार होऊ शकतो, कशा प्रकारचे प्रश्न सोडवले नाही पाहिजेत या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा होणार आहे कारण इथूनपुढे योग्य ज्ञानाबरोबर पेपरमधील चढ-उतार देखील समजून घ्यावे लागतील. इतकंच सांगेन की, तुमचा सराव सर्वोत्तम करून घेण्याची जबाबदारी आमची असेल ज्यामुळे पूर्व परीक्षा पास होण्याची तुमची बाजू भक्कम होईल.🙏🏻❤️ प्रवेश सुरु आहेत 👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
2021 ते 2026 या वर्षांत गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी विचारलेले इतिहास विषयाचे PYQ एकत्रित करून देतं आहे, जेणेकरून तुम्हाला आयोगाची बदलती प्रश्नांची पद्धत समजेल.आपण नेहमी वर्षानुसार एक एक पेपर पाहत असतो किंवा सोडवतो त्यामुळे आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत कशी बदलत चालली आहे याचा फारसा अंदाज येतं नाही म्हणून बदलत्या प्रश्नांचा अंदाज यावा यासाठी प्रत्येक विषयाला 2021 पासून 2026 पर्यंत जोडून देतं आहोत.दिवसभरात एकदा तरी हे प्रश्न एकत्रित रित्या नक्की पहा ज्यामुळे प्रश्न कसा विचारला जातो, प्रश्नात कुठे चुकवले जाते आणि आयोगाची उत्तर देण्याची पद्धत काय आहे हे पटकन समजेल. आयोग बदलतंय तसं आपल्यालाही बदलायला हवं.आयोगाने विचारलेले प्रश्न सातत्याने पहा, निरीक्षण करा, तुम्हाला नक्की फायदा होईल आणि योग्य वेळी स्वतःमध्ये केलेला योग्य बदल खूप फायदेशीर असतो हे विसरू नका. या पद्धतीने प्रत्येक विषयाची Pdf तुमच्यापर्यंत पोहचवली जाईल तोपर्यंत 'CMO नोट्स ' या व्यासपिठाशी जोडून राहा 👇🏻 https://t.me/CMOnotes1
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 टेस्ट सिरीज तलाठी | लिपिक | AMVI | इतर पदे 👉प्रवेश- 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 पासून. 👉 23 ऑगस्ट रोजी पहिला टेस्ट पेपर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पार पडेल. 👉ऑफलाईन परीक्षा केंद्र …
5 मार्च 2026 ला 2024 मधील पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाचा निकाल लागला.CMO चे अनेक जण यशस्वी झाले आणि त्याचा आनंदही साजरा केला. पण या दरम्यान CMO ची करीना कोळी PSI होता होता राहिली होती. मुख्य परीक्षेला जवळपास 50 मार्क्सची लीड होती त्यामुळे मुलींमधून महाराष्ट्रात पहिली येईल असंही वाटत होतं पण ग्राउंडला 1 मार्क कमी मिळाला आणि सगळा प्रवास तिथंचं थांबला. 6 मार्च 2026 ला करीना तिचे मुख्यचे दोन्ही पेपर घेऊन ऑफिसला आली होती. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास अजिबात कमी झाला नव्हता.अजून कष्ट करायचे आहेत हे तिच्या बोलण्यातून सातत्याने जाणवतं होतं. तिची धडपड, तिचा आत्मविश्वास पाहून जाता-जाता तिला हे वाक्य माझ्या हाताने लिहून दिलं होतं. खरंतर आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांना आधार आणि दिशा देण्यासाठी गेले 3 वर्षांपासून मी सातत्याने लिहतोय पण आज करीनाच्या निकालामुळे माझं लिखाण यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही.❤️ @रेवण..
शेवटी संयमाचा विजय झाला..!!❤️ 2024 च्या जाहिरातीतून CMO ची करीना गंगाराम कोळी STI झाली. 2024 ची तिची पहिलीचं पूर्व परीक्षा होती, पूर्व परीक्षा देऊन ती मुख्य परीक्षेला पात्र झाली. मुख्य परीक्षाही अतिशय ताकदीने दिली आणि 400 पैकी 276 मार्क्स घेतले. STI होईल असं वाटतं होतं पण PSI होईल याची खात्री होती. ग्राउंड Qualified होण्यासाठी केवळ 60 मार्क्स लागत होते,त्यासाठी मेहनतही केली पण 400 मीटर धावताना 1 सेकंद जास्त लागला आणि 6 मार्क्स हातातून गेले. ग्राउंडला 100 पैकी 59 मार्क्स आले आणि करीना ग्राउंड मधून बाहेर पडली.म्हणजेचं 1 मार्कने PSI पोस्ट हातातून गेली होती. त्यावेळी सगळंच संपल्यासारखं झालं होतं.ती पुन्हा उभी राहिली, आमचं बोलणं झालं, नियोजन करून पुन्हा तयारीला सुरवात केली. यावेळी 2025 ची पूर्व पास आहे आणि मुख्यलाही चांगले मार्क्स आहेत (निकाल अजून लागला नाही ). 1 मार्क्सने निकाल गेल्यावर पुन्हा उभं राहणं सोपं नसतं त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि संयम असावा लागतो. आजचा निकाल CMO परिवारासाठी अतिशय आनंद देणारा आहे कारण तिचं प्रत्येक पाऊल CMO ने खूप जवळून पाहिलं आहे.हा निकाल कधीही विसरता येणार नाही. पूर्व परीक्षा देणाऱ्या मुलांना फायदा व्हावा म्हणून मागच्या 8 दिवसापूर्वी तिने YouTube ला लेक्चर घेतलं पण काही लोकांनी तिची भाषा काढली, प्रिलीम दिलीस म्हणजे अधिकारी झालीस असं नसतं हे या पोरीला कोणी तरी सांगा अशाही Comment पहायला मिळाल्या, काहींनी तर मॅडम जेवत जावा असं म्हणून तीची तब्बेतही काढली पण या सगळ्याचं उत्तरं म्हणजे आज तिला मिळालेलं यश आहे🤞🙏 आज CMO परिवार आभाळाएवढा समाधानी आहे..!! @रेवण..
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 टेस्ट सिरीज तलाठी | लिपिक | AMVI | इतर पदे 👉प्रवेश- 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 पासून. 👉 23 ऑगस्ट रोजी पहिला टेस्ट पेपर अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पार पडेल. 👉ऑफलाईन परीक्षा केंद्र - पुणे, छ. संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड. 👉ऑनलाईन टेस्ट सिरीजसाठी प्रवेश घेतल्यानंतर टेस्ट पेपरची प्रिंट काढून तुम्हाला सोडवता येईल. 👉अभ्यासाबरोबर योग्य सराव आणि त्याचे विश्लेषण अतिशय महत्वाचे असते म्हणून प्रत्येक टेस्ट पेपर मधून आयोगाची चौकट गांभीर्याने जपली आहे ज्यामुळे तुमच्या चुका सुधारतील व आत्मविश्वासात भर पडेल. 👉बदलत्या पेपर रचणेनुसार पेपर तयार करण्यात आले आहेत त्यामुळे टेस्ट पेपर सोडवताना आयोगाचा पेपर सोडवतोय अशी जाणीव निश्चितपणे होईल. 👉ही मोहीम अधिक निर्णायक असेल कारण टेस्ट पेपर व त्याच्या विश्लेषणामधून तुमचा प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि अवघड भाग सोपा वाटायला लागेल.. @येत्या 23 ऑगस्टपासून आयोगाच्या चौकटीत भेटूयात..योग्य सरावासाठी या मोहिमेत अवघे अवघे सहभागी व्हा..!!🌿❤️ प्रत्येक पेपरचा दर्जा पाहण्यासारखा असेल 🙏 ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी आपले Combine Mentor Official हे APP Download करा 👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.kitml
थकल्यासारखं वाटतंय का?? वाटणारचं ना.. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हातात काहीतरी मिळावं म्हणून धडपडतोय तू... डोळे दुखतं असतील, बसून बसून पाठीची चाळण झाली असेल पण याचं वाईट वाटून घेऊ नको कारण हिचं मेहनत डिसेंबर नंतर तुझ्या चेहऱ्यावर वेगळाचं रंग आणणार आहे. वाट्टेल तेवढी मेहनत घे, जे-जे करता येईल ते ते सगळं कर,मेहनत घेतल्यावर कोणीही मरत नाही उलट माणसाचा आत्मविश्वास जिवंत होतो.'ही वेळ पुन्हा कधीही नाही' हे वाक्य विसरलास तर तू भरकटून जाशील. यावर्षी तुझ्या आजूबाजूचे बरेचजण यशस्वी होऊन किनाऱ्यावर पोहचणार आहेत आणि तुही त्यांच्यातलाचं एक असावास असं मला मनापासून वाटतं. नेहमीपेक्षा संधी मोठी आहे. मेहनतीत कमी पडू नको.स्वतःचे लाड बंद कर. नियोजन करून अभ्यास कर.मोबाईल पासून जास्तीत जास्त लांब राहा.वेळेचं सोनं कर.बरेच दिवस मित्रांच्या गुलालात नाचलास यावर्षी तुझ्या गुलालात नाचायची संधी मित्रांना दे. आई-बापाच्या चेहऱ्याला गावच्या यात्रेतला गुलाल सोडून दुसरा कोणताचं गुलाल आजपर्यंत लागला नाही आणि तुझ्या यशाचा गुलाल त्यांच्या निरागस चेहऱ्याला लागला तर तुझ्या नजरेतला सर्वात सुंदर चेहरा तोचं असेल. माझ्या शुभेच्छा कायम तुमच्या सोबत आहेत ❤️ @रेवण..
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2026 'सरावाची मोहीम' आयोगाच्या चौकटीसह लवकरचं भेटूयात..!! टेस्ट पेपरचा दर्जा पाहण्यासारखा असेल..🙏
видео или голосовое, без подписи
मेंटरशिप प्रोग्राम सराव टेस्ट 4 (WEEKLY) विषय- भूगोल (प्रश्नपत्रिका )
प्रत्येक विषयातील 'आयोगाच्या चौकटीत' असणाऱ्या टॉपिकच्या PYQ ला धरून नोट्स काढणं अतिशय महत्वाचं असतं. नोट्स काढणं प्रचंड कष्टाचं काम आहे आणि कष्ट केल्याशिवाय इथं काहीही मिळतं नाही हे तुम्ही सगळेजण जाणता. परीक्षेच्या अंतिम टप्प्यात आपल्याला प्रत्येक विषय 1-2 दिवसात पूर्ण करायचा असतो पण तुम्ही जर पुस्तकं वाचत बसलात तर तो विषय पूर्ण होणार नाही. त्यासाठी या पद्धतीच्या नोट्स तयार करणं गरजेचं असतं. कष्टाची तयारी + योग्य दिशा = निकाल 🙏🏻 @CMO नोट्स.