प्रेरणादायी व्यक्तिमत्व 📘🌱
Статистика📚 दररोज प्रेरणादायी लेख 💡 सेल्फ इम्प्रूव्हमेंट टिप्स 🌱 व्यक्तिमत्त्व विकास ✨ सुंदर सुविचार आणि मराठी साहित्य 🎯 स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी चॅनेल जॉईन करा. https://t.me/PreranadayiVyaktimatva जीवन खुप सुंदर आहे जीवनाला अजुन सुंदर बनवा. ❤
- Последний пост
- 14 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 5
- Всего постов
- 24
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 274
- 1/48двое суток
- 314
- 1/72трое суток
- 338
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
https://t.me/+RsLAUZDFZg1lNDI1
मला कोणी तरी समजून घ्यावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं मात्र आपण स्वतःला कश्याप्रकारे समजून घेऊ शकतो यावर सर्व काही ठरतं असतं कारण जग आपल्याला आपल्या कृतीवरून त्याचं एक मत तयार करत असतं मात्र आपण जगाकडे कशापद्धतीने बघतो यावर सर्व रहस्य लपलेलं असतं!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
जे आपल्याकडे आहे त्यात आनंदाने जगायला शिका कारण आपण जसं जगत असतो तसं जगण्याचं कित्येकांच स्वप्न असतं पण या जगात परिपूर्ण सुखी असा एकही व्यक्ती नाही मात्र ज्या माणसाच्या जीवनात सुखाची सावली कधी पडली नाही त्यांच्या चेहऱ्यावर हमकास समाधान बघायला मिळत बाकी जे नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे काही आपल्याकडे आहे त्यात समाधाने जगणं खूप महत्त्वाचं असतं!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
लोक उगाच म्हणतात की देव कधीच चुकतं नाही मात्र पण तो एका ठिकाणी नक्कीच चुकतो ते म्हणजे परिस्थिती नसलेल्या माणसाला मन नावाची गोष्ट देऊन कारण समाज पुरस्तपूर कायदा निर्माण झाला आहे तो असा की ज्यांची पात्रता नाही त्यांनी आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत आणि केल्यास तर अपमान हा ठररेलाचं म्हणून म्हणता येईल देव पण चुकतोच राव!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
🚨 सावधान! "घरी बसून दिवसाला ₹200–₹2000 कमवा" अशा जाहिरातींपासून सावध राहा. सोशल मीडियावर अनेक पोस्ट दिसतात की... ✅ कोणतेही काम नाही ✅ कोणतीही गुंतवणूक नाही ✅ दिवसाला ₹200–₹2000 कमवा आणि शेवटी लिहिलेले असते – "काम करायचे असेल तर WhatsApp करा." अशा ऑफरमध्ये अनेकदा पुढे जाऊन ₹2000–₹5000 किंवा त्याहून अधिक किमतीचा कोर्स आधी विकत घ्यायला सांगितला जातो. त्यानंतर तोच कोर्स इतरांना विकण्यास सांगितले जाते आणि त्यावर कमिशन मिळते. ⚠️ लक्षात ठेवा • कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. • पैसे भरण्याची अट आहे का, हे स्पष्ट विचारा. • कंपनीची नोंदणी, उत्पादन आणि कमाईची पद्धत तपासा. • फक्त "मोठी कमाई" या आश्वासनावर विश्वास ठेवू नका. जागरूक राहा, माहिती पडताळा आणि मगच निर्णय घ्या. 🙏
तुमच्या प्रत्येक स्वप्नामागे /यशामागे एक बाप असतो...🎯 👉🏻 जो स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवून तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर झटत राहतो...💞 ✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके
Digital Marketing Course (Online) 🚀 📢 10 ऑगस्ट 2026 पासून नवीन बॅच सुरू होत आहे! Digital Marketing शिकून ऑनलाइन जगात करिअर आणि व्यवसायाच्या नवीन संधी मिळवा. ✅ माध्यम: ऑनलाइन (Google Meet) ✅ भाषा: मराठी 📌 बॅच सुरू: 10 ऑगस्ट 2026 ⚡ ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा. 📞 आजच आपली जागा निश्चित करा!
आपल्या आयुष्यातील वर्तमान मनसोक्त जगून घ्या कारण आजचा वर्तमान उद्याच भविष्य ठरवत असत आता उरला प्रश्न भूतकाळाचा झालं गेलं ते विसरून जा आणि आताचा क्षण उत्साहात साजरा करण्यासाठी प्रयत्न करत राहा कारण हा प्रयत्न आपली परिस्थिती तर बदलू शकत नाही पण या मागची मानसिकता कुठल्याही परिस्थितीत आनंदाने जगण्याचं खूप मोठं बळ देऊन जात!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke
🚨 सावधान! "घरी बसून दिवसाला ₹2000–₹5000 कमवा" अशा जाहिरातींपासून सावध राहा. सोशल मीडियावर अनेक पोस्ट दिसतात की... ✅ कोणतेही काम नाही ✅ कोणतीही गुंतवणूक नाही ✅ दिवसाला ₹2000–₹5000 कमवा आणि शेवटी लिहिलेले असते – "काम करायचे असेल तर WhatsApp करा." अशा ऑफरमध्ये अनेकदा पुढे जाऊन ₹2500–₹3000 किंवा त्याहून अधिक किमतीचा कोर्स विकत घ्यायला सांगितला जातो. त्यानंतर तोच कोर्स इतरांना विकण्यास सांगितले जाते आणि त्यावर कमिशन मिळते. ⚠️ लक्षात ठेवा: • कोणतीही ऑफर स्वीकारण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. • पैसे भरण्याची अट आहे का, हे स्पष्ट विचारा. • कंपनीची नोंदणी, उत्पादन आणि कमाईची पद्धत तपासा. • फक्त "मोठी कमाई" या आश्वासनावर विश्वास ठेवू नका. जागरूक राहा, माहिती पडताळा आणि मगच निर्णय घ्या. 🙏
प्रार्थनेची ताकद...🙏🏻 मित्रांनो, अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की प्रार्थना म्हणजे फक्त देवाकडे काहीतरी मागणे... परंतु खरं पाहिलं तर प्रार्थना म्हणजे मागणं नाही, तर स्वतःला घडवण्याची एक सुंदर प्रक्रिया असते... 👉🏻 प्रार्थना माणसाच्या परिस्थितीपेक्षा आधी त्याच्या विचारांमध्ये बदल घडवते आणि माणसाचे विचार बदलले की आयुष्य बदलायला सुरुवात होते... एक गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल की मला काय सांगायचं आहे... 👉🏻 दोन शेतकरी असतात. दोघांनीही सारखीच शेती केलेली असते. एक शेतकरी रोज सकाळी उठून म्हणायचा, देवा, माझ्याकडे काहीच नाही. माझं नशीबच खराब आहे... 👉🏻 दुसरा शेतकरी रोज प्रार्थना करायचा, देवा, मला काम करण्यासाठी हात दिलेस, विचार करण्यासाठी बुद्धी दिलीस, कुटुंब दिलंस आणि नवीन दिवस दिलास. त्याबद्दल मी तुझा आभारी आहे... काही महिन्यांनी दोघांची परिस्थिती वेगळी झाली. देवाने एका शेतकऱ्याला जास्त पाऊस दिला म्हणून नाही... तर एका शेतकऱ्याने सकारात्मक विचारांची शेती केली आणि दुसऱ्याने तक्रारींची... जसे विचार तसे निर्णय आणि तसाच परिणाम मिळतं असतो...🧠 👉🏻 मित्रांनो, प्रार्थना ही देवाला बदलण्यासाठी नसते, तर स्वतःला बदलण्यासाठी असते... प्रार्थना करताना मन शांत होतं, राग कमी होतो, भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो... अनेक संशोधनांमध्येही असे दिसून आले आहे की नियमित प्रार्थना किंवा ध्यान करणाऱ्या व्यक्तींमध्ये मानसिक तणाव कमी असतो आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिक चांगली असते...⏳ मित्रांनो, आता तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल की Gratitude आणि प्रार्थना मध्ये काय फरक आहे...?? 👉🏻बघा, Gratitude म्हणजे कृतज्ञता. आपल्या आयुष्यात जे काही चांगलं आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद म्हणण्याची सवय म्हणजे Gratitude... आपण रोज आपल्या आयुष्यात काय नाही याचा विचार करत बसतो आणि दुःखी होऊन बसतो... मोठं घर नाही, महागडी गाडी नाही, भरपूर पैसे नाहीत... पण एकदा विचार करा... 📌 श्वास घेण्यासाठी हवा आहे, 📌पिण्यासाठी पाणी आहे, 📌चालण्यासाठी पाय आहेत, 📌विचार करण्यासाठी मेंदू आहे, 📌आपल्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. 📌 राहण्यासाठी घर आहे. या सगळ्याबद्दल आपण दिवसभरात किती वेळा आभार मानतो...सांगा बरं ??🤷♂️ 👉🏻 जो माणूस ज्याच्याकडे जे आहे त्याबद्दल तो समाधानी असतो, त्याच्याकडे आणखी चांगल्या गोष्टी येण्याची शक्यता वाढते... कारण कृतज्ञता ही कमतरतेवर नाही, तर समृद्धीवर लक्ष केंद्रित करायला शिकवते... 👉🏻 अनेक यशस्वी लोक रात्री झोपण्यापूर्वी तीन गोष्टी लिहितात, ज्याबद्दल ते त्या दिवशी कृतज्ञ असतात. ही छोटी सवय त्यांच्या मनाला सकारात्मक ठेवते. हळूहळू त्यांचा आत्मविश्वास वाढतो, नातेसंबंध सुधारतात आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो... तक्रार करणारा माणूस प्रत्येक संधीमध्ये अडचण शोधतो, पण कृतज्ञ माणूस प्रत्येक अडचणीत संधी शोधतो... 👉🏻 म्हणूनच रोज सकाळी फक्त पाच मिनिटे प्रार्थना करा. काहीही मागण्यापूर्वी देवाचे आभार माना. देवा, आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद... आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा... आज मी कोणत्या तीन गोष्टींसाठी कृतज्ञ आहे...??🙄 👉🏻 ही सवय जर सलग 30 दिवस केली, तर तुमच्या विचारांमध्ये, बोलण्यात आणि वागण्यात सकारात्मक बदल दिसू लागेल... प्रार्थना आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जाते, पण कृतज्ञता आपल्याला स्वतःच्या सर्वोत्तम रूपाजवळ घेऊन जाते... 👉🏻 म्हणून रोज प्रार्थना करा, रोज आभार माना आणि विश्वास ठेवा... कारण ज्याच्या मनात कृतज्ञता असते, त्याच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि यशाची दारे आपोआप उघडू लागतात...💫 आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या...📝 धन्यवाद... 🙏🏻🌹😇 ✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके ( Coach of Personality Development ) ☎️☎️ 9545441697
без подписи