शब्दांचा जादुगार.....🦋✨
Статистика➡ मराठी Attitude स्टेटस 💯 ➡ मराठी Motivational स्टेटस😇 ➡ ब्रेकअप स्टेटस🖤 ➡ SAD स्टेटस.😔 ➡ LOVE स्टेटस💝 ➡ मराठी कथा...✨ ➡ प्रेरणादायक स्टेटस✨ ➡️ Promotion : @Marathimotivation_7_bot @Prashant_Thakare_07
- Последний пост
- 15 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 25
- Всего постов
- 39
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 412
- 1/48двое суток
- 472
- 1/72трое суток
- 509
Медиана по постам, которые мы застали свежими и померили через сутки.
Посты
без подписи
без подписи
без подписи
शेतकऱ्याच्या कष्टामध्ये, सैनिकाच्या त्यागामध्ये, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांमध्ये, भारत आहे प्रत्येकामध्ये...💞 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 एकतेचा तिरंगा घेऊ, मनामनात भारत ठेवू, धर्म-जाती विसरून सारे, भारतमातेचा जयजयकार करू...💞 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 एक देश, एक भावना, एकतेची नवी ओळख, जगाला दाखवू एकजुटीने, भारताची खरी ताकद...💞 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खुप खुप शुभेच्छा...🌹 ✍🏻 शुभेच्छुक :- नरेंद्र दिपके 🧡🤍💚🧡🤍💚🧡🤍💚🧡🤍💚
без подписи
"आपल्या भारतमातेची गाथा🇮🇳🫡" (नक्की पूर्ण वाचा,स्वातंत्र्यदिनानिमित्त छोटासा प्रयत्न✍🇮🇳) नाही मिळाले हो,आपल्या राष्ट्रास हे स्वातंत्र्यचे दिवस सहजासहज.. क्रांतिकारकांच्या शौर्यापुढे अवघे नतमस्तक झाले इंग्रज!🫡 राष्ट्रासाठी,देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी लावली प्राणांची बाजी.. असे ते भारतमातेचे शुरपुत्र मरणाला तोंड दयालाही झाले राजी!😢 असा अनेक धर्मांचा,पंथाचा विविधतेत एकता असलेला देश.. आपण सर्व भारतीयच फक्त प्रांतानुसार वेगळे अन्न,भाषा,वेश!🥰 इतिहासाची अनेक साक्ष,शूरवीरांची,विद्वानांची ही भारतभूमी.. जगात,भारतीय सर्व क्षेत्रात पुढे,कुठेही नाही कमी!🔥 अनेकांच्या अथक प्रयत्नांमुळे,शौर्यामुळे आहुतीमुळे मिळाले आज स्वातंत्र्य.. नेहमी असावी ही देशभक्ती,राष्ट्राला मोठे करण्यासाठी सर्वांमध्ये आणखी असावे ऐक्य!🙏🇮🇳 क्रांतिकारकांच्या शौर्याला,तसेच कृषिक🌿,सैनिकांच्या त्यागाला व प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे देशाचे नाव उंचावणाऱ्या सर्वांना धन्यवाद🇮🇳🙏😇Happy independence day🇮🇳🥰जय हिंद🫡🇮🇳 ......🦋🌺✍🙏...... शब्दांकन✍-B.S.Kendre(stud) Cont-7218160575(what's) Telegram-@Bskendre5 प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा
🇮🇳INDEPENDENCE DAY🇮🇳 ✨15 AUGUST✨ JAI HIND JAI BHARAT 🧡🤍💚
без подписи
_*कचरा जरी वादळाच्या जीवावर उडाला तरी तो कचराच आहे. वादळ संपल्यावर त्याची जागा परत जमीनीवरच.*_
'बदल हा सृष्टीचा नियम आहे'. असं म्हंटलं जातं. माणुसही गरजेपरत्वी बदलतो. तर कधी काळानुसार बदलतो. काहींना आर्थिक किंवा कौटुंबिक जिकीरीच्या परिस्थितीमुळे स्वत:ला बळेबळे बदलावे लागते. काहीजण स्वत:च्या इच्छेनुसार स्वत:च्या जीवनमानात बदल करतात. आता आपल्या लक्षात येईल. आपण कैक कारणांमुळे बदलतो एक म्हणजे बदलण्याशिवाय पर्याय नसतो, दुसरीकडे आयुष्यात इतके वाईट अनुभव येतात की माणुस एकांताला जवळ करतो व स्वत:च्या इच्छेनुसार बदलतो आणि दुसरा कुणीतरी म्हणतो म्हणुन, समाजाला बरे वाटावे म्हणुनही माणुस बदलतो. पहिल्या दोन मार्गाने झालेले बदल हे आपण एकवेळ मान्य करुत. पण दुसरा कुणीतरी म्हणतो म्हणुन आपण स्वत:ला बदलणं कितपत योग्य आहे? लहानपणापासुन आपण ज्या वातावरणात वाढतो, घरात व शाळेत ज्याप्रमाणे आपल्यावर संस्कार होतात आणि आयुष्यामध्ये जे आपल्याला बरे-वाईट अनुभव येतात या सर्व गोष्टी आपलं आयुष्य जगण्याचा पाया असतात. हा पाया दुसरं कुणीतरी येऊन हलवु लागला, म्हणजे "अरे तुला हे कपडे चांगले नाहीत दिसत दुसरं काहीतरी ट्राय करं". "तुझी बाईक आता पुरानी झाली आता बुलेट घे तीच तुला सुट होते". "तुझ्या घराला जो रंग दिलायस तो बरा नाही दिसत ब्राऊनच दिला असतास तर..?" "शुज कशाला घालायचेस..सैंडलच छान वाटतय." "ही कंपनी कशाला जॉईन केलीस त्यात तुला स्कोप नाही मिळणार. कंपनी बदल". "हा हेअरकट जरा शॉर्टच झालाय दुसरा केला असतास तर".असं सगळं आपल्या अत्यंत पर्सनल लेवलच्या गोष्टींवर..शिवाय आपल्या एकंदरित लाईफस्टाईलवर जर कुणी वारंवार कंमेट करीत असेल..आणि फालतुचे सल्ले देत असेल, शिवाय तो जे सांगेल ते बदल तुम्ही तुमच्यात करावेत असं म्हणत असेल आणि हे ऐकुन जर तुम्ही स्वत:च्या व्यक्तिमत्वामध्ये, स्वभावामध्ये, वर्तनामध्ये व एकंदरित जीवनशैलीमध्ये बदल करीत असाल तर...आपलं शरीर फक्त आपलं राहिलय व आपलं मन आणि मेंदु दुस-याकडं आपण गहाण ठेवलाय असाच प्रकार झाला ना राव...! मग आपल्या घरच्यांनी व शाळेतल्या गुरुवर्यांनी दिलेलं शिक्षण, केलेले संस्कार आणि आयुष्याने दिलेले अनुभव यातुन आपण काय शिकलो..जर आपण इतरांचं ऐकुन आपल्यात बदल करत असु. या गोष्टीला एक अपवाद असाय की, आपल्याला एखादं वाईट व्यसन असेल, किंवा एखाद्या निर्णयाने आपलंच खुप नुकसान होणार आहे, किंवा आपल्या निगेटीव्ह वागण्या-बोलण्याने आपल्या आप्तेष्टांची मनं दुखावणार आहेत तेंव्हा आपल्याला कुणीतरी सांगितलं की तु हे योग्य करीत नाहीस. व ते ऐकुन आपण आपल्यात सकारात्मक बदल केले, निर्व्यसनी झालो, फायद्याचा डीसीजन घेतला, रागावर नियंत्रण ठेवलं तर यात काहीच वावगं नाही. कारण, आपल्यातील या सकारात्मक बदलाने आपलं आयुष्य सुखकर होतं व या बदलामुळे आपल्याला स्वत:ला फारसा त्रास होत नाही. आपल्या गुरुजनांचे, आई वडिलांचे म्हणणे ऐकुन आपण स्वत:मध्ये केलेला बदल हा फायद्याचा ठरतो. पण आधी मी म्हंटल्याप्रमाणं ऊठ-सुठ कुणीही यायचं आणि आपल्यावर टपली मारुन जायचं. आणि अमुकनं सांगितलं म्हणुन आपण बदलायचं असं आयुष्य जगण्यात काही अर्थ नसतो. आपलं आयुष्य, आपलं तत्व एक साधा नियम. कुणीतरी सांगतं म्हणुन आपल्याला आवडतील अशा रंगाचे, अशा पध्दतीचे कपडे न घालता तिसरंच काहीतरी घालुन फिरायचं. किंवा तो म्हंटला म्हणुन आपल्या पसंतीचा ब्रैंड सोडुन तिस-याच ब्रैंडची गाडी घ्यायची.. तो म्हंटला तुझे हसताना पुढचे दात दिसतात फार मोठ्यानं हसत नको जाऊ..पण म्हणुन आपण काय हसणं सोडुन द्यायचं? तो म्हंटला म्हणुन मिळतय ते सोडुन पळत्याच्या मागी लागायचं. असं नकोच व्हायला ना. थोडक्यात, दुसरं कुणीतरी सांगतय म्हणुन आपण आपल्या व्यक्तिमत्वात बदल करायला जाऊच नये. नाहीतर आपलं 'ओरिजिनल" व्यक्तिमत्व हरवुन जाईल व कुणीतरी नकली व्यक्ती किंवा एखाद्याची कॉपी म्हणुन आपण ओळखले जाऊ. तसंही इतरांना छान व चांगलं वाटावं म्हणुन आपल्यात बदल करणं म्हणजे स्वत:च्या आवडी निवडी बाजुला ठेवुन दुस-याच्या इच्छा आकांक्षांना कुरवाळत बसणं. हिला काय वाटेल, त्याला काय वाटेल, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, हे प्रश्न आपण स्वत:ला कधी पडुच द्यायचे नाहीत म्हणजे आपण इतरांसाठी बदलायचा प्रश्नच येत नाही. आयुष्य आपलंय व ते आपल्या पध्दतीनंच जगण्याचा आपल्याला संपुर्ण अधिकार व हक्कही आहे. त्यामुळं इतरांच्या विचारांच्या कुबड्या घेऊन तसे बदल करण्यापेक्षा आपणही एक स्वतंत्र माणुस आहोत. आपलंही एक वेगळं अस्तित्व आहे व आपलीही स्वत:ची काही तत्व आहेत, मत आहेत, विचार आहेत, आवडीनिवडी आहेत ही गोष्ट कधीही विसरु नये. शेवटी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे..! कारण आपण आपल्या मनाचा राजा होऊन जगल्यावर.. कुणी आपल्याला त्याचा गुलाम बनवु नाही शकत..! # जगणं दुनियादारीतलं. ✍️ शैलजा खाडे ❣️ शब्दशैली @Shabdshailee
_*कर्माचा न्याय निश्चित आहे नाही तर जो सूर्याला थांबवू शकत होता, तो महाभारत पण थांबवू शकत होता.!*_
без подписи
प्रसिद्धी आणि मी एक अनुभव.. “खर सांगायचं तर तो विषय आहे वर्ष २०११ चा तेव्हा मी ११वी मध्ये शिकत होतो आणि अकरावी मध्ये शिकत असताना ‘दिपस्तंभाचे आधारस्तंभ’ हे माझं पुस्तकं प्रकाशित झालं ते तत्कालीन चिखलीचे तहसीलदार प्रा. संजय खडसे साहेब..यांच्या हस्ते माझ्या सारख्या सर्वसामान्य पंधरा वर्षाच्या मुलाच पुस्तकं तहसीलदार यांच्या हस्ते प्रकाशित झालं ही गोष्ट खूप मोठी होती आणि त्याच्या बातम्या अनेक नामांकित पेपर मध्ये झळकल्या आणि अनिल चव्हाण नाव प्रसिद्धीच्या झोतात आलं आणि तिथून पुढे दोन वर्ष कायमच मी पेपर मध्ये झळकत राहीलो .. पण त्यानंतर २०१३पासून अनिल चव्हाण नाव जेच गायब झालं तर ते तब्बल दहा वर्षांनी 2023 मध्ये वर्तमान पत्रात आलं आणि तेव्हापासून आतापर्यंत रोज वर्तमान पेपर मध्ये असतं.. सांगायचं तात्पर्य हेच की, प्रसिद्धी सर्वकाळ नसते, म्हणून मी माझे पाय नेहमी जमिनीवर ठेवतो कोणताही अहंकार माझ्यात येणार नाही यांची काळजी घेतो..कारण ह्या क्षेत्रात मी नवा नाही,अगोदरही बरेच अनुभव मी घेतले आहे आणि अनुभवातून खूप काही शिकलो आहे.” ✍️अनिल भगवान चव्हाण (ABC ) (लेखक, कवी, शिक्षक ) लिखाण दि. १२ऑगस्ट २०२६ ✍️संपर्क -@ABCs1432
नशिबाने दिलेली चांगली माणसं, नेहमी गृहीत धरू नयेत... कारण वेळ निघून गेल्यावर, आठवणी राहतात फक्त,ती माणसं परत येत नाहीत.!💯💫 @rutuja_writes1203
без подписи
без подписи
без подписи
तुटलेली माणसं आणि मी नक्की वाचा 🙏🥰
без подписи