tgindex
SHIVSHABD | शिवशब्द

SHIVSHABD | शिवशब्द

Статистика
Последний пост
3 июл.
Последнее чтение
13 авг.
Постов за неделю
0
Всего постов
20
Тип
открытый
Язык
und
В каталоге с
13 авг.
Подписчики
871
0 за 2 дн.
Сутки
0
0,00%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
387
20 постов
Вовлечённость
44,4%
к подписчикам
Постов в день
0,0
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1/48двое суток
1/72трое суток

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • 3 июл.118из rutuja_writes1203

    कमाई किती आहे हे विचारायच्या आधी, त्याची माणुसकी किती आहे हे पाहा. कारण संकट आल्यावर बँक बॅलन्स नाही,तर माणसाचा स्वभाव कामाला येतो.💯💫 @rutuja_writes1203

  • 1 июл.138из rutuja_writes1203

    चांगुलपणा हा बोलण्यात नसून तो माणसात असावा लागतो,कारण कागदी फुलं दिसायला सुंदर असतात, पण सुगंध फक्त खऱ्या फुलांनाच असतो.. @rutuja_writes1203

  • 30 июн.161из rutuja_writes1203

    फोटोतले चेहरे तर फक्त डोळ्यांची भूक भागवतात,नाहीतर गॅलरी फोटोंनी भरलेली असतानाही, त्या एका भेटीसाठी मन इतकं व्याकुळ कशासाठी..?❤️💯 @rutuja_writes1203

  • 28 июн.186из vinayak1432bhise

    ऐक ना गं सखे… मनविद्रोही म्हणून सांगतो… ही दुनिया भारी हिशेबी झाली गं… नात्यातही व्यवहार, प्रेमातही अटी, आणि माणुसकीतही फायदा मोजला जातो… इथं प्रेम करण्याआधी बँक बॅलन्स पाहिला जातो… आणि माणूस समजून घेण्याआधी त्याची औकात तोलली जाते… गरिबाच्या घरचं दुःख कोणाच्या स्टेटसवर झळकत नाही गं… पण श्रीमंताच्या वाढदिवसाचा केक हजारो लाईक गोळा करतो… आईबाप जिवाचं रान करून लेकरांना मोठं करतात… आणि म्हातारपणी त्यांच्यासाठी घरातली एक खोलीही जड वाटू लागते… रक्ताची नाती म्हणवणारेच गरज संपली की परके होतात… आणि परकेच कधी कधी जखमेवर मायेचा हात ठेवून जातात… सखे… आजकाल खोटं बोलणारा हुशार समजला जातो… आणि खरं बोलणाऱ्याला तोंडफाट्या, उद्धट, वेडा म्हणून हिणवलं जातं… माणसाच्या डोळ्यातले अश्रू कोणी पुसत नाही… पण त्याच्या खिशात किती पैसा आहे, याचा हिशेब मात्र सगळे ठेवतात… म्हणून सांगतो गं… ज्याला तुमच्या दुःखापेक्षा तुमच्या पैशात जास्त रस आहे, त्याला आपलं माणूस म्हणायची चूक करू नको… कारण खरी नाती हिशेबाच्या वहीत लिहिली जात नाहीत… ती संकटाच्या काळात खांद्यावर हात ठेवून उभी राहतात… लक्षात ठेव सखे… पैसा घर मोठं करू शकतो… पण मन मोठं करू शकत नाही… संपत्ती माणसं विकत घेऊ शकते… पण विश्वास, प्रेम आणि आपुलकी कधीच विकत घेऊ शकत नाही… ही कविता नाही गं सखे… या हिशेबी दुनियेनं जखमी केलेल्या असंख्य मनांचा आक्रोश आहे… ✍️ मनविद्रोही विनायक भिसे मानसिक आरोग्य समुपदेशक | मानसशास्त्रज्ञ Mo. 077981 50143 #मनविद्रोही #मनविद्रोहीविनायकभिसे #विनायकभिसे #मराठी #मराठीकविता #मराठीगझल #विद्रोही #विद्रोहीलेखन #कडूसत्य #सामाजिकवास्तव #माणुसकी #नाती #प्रेम #विश्वास #स्वाभिमान #जीवनसत्य #दुःख #वेदना #भावना #मानवता #समाज #सामाजिकबदल #मराठीलेखक #MarathiWriter #Vinayakbhise #MarathiPoetry #MarathiQuotes #Trending #ViralPost #ExplorePage

  • 6 мая2802из swapnilpopalgathat

    видео или голосовое, без подписи

  • https://www.instagram.com/p/DXw-DR0iC6P/?igsh=cGk2aGQ0bHpzeHBv

  • कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या "शिवाजी कोण होता?" या पुस्तकावरून सध्या महाराष्ट्रात मोठा वाद सुरू आहे. हे पुस्तक मूळतः १९८८ मध्ये प्रकाशित झाले असून, ३८ वर्षांपासून ते लोकप्रिय आहे. मात्र, अलीकडच्या काही दिवसांत या राजकीय संघर्षामुळे वाद पुन्हा पेटला आहे.

  • “चिऊताईची हाक” आमच्या लहानपणी नाचत नाचत, चिऊताई दारात यायची! चिवचिव करून हळूच काही, आम्हाला गुपित सांगायची..! नाचताना ती पुढे सरकून, डोळ्यांनीच हसायची…! “शाळेला जातो की नाही?” म्हणत, पंख फडफडून विचारायची…! अंगणातला दाणा हळूच टिपायची, आजी वंजळभर अजून टाकायची… तहान लागली की भुर्रकन उडून, माठाच्या पाण्यात चोच मारायची…! सकाळी तिची चिवचिव ऐकून, आम्हांला जाग यायची..! विजेच्या तारेवर मिळून सगळ्या, त्यांची ओळीत पंगत बसायची… क्षणात काही चाहूल लागताच, आकाशात भरारी घ्यायची… शेतातले कीड-कीटक खाऊन, शेतकऱ्यांना ती साथ द्यायची…! चिमणीबरोबर आमची, छानच गट्टी जमायची…! दारात दिसली नाही की ती, “चिऊताई, चिऊताई!” हाक मारायची…! कुठे गेल्या त्या चिमण्या, आता काही कळत नाही…? मोठे झालो आपण सारे, आता तिलाही कोणी हाक मारत नाही…! लेखन..(२५/०२/२०२६) श्री धनंजय म. कांबळे सावळजकर स्थापत्य अभियंता. सावळज, जिल्हा सांगली

  • निवडणूक आली की रस्त्यावर, चौकात झेंडे उगवतात आणि त्याखाली हमरामखोर औलादी टोळक्याने फिरतात कालपर्यंत पोटासाठी धावणारे, आज साहेबांच्या नावानं छाती काढून माज मिरवतात अरे औलादीनो, तुमचं दुःख तरी कधी तुमचंच होतं का? विकास म्हणे… कुठंय तो विकास? शाळा पडकी, दवाखाना बंद, आईबाप कर्जात बुडाले, ना हाताला काम, ना धंदा आणि तुम्ही साहेबांच्या गाड्यांसमोर हात जोडून उभे लाचारासारखे हे कार्यकर्ते नाहीत रे, हे पैशासाठी स्वाभिमान चिखलात फेकणारी औलादी आहेत दिवसा “बाबासाहेब, बाबासाहेब” असं बोंबलतात, आणि रात्री त्याच बाबासाहेबांचं संविधान दारूच्या नशेत चिखलात लोळवतात लाज तरी आहे का रे? अरे नीट ऐका बाबासाहेबांनी झेंडे नाही दिले, त्यांनी डोकं उघडायला विचार दिला पण तुम्ही तो विचार निवडणुकीच्या दिवशी फेकून दिलात, आणि म्हणता “साहेब मोठे आहेत” मोठे नाहीत रे, ते तुमच्या अज्ञानावर राज करणारे लुटारू आहेत झेंडा हातात घेतला म्हणजे कणा आपोआप येत नाही, कणा येतो प्रश्न विचारल्यावर, डोळ्यात डोळे घालून सत्तेला जाब दिल्यावर ही निवडणूक नाही रे, ही बहुजनांच्या बुद्धीवरची नाकेबंदी आहे जिथे मतदानाआधीच पैसे देऊन विचार मारला जातो आणि शेवटचं सांगतो कान उघडे ठेवून ऐका आंबेडकरी चळवळ भिक मागायला शिकवत नाही, ती हक्क मागते, अन्यायाला वाचा फोडते, प्रश्न विचारते आणि वेळ आली तर भिडते ✊ ✍विनायक भिसे, बारामती मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ Mo. 7798150143 #विद्रोह #आंबेडकरीविचार #बहुजनआवाज #संविधान #लोकशाही #बाबासाहेब #शिका_संघटित_व्हा_संघर्ष_करा #निवडणूक #राजकारण #विचारांचा_संघर्ष #ग्रामीण_सत्य #खोटा_विकास #गुलामगिरी #जनतेचा_आवाज #MarathiPoetry #MarathiReels #PoliticalPoetry #RebelPoetry #UndergroundPoetry #VoiceOfPeople #IndianPolitics #Vinayakbhise #महाराष्ट्र #बारामती #बहुजन

  • ऐक ना सखे… श्रावणबाळ होऊनी मला आई-बापाची सेवा करायची आहे, त्यांच्या थकलेल्या श्वासांना माझा श्वास आधार व्हावा म्हणून ऐक ना सखे… आई जेव्हा डोळे पुसत हसते, ते हसू माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं यश असावं ऐक ना सखे… प्रभू श्रीरामासारखं आज्ञाधारी पुत्र बनायचं आहे, जो बापाच्या एका शब्दावर स्वतःचं सुख, स्वप्न, सगळं बाजूला ठेवेल, कर्तव्य म्हणून कधीही तक्रार न करणारा ऐक ना सखे… रावणासारखा बहिणीसाठी सर्वस्व पणाला लावणारा व्हायचं आहे, जग विरुद्ध उभं राहिलं तरी तिच्या अश्रूंना एकटं पडू देणार नाही असा ऐक ना सखे… आणि लक्ष्मणासारखा प्रभू श्रीरामासोबत भाऊ म्हणून कायम सोबत राहणारा, सावलीसारखा दिसत नसला तरी कधीही दूर न जाणारा देव व्हायचं नाही मला सखे, फक्त आई-बापासाठी श्रावणबाळ, बहिणीसाठी रावण, आणि भावासाठी लक्ष्मण म्हणून माणूस राहायचं आहे… ✍🏻 विनायक भिसे, बारामती मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ Mo. 7798150143 #मराठीकविता #मराठीलेखन #viralpost #विनायकभिसे

  • जबाबदारी ही वयानुसार नाही तर क्षमतेनुसार द्यावी जबाबदारीसाठी वय नाही तर ती जबाबदारी पार पाडण्याची क्षमता महत्त्वाची असते. एखाद्या संस्थेत किंवा ऑफिसमध्ये विविध वयाचे,अनुभवाचे लोक एकत्र काम करतात. या सर्वांना कामाचे विभाजन करून देतांना अधिकाऱ्याने किंवा मुख्य व्यक्तीने सर्व सहकार्यांचे मनोबल वाढवून समान कार्य सोपवावे. त्यात वय,शिक्षण, अनुभव ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच परंतु नवीन असलेल्या कर्मचाऱ्यांना अनुभवी कर्मचाऱ्यांच्या सहवासात नविन गोष्टी शिकवून त्यांना त्या लायक बनवावे. वरिष्ठ कर्मचाऱ्यांना वयाचे उदाहरण देऊन नविन कर्मचाऱ्यांना कमी लेखण्याचा बालिशपणा करणे चुकीचे आहे. मुख्य अधिकारी, साहेब,नेता असा असावा जाणे कर्मचाऱ्यांमधील योग्य गुण हेरून त्यांना त्यायोग्य जबाबदारी सोपवावी. तसेच त्यांच्या यशात आपला आनंद मानावा. तेव्हाच एखादी संस्था, कार्यालय प्रगती करेल. नेत्याने निष्पक्ष असावे. आपल्या सहकाऱ्यांचे मनोबल वाढवावे. त्याने चुक एकट्यात सांगावी आणि कौतुक चारचौघात करावे. कौतुक करतांना स्वतःचा कमीपणा न समजता मनाचा मोठेपणा दाखवावा. कर्मचाऱ्याच्या वयावरुन जबाबदारी न ठरवता त्यांच्यातील गुण समजून घेऊन त्यानुसार प्रत्येकाला योग्य तशी जबाबदारी द्यावी. यावरून त्या नेत्याचा कुशल नेतृत्वाचा गुण दिसून येईल. वयाचे टोमणे मारून काही मुख्य सहकारी सहसोबत्यांना सर्वच कामाचा बोजा त्यांच्यावर लादून त्रस्त करत असतात व त्या सहकार्याचे कौतुक तर दूरच पण साधी त्यांच्या चांगल्या कार्याची दखलही घेत नाहीत. अशा वागणुकीवरुन त्या मुख्य नेत्याची नेतृत्व कौशल्याची कमतरता दिसून येते. एक चांगला नेता हा सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन चालणारा असतो व सर्वांचा एक हितचिंतक असतो. जबाबदारी,कार्य कोणतेही असो ते समानतेने वाटून द्यावे. जो नेता,अधिकारी,मुख्य व्यक्ती आपल्या सहसोबत्यांची तुलना वयानुसार नाही तर कौशल्यानुसार करतो तो योग्य नेता समजावा. एखादी जबाबदारी पूर्ण करण्यास अनुभव,वय ह्या गोष्टी आवश्यक आहेतच परंतु ते अनुभव इतरांना प्रशिक्षित करण्यास उपयोगात आणले तर कामाचा बोजा कमी होऊन कार्य चांगल्या पद्धतीने पूर्ण होऊन संस्थेतील, कार्यालयातील वातावरण आनंददायक होईल. अशा ठिकाणी राजकारण दूर ठेवून आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करणे अधिक महत्त्वाचे असते. आपण नेतृत्व करत असलेल्या ठिकाणी विविध वयाचे सहकारी कार्य करत असतात त्या सर्वांना प्रेमाने,आपुलकीने प्रोत्साहित करुन, त्यांच्यातील गुणांचे कौतुक करून कार्य करुन घेतल्यास सर्व कार्य नीटनेटके व आनंदात पार पडेल.... लेखक गजानन दशरथ पोटे अकोला

  • रोहिणी प्रकाशन 🚩 आतापर्यंत 156 पुस्तके महाराष्ट्रभर प्रकाशित !!! *प्रकाशन सोहळा विनामूल्य* ✨ ✨️ *सर्व लेखक / कवी यांच्यासाठी अतिशय अशी सुवर्णसंधी* ✨️ कविता / लेख पुस्तकात प्रकाशित व्हाव्यात अस वाटत असेल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. 1) तुमच्या दोन कविता पुस्तकात प्रकाशित केल्या जातील व 1पानावर तुमचा फोटो असेल. Total तीन page's असतील. 2) तुमच्या कवितेच / लेखाचे सर्व credit तुमचे असेल. 3) तुमचा फोटो पुस्तकात प्रकाशित केला जाईल. 4) तुम्हाला विनामूल्य पुस्तकं देण्यात येईल. 5) तुम्हाला प्रमाणपत्र देण्यात येईल. ( तुम्हाला घरपोच पुस्तकं आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. + Medal मिळेल ) 6) इंस्टाग्राम वर Promotion करण्यात येईल. 7) पुस्तक Amazon वर उपलब्ध करण्यात येईल. 8) Will be Officially Published Writer Under ISBN. 9) Entry fee - 550/ ₹ *पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर 2 आठवड्याच्या आत पुस्तक तुमच्याघरी by Post पाठवण्यात येईल*. इच्छुक असल्यास त्वरित खालील दिलेल्या नंबरवरती मेसेज👇 9067492633 (के.एस.कांबळे) फोन पे नं. 8108975192 (रोहिणी वाघमारे) *धन्यवाद* 🙏 :- Team ROHINI PUBLICATION

  • ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा.

  • किनारा मिळावा.. अंतरात एक अर्थ आहे, जवळ येता स्वार्थ ना तो समजावा..! थोडकेच बोलणे, थोडकेच रुसने, अंतरी दडलेल्या प्रेमाचा अर्थ उमजावा.! पानांत दडून कधी बसू नये,फुलांनी फुलून सुगंध पसरावा.. कोमेजुनी गेल्याच कधी पाकळ्या,वेलीने तिचा विरह का करावा..? नुसतीच सळसळ बरी नव्हे वाऱ्या, तुझ्या स्पर्शाने अंगी शहारा यावा.. नुसताच गुंजतो त्या गोष्टी कानी, कधीतरी त्या सत्यात उत्तराव्या.! विरह कशाचा आणि का करावा,? आठवणीना उजाळा तो द्यावा.! ओघळले जरी पाणी गालावर, तो कशाला कोणा दिसावा? इथे मनाप्रमाणे घडतेच असे काही नाही, भान ठेऊनी ज्या त्या वेळी कित्ता गीरवावा. योजिलेलं जाते सारे पाण्यात मिळूनी, एकदा त्याला किनारा मिळावा..! लेखन.(१४/१०/२०२५) श्री धनंजय म. कांबळे (सावळजकर) स्थापित्य अभियंता. सावळज, सांगली.. @highlight @marathikavita @esahity Maharashtra Times

  • https://youtu.be/cT5VZn722j0?si=N8VbQ5T9YrlWpkUb

  • ये ऐक ना सखे, तुझ्या हास्याने तर रात्रही उजळून निघते, तुझ्या डोळ्यांत बघितलं की मन हरवून जातं कुठेतरी सखे, तुझं नाव घेतास चेहऱ्यावर smile येते माझ्या, तू जवळ असलीस की हृदयाची धडधड वाढते अन् वेळच थांबते सखे, तुझ्या पैंजनाच्या नादात माझं मन हरवून जातं, तु चाललीस की माझं आयुष्यच तुझ्या त्या पावलांत गुंतून जातं सखे, तुझ्या प्रेमात इतका गुंतलोय मी की स्वतःलाच विसरलोय आता, तूच माझं जग, तूच माझं स्वप्न, तूच माझी कविता आहेस तुच माझ्यासाठी सर्वकाही आहेस सखे… 💞 ✍🏻विनायक भिसे, बारामती मानसिक आरोग्य समुपदेशक,मानसशास्त्रज्ञ Mo. 7798150143

  • किनारा मिळावा.. अंतरात एक अर्थ आहे, जवळ येता स्वार्थ ना तो समजावा..! थोडकेच बोलणे, थोडकेच रुसने, अंतरी दडलेल्या प्रेमाचा अर्थ उमजावा.! पानांत दडून कधी बसू नये,फुलांनी फुलून सुगंध पसरावा.. कोमेजुनी गेल्याच कधी पाकळ्या,वेलीने तिचा विरह का करावा..? नुसतीच सळसळ बरी नव्हे वाऱ्या, तुझ्या स्पर्शाने अंगी शहारा यावा.. नुसताच गुंजतो त्या गोष्टी कानी, कधीतरी त्या सत्यात उत्तराव्या.! विरह कशाचा आणि का करावा,? आठवणीना उजाळा तो द्यावा.! ओघळले जरी पाणी गालावर, तो कशाला कोणा दिसावा? इथे मनाप्रमाणे घडतेच असे काही नाही, भान ठेऊनी ज्या त्या वेळी कित्ता गीरवावा. योजिलेलं जाते सारे पाण्यात मिळूनी, एकदा त्याला किनारा मिळावा..! लेखन.(१४/१०/२०२५) श्री धनंजय म. कांबळे (सावळजकर) स्थापित्य अभियंता. सावळज, सांगली.. @highlight @marathikavita @esahity Maharashtra Times

  • https://youtu.be/quZ96Jl5kdw?si=n9nGy0RUPoUiqELC

  • देवाला कुठेच शोधण्याची गरज नाही. 🌸🌿 . . पोस्ट आवडली तर फॉलो करा @shivshabd . . #marathipost #marathiquotes #marathistatus #mimarathi #marathimotivational #artist #shivshabd #marathimulga #marathiactress #maharashtra #ExplorePage #instatrend #photography #shivgond https://www.instagram.com/share/reel/__p_kYJKl

  • #सृष्टी फुल, फुलायचं कधी पैसे मागते, सुगंध दरवळायच काम मात्र ते नियमीत करते.! कधी देवाच्या पायावर,का हारात गुंफायचं,? हे त्या, फुल तोडणाऱ्यावर अवलंबून असते...! मातीचा कोणताही रंग असला तरी, पीक पिकवायचं ती कुठे सोडते...! काय पिकवावं, काय उगवावं, खरंतर हे पेरणावर अवलंबून असते..! कितीही कापली झाड तरी, झाड कुठ प्राणवायूचे पैसे घेते! तुम्ही लावा किंवा तोडा, ते कुठे प्राणवायू दयायचे बंद करते..! कितीही पसरल अंगणी दान तरी, चोचित बसलं तेवढंच चिमणी घेते.! पोट भरलं का एकदाच, ती कुठे पुन्हा दारातील पसरनीवर येते..! काय काय शिकावं सृष्टीकडून, प्रत्येक जीवाकडून काहींतरी शिकायला मिळते.! कसही अन कितीही ओरबडलं निसर्गाला, तरी प्रत्येक माणसाची ओंजळ रिकामी असते..! माणूस म्हणून माणसाने, माणसासारखं जगावे..! वाढवून झाड जपावी ही सुंदर सृष्टी, नाहीतर येणाऱ्या विकोपला हसत भेटावे...! लेखन.(१७/०२/२०२५) इंजि. धनंजय म. कांबळे.(वेध) स्थापत्य अभियंता. सावळज, सांगली. ९८९०३२७५४0 (शहरात विकासाच्या नावाखाली जी झाड तोडली जातात ती वाचवली पाहिजेत किंवा जेवढा तुमचा विकासा मोठा तेवढा त्या विकासकने झाडी लावून जपली पाहिजेत. प्रत्येकाने एक झाड जरी लावले तरी पुढे जाऊन प्राणवायु स्वच्छ मिळेल. झाड लावलं म्हणजे झालं असं न पाहता ते वाढवली जगवली सुद्धा पाहिजेत.)