Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी
Статистика- Последний пост
- 17 июл.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 27
- Тип
- открытый
- Язык
- und
- Категория
- Новости и СМИ (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
https://www.facebook.com/share/1Coka2jN8z/
без подписи
без подписи
без подписи
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा आतापर्यंतचा सामाजिक-राजकीय प्रवासाचा एक संक्षिप्त आढावा. 🔹१९८२ बहिष्कृत हितकरणी सभेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात 'सम्यक समाज आंदोलन'तून सामाजिक-राजकीय प्रवासाला सुरुवात 🔹१९८३ २ ते ८ मार्च 'सम्यक समाज आंदोलन' तर्फे शेतकरी, भूमिहीन व महिलांच्या प्रश्नांसाठी पहिला नाशिक ते मुंबई लॉग मार्च काढला 🔹१९८४ दलित पँथरमधील ज्येष्ठ सहकाऱ्यांसोबत भारतीय रिपब्लिकन पक्षाची (भारिप) स्थापना केली 🔹१९८५ १०-१७ नोव्हेंबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 'पुणे-माणगाव' पदयात्रा; साखर अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्याची मागणी. या आंदोलनामुळे ऊसाला रास्त भाव व कारखान्यांतील राखीव जागा भरल्या गेल्या #PrakashAmbedkar #BalasahebAmbedkar #स्वाभिमानी_दिन https://www.facebook.com/share/1Do7sg39BE/
без подписи
без подписи
📍मुंबई प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस प्रकाशित आणि फारुख अहमद लिखित मुसलमानों का सियासीअजेंडा या पुस्तकाचे प्रकाशन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रबुद्ध भारतचे संपादक ॲड. प्रकाश आंबेडकर त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. #Mumbai https://www.facebook.com/share/p/1GYZMrtxsB/
10 मे - स्वाभिमानी दिन वंचित-शोषित, जाती समूहांना राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे आग्रही, लोकशाहीचे सामाजिकरण करून स्वतंत्र आंबेडकरवादी राजकीय पक्ष मजबूत करणारे, संविधानिक हक्क-अधिकारांचे रक्षणकर्ते, अन्यायाविरुद्ध रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढणारे वकील, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! #PrakashAmbedkar #BalasahebAmbedkar #स्वाभिमानी_दिन https://www.facebook.com/share/1BWsE48PhE/
सर्वांना बुद्ध जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!! आज जगात जेव्हा संघर्षांना हिंसक उत्तर दिलं जात आहे, तेव्हा बुद्धांचा मार्ग आपल्याला संवाद, समजूतदारपणा आणि मानवतेसाठी आवश्यक आहे. एकता जपताना, सामाजिक सलोखा टिकवताना आणि संविधानिक मूल्यांना बळकट करताना बुद्धांचे विचार मार्गदर्शक आहेत. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर उभ्या असलेल्या आपल्या लोकशाहीला अधिक मजबूत करण्यासाठी आणि जगाला शांततेचा संदेश देण्यासाठी आज वैशाखी पौर्णिमेच्या निमित्ताने तथागत बुद्धांची जयंती साजरी करताना जगात शांतता नांदावी, मैत्रीभाव वाढीस लागावा अशी प्रार्थना करूया. द्वेष, हिंसा आणि अन्याय यांना ठामपणे नकार देऊया...मानवता पेरूया..! बुद्धांच्या विचारांनी देशाला आणि जगाला शांतता, स्थैर्य आणि प्रगतीचा मार्ग मिळो, हीच मंगलकामना. #बुद्ध_जयंती https://x.com/i/status/2050046788875522318
कामगार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आज कामगार दिन. कामगारांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला नवी धार देण्याचा आजचा दिवस आहे. घाम गाळून देश उभा करणाऱ्या कष्टकरी हातांना आज सलाम करण्याचा दिवस आहे. बाबासाहेबांनी भारतातील कामगार चळवळीला दिशा दिली आणि कामगारांना माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. मात्र, आज वास्तव वेगळं आहे. कंत्राटीकरण, रोजगारातील असुरक्षितता, वेतनातील असमानता आणि कामगार कायद्यांतील बदल यामुळे कामगार पुन्हा एकदा संकटात आहेत. प्रत्येक शहरातील मजूर अड्ड्यावर रोजीरोटीचा सवाल करत हजारो कामगार गर्दी करत आहेत. अशावेळी कामगारांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. रस्त्यावरच्या आंदोलनापासून ते धोरणात्मक पातळीवरील लढ्यापर्यंत पक्षाने सातत्याने कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे आणि पुढेही उठवत राहील. कामगारांचा सन्मान हा केवळ भाषणांतून नाही, तर धोरणांत आणि कृतीत दिसला पाहिजे हा आमचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच कामगारांना न्याय, हक्क, अधिकार, सुरक्षितता आणि सन्मान मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे. या कामगार दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा, हक्कांसाठी लढण्याचा संकल्प करूया. कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! #worldlabourday #LabourDay #कामगार_दिन https://x.com/i/status/2050054549709390144
без подписи
без подписи
📍चैत्यभूमी आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अभिवादन केले. #BhimJayanti #भीमजयंती https://www.facebook.com/share/p/18LSGdN7zG/
१ एप्रिल १९३५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना भारतीय रिझर्व बँक कायदा १९३४ नुसार झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रचना आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्राॅब्लम ऑफ रूपी : इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन ’ या पुस्तकातून घेतले आणि हिल्टन यंग आयोगाकडे सादर केले. या बँकेची संस्थापना १९२६ च्या राॅयल संस्थेच्या शिफारशीच्या आधारे झाली. अर्थतज्ज्ञ डॉ. बाबसाहेब आंबेडकरांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापना दिनानिमित्त विनम्र अभिवादन..! #DrBabasahebAmbedkar #रिझर्व्ह_बँक_ऑफ_इंडिया #RBI https://www.facebook.com/share/1DAdFdBErc/