Jitendra Rasal's SMART VISION
Статистика👨🏫 जितेंद्र रसाळ सर 📚 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक 👉 SMART VISION 📚 Science, Maths & Reasoning साठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम प्लॅटफॉर्म - MPSC, सरळसेवा, आरोग्य विभाग भरती 📞 संपर्क करा: 7666849775 👉 You Tube: https://www.youtube.com/@SmartVisionRa
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 2
- Всего постов
- 24
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 494
- 1/48двое суток
- 566
- 1/72трое суток
- 610
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण विज्ञानाची परिपूर्ण Newton Batch फक्त 150 मध्ये. Newton Batch वैशिष्ट्ये: 👉संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2026 👉15 प्रश्नांची परिपूर्ण तयारी 👉Basic पासून Advance पर्यंत शिकवणी 👉Topic Wise लेक्चर्स 👉MPSC Pattern नुसार PYQ वर भर . 👉 संपूर्ण बॅच फक्त 150 मध्ये. Batch Link: https://visionscience.akamai.net.in/new-courses/18 @JitendraRasal
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा! स्वातंत्र्य दिन चिरायू होवो! माझा देश, माझा अभिमान ! जय हिंद! 🇮🇳
स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण विज्ञानाची परिपूर्ण Newton Batch फक्त 150 मध्ये. Newton Batch वैशिष्ट्ये: 👉संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2026 👉15 प्रश्नांची परिपूर्ण तयारी 👉Basic पासून Advance पर्यंत शिकवणी 👉Topic Wise लेक्चर्स 👉MPSC Pattern नुसार PYQ वर भर . 👉 संपूर्ण बॅच फक्त 150 मध्ये. Batch Link: https://visionscience.akamai.net.in/new-courses/18 @JitendraRasal
स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण विज्ञानाची परिपूर्ण Newton Batch फक्त 150 मध्ये. Newton Batch वैशिष्ट्ये: 👉संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2026 👉15 प्रश्नांची परिपूर्ण तयारी 👉Basic पासून Advance पर्यंत शिकवणी 👉Topic Wise लेक्चर्स 👉MPSC Pattern नुसार PYQ वर भर . 👉 संपूर्ण बॅच फक्त 150 मध्ये. Batch Link: https://visionscience.akamai.net.in/new-courses/18 @JitendraRasal
महत्वाचा ग्रंथी, संप्रेरके व त्यांचे उपयोग @JitendraRasal
तुमच्या सेवेत 4 Augest रोजी, 🎯Selection Batch🎯 ✔️100 प्रश्नांची परिपूर्ण तयारी ✔️Basic पासून Advance पर्यंत शिकवणी ✔️Topic Wise लेक्चर्स ✔️MPSC Pattern नुसार PYQ वर भर ✔️Approach तयार करण्यावर भर ✔️PDF स्वरूपात नोट्स 🛑आताच Play Store वर जाऊन Application Download करून ठेवा ✅ Link - https://play.google.com/store/apps/details?id=com.sk.polity
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2026 च्या परीक्षा पद्धतीसंदर्भात आणि सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) संवर्गाकरीता पदवीच्या अंतिम वर्षास असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
५ मुख्य सृष्टी (The Five Kingdoms) १. सृष्टी मोनेरा (Kingdom Monera) वैशिष्ट्ये: हे सर्व सजीव एकपेशीय आणि आदिकेंद्रकी (Prokaryotic) असतात. यांच्या पेशींमध्ये स्पष्ट केंद्रक किंवा पेशीअंगके नसतात. हे स्वयंपोषी किंवा परपोषी असू शकतात. उदाहरणे: सर्व प्रकारचे जीवाणू (Bacteria), सायनोबॅक्टेरिया (Blue-green algae). २. सृष्टी प्रोटिस्टा (Kingdom Protista) वैशिष्ट्ये: हे सजीव एकपेशीय परंतु दृश्यकेंद्रकी (Eukaryotic) असतात. म्हणजेच यांच्या पेशीमध्ये स्पष्ट केंद्रक असते. हालचालीसाठी यांना छद्मपाद (Pseudopodia) किंवा रोमके असतात. उदाहरणे: अमिबा (Amoeba), पॅरामेशिअम (Paramecium), युग्लीना. ३. सृष्टी कवक / बुरशी (Kingdom Fungi) वैशिष्ट्ये: हे बहुतांश बहुपेशीय आणि परपोषी (Heterotrophic) सजीव आहेत. हे प्रामुख्याने मृतोपजीवी (Saprophytic) असतात, म्हणजे कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांवर जगतात. यांच्या पेशीभित्तिका 'कायटीन' (Chitin) नावाच्या गुंतागुंतीच्या शर्करेपासून बनलेली असते. उदाहरणे: भूछत्र (Mushrooms), किण्व (Yeast), बुरशी. ४. सृष्टी वनस्पती (Kingdom Plantae) वैशिष्ट्ये: हे बहुपेशीय आणि दृश्यकेंद्रकी सजीव आहेत. यांच्या पेशींमध्ये हरितलवे (Chloroplasts) असल्याने हे प्रकाशसंश्लेषण करून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणजेच स्वयंपोषी असतात. यांच्या पेशीभोवती सेल्युलोजची पेशीभित्तिका असते. उदाहरणे: शेवाळ, नेचे, सर्व फुलणाऱ्या व न फुलणाऱ्या वनस्पती. ५. सृष्टी प्राणी (Kingdom Animalia) वैशिष्ट्ये: हे सजीव बहुपेशीय आणि दृश्यकेंद्रकी असतात. प्राणी पेशींना पेशीभित्तिका नसते. हे पोषणासाठी इतर सजीवांवर अवलंबून असतात (परपोषी) आणि अन्नाचे ग्रहण करतात (Ingestive/Holozoic). बहुतांश प्राणी हालचाल करू शकतात. उदाहरणे: कीटक, मासे, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि मनुष्य. @jitendraRasal
रॉबर्ट हार्डींग व्हिटाकर (R.H. Whittaker) यांनी १९६९ मध्ये सजीवांचे 'पंचसृष्टी वर्गीकरण' (Five Kingdom Classification) मांडले. त्यांनी सजीवांच्या पेशींची रचना, शरीराची गुंतागुंत, पोषणाचा प्रकार आणि जीवनशैली या निकषांच्या आधारे सजीवांची ५ मुख्य सृष्टींमध्ये (Kingdoms) विभागणी केली. वर्गीकरणाचे मुख्य ५ निकष (Criteria for Classification) १. पेशींची रचना (Cell Structure): पेशी आदिकेंद्रकी (Prokaryotic) आहेत की दृश्यकेंद्रकी (Eukaryotic). २. सजीवांचा प्रकार (Body Organisation): सजीव एकपेशीय (Unicellular) आहेत की बहुपेशीय (Multicellular). ३. पोषणाचा प्रकार (Mode of Nutrition): सजीव स्वयंपोषी (Autotrophic) आहेत की परपोषी (Heterotrophic). ४. जीवनशैली (Lifestyle): उत्पादक (Plants), भक्षक (Animals) की विघटक (Fungi). ५. वंशवादात्मक संबंध (Phylogenetic Relationship): आदिकेंद्रकी ते दृश्यकेंद्रकी आणि एकपेशीय ते बहुपेशीय असा उत्क्रांतीचा क्रम.
Eye and Lens Science.pdf
без подписи
ड्रग इन्स्पेक्टर.. 👉 पोलिसांच्या चौकशीचा अंतिम अहवाल येईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित..
गुरुपौर्णिमा निमित्त ॲप वरील सर्व बॅचेस वर सवलत. Coupon code: GURU30 ॲप लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.science @JitendraRasal
🌿MPSC गट क मध्ये.. ● एकूण जागा 3088 (1539 तलाठी भरती सहित) ✌️ ▪️2619 + 3088 = 5707 👉 समान शैक्षणिक अर्हता असणारे सर्व पद गट क मध्ये येत राहतील+++ @JitendraRasal
Tear Gas ⛽ शरीरावर होणारे परिणाम अश्रूधुराच्या संपर्कात आल्यास तात्काळ (काही सेकंदात) खालील लक्षणे दिसू लागतात: डोळे: डोळ्यांची तीव्र जळजळ होणे, सतत पाणी येणे, डोळे लाल होणे आणि तात्पुरते अंधत्व किंवा डोळे उघडता न येणे. श्वसन संस्था: नाकाची आणि घशाची जळजळ, सतत खोकला येणे, छातीत कफ होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे. त्वचा:उघड्या त्वचेवर लालसरपणा येणे आणि खाज किंवा जळजळ होणे. इतर:उलट्या किंवा मळमळ होणे. (साधारणपणे अश्रूधुराचे परिणाम संपर्कातून बाहेर पडल्यानंतर १५ ते ३० मिनिटांत कमी होतात.) अश्रूधुराच्या संपर्कात आल्यास काय करावे? (बचाव व उपाय) १. तात्काळ करायच्या गोष्टी: जागा सोडा: लवकरात लवकर अश्रूधुराच्या धुरापासून दूर आणि मोकळ्या हवेच्या ठिकाणी जा. वाऱ्याच्या दिशेने जा: वाऱ्याचा प्रवाह ज्या बाजूला असेल त्या दिशेने पळा, जेणेकरून धूर तुमच्या पाठीमागे राहील. उंचावर जा: अश्रूधुराचे कण हवेपेक्षा जड असतात आणि ते खाली जमिनीजवळ साचतात; त्यामुळे शक्य असल्यास थोड्या उंच ठिकाणी जा. २. डोळे आणि त्वचेची काळजी: डोळे चोळू नका: डोळे चोळल्यास रसायने अधिक आत जातात आणि जास्त इजा होऊ शकते. स्वच्छ पाण्याने धुवा: डोळे आणि चेहरा भरपूर स्वच्छ पाण्याने किंवा सलाईन वॉटरने धुवा. कपडे बदला:अश्रूधुराचे कण साचलेले कपडे तात्काळ काढून टाका आणि ते अंगावरून न काढता कापून/उघडून काढा जेणेकरून रसायने तोंडाला लागणार नाहीत. साबणाने आंघोळ करा: थंड पाण्याने आणि साबणाने संपूर्ण शरीर स्वच्छ धुवा (गरम पाणी वापरू नका, कारण गरम पाण्याने त्वचेचे छिद्र उघडतात आणि रसायने आत जाऊ शकतात). @JitendraRasal
Tear Gas किंवा अश्रूधूर अश्रूधूर म्हणजे काय? 👉अश्रूधूर (Tear Gas) हे एक रासायनिक शस्त्र किंवा दंगल नियंत्रण साधन (Riot Control Agent) आहे. हे खरोखर वायू स्वरूपात नसून अत्यंत सूक्ष्म घन किंवा द्रव कणांचे (Aerosol) मिश्रण असते. 👉सार्वजनिक ठिकाणी गर्दी पांगवण्यासाठी, दंगल नियंत्रित करण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दले याचा वापर करतात. अश्रूधुरात वापरली जाणारी मुख्य रसायने 1. CS गॅस (Chlorobenzalmalononitrile): हा सर्वात जास्त प्रमाणात वापरला जाणारा अश्रूधूर आहे. 2. CN गॅस (Chloroacetophenone): हा जुना आणि अधिक तीव्र प्रकार आहे. 3. OC गॅस (Oleoresin Capsicum / Pepper Spray): हा मिरचीच्या अर्कापासून बनवला जातो. 4. CR गॅस (Dibenzoxazepine): हा अत्यंत शक्तिशाली अश्रूधूर मानला जातो. @JitendraRasal
धन्यवाद 🌿
आज झालेला महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर @JitendraRasal
महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ साठी सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! Best of Luck 🤞 @JitendraRasal
👉सूर्याएवढी उष्णता निर्माण करणारा एक लहानसा पण आश्चर्यकारक सागरी जीव म्हणजे Pistol Shrimp. दिसायला साधा असला तरी त्याची क्षमता थक्क करणारी आहे. 👉या कोळंबीची खास गोष्ट म्हणजे तिची मोठी नांग्या. ती नांग्या इतक्या वेगाने बंद करते की त्यातून पाण्यात एक शक्तिशाली बुडबुडा तयार होतो. या प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत Cavitation म्हणतात. हा बुडबुडा तयार होऊन लगेच फुटतो, आणि त्यावेळी प्रचंड ऊर्जा निर्माण होते. 👉बुडबुडा फुटताना निर्माण होणारी उष्णता काही क्षणांसाठी जवळपास ४,७००°C इतकी पोहोचते, जी सूर्याच्या पृष्ठभागाइतकी असते. एवढंच नाही, तर या प्रक्रियेमुळे बंदुकीच्या गोळीसारखा मोठा आवाजही निर्माण होतो. हा आवाज आणि धक्का इतका शक्तिशाली असतो की तो लहान मासे किंवा शिकार बेशुद्ध करू शकतो. 👉ही नांग्या फक्त शिकार करण्यासाठीच नाही, तर स्वतःचे संरक्षण करण्यासाठीही वापरली जाते. इतक्या लहान जीवामध्ये एवढी प्रचंड शक्ती असणे हे निसर्गातील एक विलक्षण उदाहरण आहे. @JitendraRasal