- Последний пост
- 12 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 3
- Всего постов
- 35
- Тип
- открытый
- Язык
- bh
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 473
- 1/48двое суток
- 542
- 1/72трое суток
- 584
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
. 'झाटभर शद्ब' ऐकून थोडं वाईट वाटलं, पण झाटभर शद्ब आमदाराच्या तोंडून निघताच 'जय श्रीराम'चा नारा ऐकून मन सुखावलं. अहिल्यानगर जनतेत शिव्यांसोबत जय श्रीरामही बोललं जातं, अजून किती सहिष्णुता हवी आपल्याला? अजून वेगळं राम राज्य काय असतं? 🚩 : 🖋लखन शोभा बाळकृष्ण💜☘
🌿 करोली घाट ट्रेक २०२६ 🌿 लोकायन IAS अकॅडेमीच्या माध्यमातून आदरणीय भूषण देशमुख सरांसोबत विशेष ट्रेक! 🥾⛰️ 📅 ट्रेकची तारीख: ६ व ७ सप्टेंबर २०२६ 🚌 प्रस्थान: ५ सप्टेंबर रोजी रात्री १०.०० वाजता 📍 प्रस्थान स्थळ: लोकायन IAS अकॅडेमी, पत्र्या मारुती चौक, पुणे मराठी ग्रंथालयाच्या बाजूला, नारायण पेठ, पुणे 🏠 पुण्यात परत: ७ सप्टेंबर सर्वांनी या ट्रेकसाठी आपली अंतिम नावे ३० ऑगस्टपर्यंत द्यावीत. ट्रेकसाठी आगाऊ रक्कम (Advance) द्यावी लागणार असून, सहभागींची संख्या अंतिम झाल्यानंतर ३० जणांची बस बुक करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी शक्य तितक्या लवकर आपली नावे निश्चित करावीत. ⚠️ महत्त्वाची सूचना: फक्त ३० जणांचीच बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे ३० ऑगस्टनंतर अचानक येणाऱ्या व्यक्तींना बसमध्ये जागा उपलब्ध करून देणे शक्य होईलच असे नाही. त्यामुळे ३० ऑगस्टपूर्वी नाव नोंदवणे बंधनकारक आहे. 📍 पिकअप पॉईंट: सर्वांनी फक्त वर दिलेल्या निश्चित पिकअप पॉईंटवरच वेळेत उपस्थित राहावे. वाटेत वेगवेगळ्या ठिकाणी पिकअप केल्यास ड्रायव्हरला अडचण होते तसेच वेळेचा अपव्यय आणि चुकामूक होण्याची शक्यता असते. 💰 ट्रेक शुल्क: ₹२१००/- प्रति व्यक्ती 🎒 ट्रेकसाठी सोबत आणावयाच्या आवश्यक वस्तू: • चांगल्या दर्जाचे, जास्त ग्रिप असलेले स्पोर्ट्स शूज • २ जोड कपडे • टॉर्च • रेनकोट • प्रॉपर बॅकपॅक — साईड बॅग/झोला बॅग आणू नये • ड्रायफ्रूट्स व ड्राय स्नॅक्स • बिस्कीट किंवा इतर आवश्यक खाण्याचे पदार्थ • ग्लुकोन-D / ORS • स्वतःची काही Personal Medicines असल्यास त्या न चुकता सोबत ठेवाव्यात • रात्री झोपण्यासाठी बेडशीट व चादर • तसेच स्वतःला आवश्यक वाटतील अशा इतर वस्तू ⛰️ निसर्ग, साहस आणि सहवासाचा एक अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी तयार रहा! आदरणीय भूषण देशमुख सरांसोबत करोली घाट ट्रेक — चला, सह्याद्रीच्या कुशीत एक सुंदर अनुभव जगूया! ❤️🌿 📌 नाव नोंदणीची अंतिम तारीख: ३० ऑगस्ट २०२६ 💰 शुल्क: ₹२१००/- 📞 संपर्क: अजय जगताप — ९७६८१५०१०१ जागा मर्यादित — फक्त ३० जण! लवकरात लवकर आपले नाव निश्चित करा. 🥾⛰️🌿
औरतें अगर हँस रही हैं तो कोई हँसने की बात होगी उनके आँसुओं की प्यासी यह सभ्यता मर्यादित मुस्कान की अभ्यासी यह संस्कृति उनकी समवेत हँसी से थर-थरा रही है डर रही है उनके खुले ठहाकों से औरतों को अगर रोका न जाए और बात-बेबात टोका न जाए तो वे हँसेगी वे देखती हैं एक नन्हे शिशु का धीरे-धीरे पुरुष में बदल जाना उनसे कुछ भी छिपा नहीं हैं आदम की दुनिया को जिसने ख़ुद सँवारा हो और जो अब भी रच रही है यह दुनिया वे इस दुनिया से अपने निर्वासन की इस विडंबना पर हँस तो सकती हैं वे हँस रही हैं कि उनकी औलादें नाकाम रहीं उन्हें समझने में वे हँस रही हैं कि उनका अभी भी कोई पुरुष-मित्र नहीं वे हँस रही हैं कि उनकी ख़ुदमुख़्तारी से डरता आदम उनकी हँसी से भी डरता है। : 🖋अरुण देव : 📸लखन शोभा बाळकृष्ण #delhi
ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले. बुद्धीने ज्येष्ठ नव्हे, तर तिथे ते अंधभक्तांच्या बरोबरीत गणले जाऊ शकतात इतकं साम्य त्यांच्या प्रतिभेत आहे. बुद्धी आणि अंधभक्त यांचा थेट संबंध फारच कमीवेळा आढळून येतो, हे सर्वश्रुत आहेच. तर, असो. हे दामले तेच मराठी नाट्यसृष्टीत ज्यांना 'विक्रमादित्य' म्हणून संबोधलं जातं. कारण त्यांच्या ४२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी १३ हजार ५०० हून अधिक नाट्य प्रयोगांचा ऐतिहासिक विक्रम रचला आहे. हुश्श! किती मोठी आसामी. तर, त्यांच्यामते, ‘NEET चा फुलफॉर्मच माहिती नसेल तर NEET च्या आंदोलनात जाऊन काय उपयोग?’ तर हे असे हे तर, असे हे हसमुख ‘NEET म्हणजे नक्की काय असतं’चे उद्गाते 'विक्रमादित्य' दामले. ‘NEET पेपर लिकमुळे कित्येक जीव गेले, कित्येकांच आर्थिक नुकसानीसह वेळही खर्ची झाला. तर एक 'माणूस' म्हणून तरी आपलं तिकडे जाणं, वा ते नाहीच जमलं तर आपल्या परीने दोन शब्द व्यक्त होणं गरजेचं असताना दामलेसारखी कलाकारमंडळी खुशाल शेपूट घालून बसतात. बसा, खुशाल बसा. पण आपण ते शेपूट घालून का बसलो? याचे खुलासे करून स्वतःचं हसं तरी करून घेऊ नका. 🙂 : 🖋लखन शोभा बाळकृष्ण💜☘
👇👇👇
आता सर्वात मोठा प्रश्न... अँड्रोमेडा आणि आपली मिल्की वे एकमेकांकडे येत आहेत का? उत्तर आहे—होय. दोन्ही आकाशगंगा गुरुत्वाकर्षणामुळे हळूहळू एकमेकांच्या दिशेने सरकत आहेत. पूर्वीच्या गणनांनुसार सुमारे 4 अब्ज वर्षांनी दोन्हींची टक्कर होईल, असा अंदाज होता. परंतु हबलच्या नव्या माहितीच्या आधारे तयार केलेल्या संगणकीय मॉडेल्सनी वेगळे चित्र दाखवले आहे. आता शास्त्रज्ञ सांगतात की पुढील 10 अब्ज वर्षांत प्रत्यक्ष विलिनीकरण होण्याची शक्यता सुमारे 50 टक्के आहे. म्हणजे टक्कर होऊही शकते... किंवा दोन्ही आकाशगंगा एकमेकींच्या अगदी जवळून पुढेही निघून जाऊ शकतात. अजून अंतिम उत्तर मिळालेलं नाही. मात्र एक गोष्ट निश्चित आहे. हबलने घेतलेला हा फोटो केवळ एक सुंदर अंतराळ छायाचित्र नाही. तो अब्जावधी वर्षांच्या संघर्षाचा, धडकांचा, नव्या तार्यांच्या जन्माचा आणि आकाशगंगांच्या उत्क्रांतीचा जिवंत दस्तऐवज आहे. या एका प्रतिमेमध्ये विश्वाचा भूतकाळ, वर्तमान आणि कदाचित भविष्यही लपलेले आहे. आज आपण अँड्रोमेडाकडे केवळ शेजारी म्हणून पाहतो. पण काही अब्ज वर्षांनंतर... जर विश्वाने वेगळी योजना आखली नसेल... तर हाच शेजारी आपल्या आकाशगंगेचा कायमचा साथीदार बनू शकतो. आणि कदाचित त्या दिवशी रात्रीच्या आकाशात दिसणारे दृश्य आजच्या कोणत्याही कल्पनेपेक्षा अधिक भव्य असेल. विश्व सतत बदलत आहे... आणि आपण त्या बदलाचा एक छोटासा भाग आहोत. माहिती आवडल्यास मित्रांसोबत शेयर करा आणि पेज ला फॉलो करा. तसेच तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. त्यामुळे आम्हाला अजून नवनवीन कन्टेट बनवण्यासाठी प्रेरणा मिळते🙏. Information and Image credit - NASA, ESA, B. Williams (University of Washington) : 🖋अवकाश कथा (अवकाश कथा या फेसबुक पेजवर साभार..)
अँड्रोमेडा... हबलने टिपलेला इतिहासातील सर्वात मोठा फोटो! कल्पना करा... रात्रीच्या स्वच्छ आकाशात तुम्ही एक फिकटसा धूसर डाग पाहत आहात. डोळ्यांना तो अगदी सामान्य वाटतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की त्या छोट्याशा धूसर ठिपक्यामध्ये सुमारे एक ट्रिलियन तारे दडलेले असू शकतात... आणि प्रत्येक ताऱ्याभोवती ग्रह, धूमकेतू, लघुग्रह आणि कदाचित एखादी सभ्यताही असू शकते? तो धूसर ठिपका म्हणजे अँड्रोमेडा दीर्घिका, आपल्या मिल्की वेची सर्वात जवळची मोठी शेजारी. आणि आता NASA च्या हबल अवकाश दुर्बिणीने अँड्रोमेडाचा आजवरचा सर्वात मोठा, सर्वात तपशीलवार आणि सर्वात अद्भुत फोटो तयार केला आहे. हा फोटो फक्त सुंदर नाही, तर हा अब्जावधी वर्षांचा इतिहास जपणारा एक पुरावा आहे. चला, आज या अविश्वसनीय प्रवासाला सुरुवात करूया. अँड्रोमेडा पृथ्वीपासून सुमारे 25 लाख प्रकाशवर्षे दूर आहे. म्हणजे आज आपण तिच्याकडे पाहतोय तो प्रकाश प्रत्यक्षात 25 लाख वर्षांपूर्वी तिथून निघाला होता. त्या काळात पृथ्वीवर कदाचित मानवही अस्तित्वात नव्हता. इतक्या प्रचंड अंतरावर असूनही अँड्रोमेडा ही आपल्या डोळ्यांनी दिसणारी सर्वात दूरची मोठी वस्तू आहे. पूर्वी लोकांना ती केवळ एक धूसर ढग वाटायची. पण 1925 मध्ये खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांनी काही विशेष प्रकारच्या तार्यांचा अभ्यास करून सिद्ध केले की अँड्रोमेडा ही आपल्या आकाशगंगेचा भाग नसून एक स्वतंत्र आकाशगंगा आहे. त्या एका शोधामुळे विश्वाचा आकार मानवाच्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठा असल्याचे प्रथमच स्पष्ट झाले. आता हबल दुर्बिणीने तब्बल 10 वर्षे अँड्रोमेडाचे निरीक्षण केले. हजाराहून अधिक कक्षांमधून घेतलेल्या 600 पेक्षा जास्त छायाचित्रांना जोडून तब्बल 2.5 अब्ज पिक्सेलचा एक विशाल फोटो तयार करण्यात आला. या चित्रामध्ये जवळपास 20 कोटी स्वतंत्र तारे स्पष्टपणे दिसतात. ही केवळ एक सुंदर प्रतिमा नाही. प्रत्येक छोटासा प्रकाशबिंदू म्हणजे आपल्या सूर्यासारखा एक तारा आहे. आणि त्या प्रत्येक ताऱ्याभोवती ग्रह असण्याची शक्यता आहे.😳 कल्पना करा... एका चित्रामध्ये लाखो नाही, तर कोट्यवधी संभाव्य सौरमाला दडलेल्या आहेत.. पण अँड्रोमेडा फक्त सुंदरच नाही... तर तिचा भूतकाळहि अत्यंत हिंसक आहे. हबलच्या या नवीन निरीक्षणांमध्ये शास्त्रज्ञांना अँड्रोमेडामध्ये एक विशाल तारानिर्मितीचा वलयाकार पट्टा दिसला. सुरुवातीला तो एक सामान्य सर्पिल रचना वाटत होती. मात्र नंतर इन्फ्रारेड निरीक्षणांमध्ये त्याच्या आत आणखी एक धुळीचा वलय सापडला. दोन वेगवेगळे वलय... पण का? याचे उत्तर लाखो वर्षांपूर्वी घडलेल्या एका भीषण धडकेत दडलेले होते. शास्त्रज्ञांच्या मते सुमारे 21 कोटी वर्षांपूर्वी अँड्रोमेडाची तिच्या एका लहान शेजारी दिर्घिकेशी समोरासमोर टक्कर झाली. पाण्यात दगड पडल्यावर जशा लाटा तयार होतात, तशाच या धडकेमुळे धूळ आणि वायूचे प्रचंड वलय तयार झाले. आजही त्या टक्करांचे ठसे अँड्रोमेडामध्ये स्पष्टपणे दिसतात. पण ही फक्त सुरुवात होती. नवीन निरीक्षणांमध्ये अँड्रोमेडाच्या दक्षिणेकडील भागात आणखी विचित्र रचना दिसून आल्या. एक प्रचंड स्टेलर स्ट्रीम—म्हणजे तार्यांचा लांबलचक प्रवाह. हे तारे एखाद्या नदीसारखे वाहताना दिसतात. शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की हे तारे दुसऱ्या एका दिर्घिकेचे अवशेष आहेत, जी अँड्रोमेडाच्या गुरुत्वाकर्षणामुळे अक्षरशः तुटून विखुरली गेली... म्हणजेच अँड्रोमेडाने तिच्या इतिहासात अनेक लहान दिर्घिका स्वतःमध्ये सामावून घेतल्या आहेत. या संशोधनात आणखी एक धक्कादायक शक्यता समोर आली. आज अँड्रोमेडाजवळ दिसणारी M32 नावाची लहान दिर्घिका पूर्वी खूप मोठी होती. सुमारे 2 ते 5 अब्ज वर्षांपूर्वी ती अँड्रोमेडाशी धडकली. त्या टक्करमुळे तिचा बहुतांश भाग नष्ट झाला आणि आज तिचे केवळ घनदाट केंद्र उरले आहे. या महाभयंकर विलिनीकरणामुळे अँड्रोमेडामध्ये नव्या तार्यांच्या निर्मितीचा स्फोट झाला. आज दिसणाऱ्या तिच्या अब्जावधी तार्यांपैकी जवळपास 20 टक्के तारे कदाचित त्या एकाच घटनेत जन्माला आले असावेत असा अंदाज आहे. म्हणजे एका दीर्घिके च्या मृत्यूमधून दुसऱ्या दिर्घिकेला नवं जीवन मिळालं... हबलच्या या प्रतिमेमुळे शास्त्रज्ञांना अँड्रोमेडाच्या रचनेचा अभूतपूर्व अभ्यास करता आला. आपण आपल्या मिल्की वेच्या आत असल्यामुळे तिची संपूर्ण रचना पाहणे कठीण जाते. धूळ, वायू आणि असंख्य ताऱ्यांमुळे आपलीच आकाशगंगा आपल्यासाठी गूढ बनते. पण अँड्रोमेडा आपल्यासमोर जवळजवळ पूर्णपणे उभी आहे. म्हणूनच ती आकाशगंगांच्या निर्मिती आणि उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी एक नैसर्गिक प्रयोगशाळा ठरली आहे.
👇👇👇
हो यालाच भारत सरकारने 'ज्ञानपीठ' दिलाय... बाकी, 33 कोटी देव गोमतेत असतात की जाणव्यात? हे एकदाच फिक्स करा, माझ्यासारख्याचा घोळ होतो..😐
मैत्री दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.. #बोलत राहू..💜☘
त्यांचे वैयक्तिक जीवन मात्र विरहाने व्यापलेले होते. जवाहरलाल नेहरूंचे आयुष्य आंदोलने, राजकीय दौरे आणि कारावासात जात होते. पती-पत्नीचा संवाद अनेकदा पत्रांतून घडत असे. त्या पत्रांत उत्कटतेपेक्षा विश्वास होता; शब्दांपेक्षा न बोललेल्या भावनांचा प्रभाव वजन अधिक होता. कमला नेहरूंनी घर सांभाळले, मुलीला घडवले आणि राष्ट्रकार्यात स्वतःला झोकून दिले; पण स्वतःच्या वेदनांविषयी त्यांनी कधी कुठे मत मांडले नाही. क्षयबाधेने आरोग्य सतत खालावत गेल्याने उपचारासाठी त्या विदेशात गेल्या. तिथल्या हिमाच्छादित पर्वतांच्या शांत सान्निध्यातही त्यांचे मन भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातच गुंतलेले राहिले. अखेर 28 फेब्रुवारी 1936 रोजी लॉझान येथे त्यांचे निधन झाले. त्या वेळी त्यांचे वय अवघे छत्तीस वर्षांचे होते. एका राष्ट्रभक्त स्त्रीचा प्रवास तेथे संपला; पण एका पतीच्या आयुष्यातील न भरून येणारा विरह तेव्हाच सुरू झाला. महादेवी वर्मा यांनी सांगितलेली आठवण ह्या दृष्टीने विलक्षण आर्त आहे! कमलांचे निधन झाले तेव्हा जवाहरने पुनर्विवाह करावा म्हणून त्यांच्या कुटुंबात आग्रह झाला मात्र जवाहरनी त्यास ठाम नकार दिला. कमला नेहरूंचे आयुष्य, हे जवाहरलाल नेहरूंनी सोबत बाळगलेल्या शांत अबोल वेदनेचे प्रतीक होय. आपल्या सामाजिक राजकीय जीवनात त्यांनी कोणतीही मोठी राजकीय पदे भूषवली नाहीत, प्रसिद्धी कीर्तीचा आग्रह धरला नाही, स्वतःसाठी इतिहासात स्पेस मागितली नाही. त्यांनी अतिशय अंतःकरणपूर्वक आणि निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडले. एक पत्नी म्हणून, आई म्हणून, स्वातंत्र्यसैनिक म्हणून आणि समाजसेविका म्हणून, त्यांनी विविध भूमिका समर्पण भावनेने पार पाडल्या. अनेकदा इतिहासातील सर्वांत मोठी कर्तृत्ववान व्यक्तिमत्वे गाजावाजा झाल्याशिवाय लोकांसमोर उजळून निघत नाहीत हेही एक वास्तव आहे! कमलांसोबत असे घडले असावे. आज कमला नेहरूंची आठवण काढताना त्यांच्या कार्याइतकीच महत्त्वाची वाटते, ती त्यांच्या आयुष्यातली भावस्पर्शी गहिरी शांतता. राष्ट्रासाठी झिजताना त्यांनी स्वतःचे सुख अर्पण केले. देशातल्या सर्वोच्च महत्वाच्या पदावर असणाऱ्या पतीने अगदी कारुण्य भावनेने त्यांच्या स्मृतीची राख आयुष्यभर जपली, आणि एका साहित्यिकेने त्या प्रसंगाला शब्दकळा देऊन अमर केले. म्हणूनच कमला नेहरू ह्या स्वातंत्र्यलढ्यातील केवळ एक कार्यकर्त्या नव्हत्या; त्या प्रेम, त्याग, निष्ठा आणि स्मृती यांचा असा दीप होत्या, ज्याची ज्योत काळाच्या वाऱ्याने कधीच विझू शकली नाही. काही माणसे मृत्यूनंतर इतिहासात नोंदली जातात; काही माणसे मात्र आपल्या प्रियजनांच्या हृदयात आयुष्यभर जिवंत राहतात. कमला नेहरू त्या दुसऱ्या प्रकारातील होत्या. म्हणूनच त्यांची कथा संपत नाही; काळाच्या प्रत्येक टप्प्यावर ती नव्याने सुरू होते; एखाद्या पत्रात, एखाद्या स्मृतीत, एखाद्या चांदीच्या डबीत जपलेल्या राखेत आणि एका विरहाने भरलेल्या शांत हृदयात त्यांची कथा आपल्याला नित्य जाणवत राहते! त्याग, निष्ठा, प्रेम आणि समर्पण ह्यांची नव्याने आठवण करुन देत राहते! 2014 पर्यंत अत्यंत वाईट पद्धतीने कॉँग्रेसचा द्वेष केला याचे आता वाईट वाटते. कॉँग्रेसविरोधात उघड प्रचार केला याचे शल्य वाटते हा कबुलीजबाब कमला नेहरूंच्या जयंतीदिनी द्यावा वाटतो. विवेक जागृत होतोय याचे समाधान आहे! देर आये दुरुस्त आये! 🖋समीर गायकवाड
पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या पत्नी कमला नेहरू यांच्याविषयी लेखिका महादेवी वर्मा यांनी सांगितलेली एक आठवण मनाला खोलवर स्पर्श करून जाते. त्यांच्या स्मरणानुसार, कमला नेहरूंच्या निधनानंतर पंडित नेहरूंनी आपल्या प्रिय पत्नीच्या अस्थींचा राखरूपी एक अंश चांदीच्या छोट्याशा डबीत जपून ठेवला होता. ते जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी ती डबी सोबत बाळगत असत. त्यांच्या दृष्टीने ती केवळ राखेची डबी नव्हती, अथवा निव्वळ स्मृतींचे प्रतीक म्हणून जपून ठेवलेली साठवणही नव्हती! तो त्यांच्या उर्वरित सहजीवनाचा गंधभारित श्वास होता. सार्वजनिक जीवनात कोट्यवधी लोकांचा नेता असलेला हा माणूस, एकांतात मात्र आपल्या आयुष्याच्या अर्ध्या भागाला अशा शांतपणे जवळ बाळगून जगत होता. राष्ट्राच्या भविष्याचा विचार करणाऱ्या त्या विशाल मनात एका पतीचे असहाय दुःखही तितक्याच खोलवर जिवंत होते. महादेवी वर्मांनी ह्याच स्मरणनोंदीत कवी सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’ यांच्या जीवनाचीही आठवण मांडली आहे. वयाच्या विसाव्या वर्षी निराला यांच्या पत्नी मनोहरा देवी यांचे निधन झाले. त्यांच्यापासून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मुलगी सरोज मोठी झाली, तिचे लग्न अठराव्या वर्षी झाले आणि लग्नानंतर दीड वर्षात तिचे निधन झाले. तिच्या स्मरणार्थ त्यांनी ‘सरोज स्मृती‘ लिहिल्या आहेत! पत्नीचे निधन हा त्यांच्यासाठी इतका मोठा आघात होता की, मुलं नसती तर त्यांचे जगणे कठीण होते! मुलगी सरोज हिच्यात त्यांनी आपल्या पत्नीला पाहिले! तिला त्यांनी आईचे प्रेम दिले! विरहाच्या वेदनेने त्यांची कविता अधिक करुण, अधिक मानवी झाली. एका बाजूला राष्ट्राचा नेता आपल्या प्रिय सहचारिणीच्या स्मृतीची चांदीची डबी जपत होता; तर दुसऱ्या बाजूला एक कवी आपल्या अंतःकरणात दुःखाची राख घेऊन आयुष्यभर शब्दांचे दीप लावत होता. वेदनेची रूपे वेगवेगळी असली, तरी तिचा रंग मात्र एकच असतात; मूक, गहिरा आणि शाश्वत. असो. कमला नेहरू यांच्या विषयी फार काही लिहिले जात नाही; अथवा डिजिटल मीडियामध्ये त्यांच्याविषयीची साधने कमी असावीत. इतिहासाला नेहमीच मोठी नावे अधिक आवडतात. सर्व प्रकारच्या इतिहासास महान लोकांच्या विजयाच्या घोषणा, राजकीय भाषणे आणि क्रांतीची गाज आठवते. पण इतिहासाच्या प्रत्येक उज्ज्वल पानामागे काही निःशब्द छाया दडलेल्या असतात. त्या स्वतः प्रकाशझोतात येत नाहीत; मात्र दुसऱ्यांच्या तेजाला अखंड ऊर्जा पुरवत राहतात. कमला नेहरू हे असेच एक व्यक्तिमत्त्व. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात त्यांचे नाव जवाहरलाल नेहरू यांच्या सहचारिणी म्हणून घेतले जाते; परंतु त्यांची खरी ओळख त्याग, संयम, करुणा आणि अदम्य राष्ट्रनिष्ठा यांत दडलेली आहे. आजच्या तारखेस 1 ऑगस्ट 1899 रोजी दिल्लीतील एका सुसंस्कृत काश्मीरी पंडित कुटुंबात कमला कौल यांचा जन्म झाला. घरात संस्कारांची समृद्ध परंपरा होती; पण त्या काळातील सामाजिक संकेतांमुळे मुलींच्या शिक्षणावर अनेक बंधने होती. घरगुती शिक्षण, संस्कृती आणि मूल्यांची शिदोरी घेऊन त्या वाढल्या. त्यांच्या स्वभावात एक विलक्षण शांतताप्रिय शिस्त होती; ती शांतता इतकी संयमी होती की, संकटांच्या काळातही तिने कमलाबेनला निग्रहापासून कर्तव्यापासून ढळू दिले नाही. 1916 मध्ये त्यांचा विवाह जवाहरलाल नेहरू यांच्याशी झाला. आनंद भवनात प्रवेश करताना त्यांनी केवळ एका नव्या घरात नव्हे, तर एका नव्या युगात पाऊल ठेवले. आधुनिक विचार, राजकीय चर्चा, स्वातंत्र्यलढ्याचे वातावरण आणि सतत कोणत्या ना कोणत्या उपक्रमात व्यस्त असणारे सार्वजनिक जीवन, हे सारे त्यांच्यासाठी नवे होते. पण त्यांनी कोणतीही खळखळ न करता स्वतःला त्या वातावरणाशी जुळवून घेतले. भारतीय स्त्रीची साधी, स्वाभिमानी आणि सोज्वळ ओळख त्यांनी कधीच सोडली नाही. 1917 मध्ये त्यांच्या पोटी, इंदिरा प्रियदर्शिनी यांचा जन्म झाला. पुढे 1924 मध्ये जन्मलेला पुत्र अवघ्या दोन दिवसांत जगाचा निरोप घेऊन गेला. मातृत्वाच्या या जखमेने कमला नेहरूंच्या अंतःकरणावर कायमचा ओरखडा उमटवला. त्यानंतर क्षयरोगाने त्यांच्या शरीराला पोखरायला सुरुवात केली; पण मनातील जिद्द मात्र कमी झाली नाही. महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनाने त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली. परदेशी कापडाच्या दुकानांपुढील निदर्शने, स्वदेशीचा प्रचार, महिलांना संघटित करण्याचे प्रयत्न आणि सविनय कायदेभंग आंदोलनातील सहभाग, या सर्वांमध्ये त्या अग्रभागी राहिल्या. जवाहरलाल नेहरू तुरुंगात असताना त्यांनी अनेक सार्वजनिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. ब्रिटिश सरकारने त्यांनाही अटक केली; परंतु आजारपणाने थकलेल्या शरीरानेही स्वातंत्र्याच्या स्वप्नाला साथ सोडली नाही.
👇👇
💜☘
जयंतीदिनी विनम्र अभिवादन..💜☘
तो अफाट गुणवत्तेचा धनी होता; पण त्याला कायम काही मर्यादांमध्ये राहून क्रिकेट खेळावे लागले. खरं तर त्या मर्यादा आखुन देणारी एक व्यवस्थाच कामाला लागलेली होती. जेव्हा तो आपल्या निवृत्तीची घोषणा करत म्हणाला, ‘तुम्ही मला कधी परकं समजलंच नाही,’ तेव्हा त्या शब्दांमागे दडलेली वेदना स्पष्ट जाणवत होती. डोळ्यांत दाटलेले अश्रू आणि भरून आलेला कंठ जणू सांगत होता,‘मला अजूनही भारतासाठी खेळायचं होतं. माझा शेवट असा व्हायला नको होता.’ पण अखेर या चिवट, शांत आणि संयमी योद्ध्यालाही म्हणावं लागलं... ‘Cap No. 278... Signing Off.’ ...आणि होतो एका ‘अजिंक्य’ ताऱ्याचा पराभव. जो त्याच्या प्रत्येक चाहत्याला बोचत राहिल.💜☘️ : 🖋️लखन शोभा बाळकृष्ण #AjinkyaRahane #indiancricket
एका ‘अजिंक्य’ ताऱ्याचा पराभव... क्रिकेट म्हटलं की आपल्या काही आवडत्या खेळाडूंची नावं आपोआप डोळ्यांसमोर येतात. मात्र, काही खेळाडू असेही असतात की, क्षमता असूनही त्यांना पुरेशा संधी मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विषयी आपल्या मनात कायम एक वेगळाच जिव्हाळा, एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतो. त्यांच्या कारकिर्दीतील काही अविस्मरणीय क्षण आपण मनात जपून ठेवतो आणि अनेकदा ‘अरे, हा खेळाडू आज मैदानात असायला हवा होता!’ अशी हळहळ व्यक्त करतो. असा एक खेळाडू म्हणजे मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे. मैदानावर आक्रमकता आणि आक्रस्ताळेपणाचे वर्चस्व असताना अजिंक्य रहाणे शांत, संयमी आणि सुसंस्कृत स्वभावाने भारतीय क्रिकेटमध्ये आला. अखेरपर्यंत तो तसाच राहिला. मैदानावर असो वा मैदानाबाहेर, तो अजातशत्रू म्हणूनच ओळखला गेला. जेव्हा जेव्हा तो फलंदाजीसाठी क्रीजवर आला, तेव्हा त्याने संघाला संकटातून बाहेर काढण्याचे काम प्रामाणिकपणे केले. मात्र, भारतीय क्रिकेट व्यवस्थेने त्याला अनेकदा दुय्यम स्थान दिले.त्याच्याकडे केवळ रिकाम्या जागा भरा असच बघितलं गेलं. हे मान्य आहे की काही काळ त्यालाही फॉर्मशी झुंज द्यावी लागली. पण फॉर्ममध्ये परतण्यासाठी ज्या संधी आवश्यक होत्या, त्या त्याला सातत्याने मिळाल्या नाहीत. त्याच्या कामगिरीचे मूल्यमापनही अनेकदा वेगळ्या मापदंडांनी झाले. त्यामुळे त्याची कारकीर्द अपेक्षेपेक्षा मर्यादित राहिली. तरीही त्यामुळे त्याची महानता कमी होत नाही. त्याच्या नावावर कदाचित विक्रमी आकडे नसतील; पण भारतीय क्रिकेटला दिलेले असंख्य संस्मरणीय क्षण त्याला कायम महान खेळाडूंच्या पंक्तीत स्थान देत राहतील. २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर केलेली १०३ धावांची अविस्मरणीय खेळी कोण विसरेल? त्या खेळीच्या जोरावर भारताने तब्बल २८ वर्षांनंतर लॉर्ड्सवर ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला. २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना संकटात सापडलेल्या भारतीय डावाला त्याने दिलेला आधारही तितकाच महत्त्वाचा गणला गेला. खरं तर त्याचे सर्वाधिक शतकं ही विदेश भूमीवर आलीत. तो, संघाचा आधार स्तंभ होण्याच्या मार्गावर होता. पण, त्याला मार्गाच टोक गाठता आलं नाही. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२०-२१ ने जगाला खऱ्या अर्थाने अजिंक्य रहाणेची ओळख करून दिली. ॲडलेड कसोटीत भारत अवघ्या ३६ धावांत गारद झाला. भारतीय संघावर टीकेची झोड उठली असताना. नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला. अशा परिस्थितीत रहाणेने नेतृत्वाची धुरा सांभाळली. मेलबर्नमध्ये शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला आणि पुढे गाबाच्या अभेद्य किल्ल्यावर ३२ वर्षांनंतर विजय मिळवत भारताने २-१ अशी ऐतिहासिक मालिका आपल्या नावे केली. या विजयाचे श्रेय अजिंक्यला मिळाले खरे; पण ते फारसे ठळकपणे कधीच चर्चीले गेले नाही. त्यानेही कधी श्रेयासाठी धाव घेतली नाही. तो धावत राहिला तो फक्त संघाचा स्कोअरबोर्ड पुढे सरकत राहावा याचसाठी. स्वार्थ त्याला कधी शिवला नाही. तो सजग होता, खेळावर असणाऱ्या आपल्या निष्ठेसाठी. तो, एक उत्कृष्ट तंत्रशुध्द फलंदाज होता, त्याचे क्षेत्ररक्षणही कमालीचं सजग होतं. कर्णधार म्हणूनही तो प्रगल्भ होतो. खेळभावनेची त्याला उत्तम जाण होती. अजिंक्यबद्दलची एक आठवण विशेष नमूद करावीशी वाटते. जून २०१८ मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ऐतिहासिक कसोटी सामना झाला. अफगाणिस्तानचा तो पहिलाच कसोटी सामना होता. भारताने त्यांना एक डाव आणि २६२ धावांनी पराभूत केले. मात्र, सामन्यानंतर भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने दाखवलेली खिलाडूवृत्ती सर्वांच्या मनाचा ताबा घेती झाली. त्याने अफगाणिस्तानच्या संपूर्ण संघाला विजेतेपदाच्या ट्रॉफीसह संयुक्त फोटोसेशनसाठी आमंत्रित केले. त्या कृतीने रहाणेवर कौतुकाचा वर्षाव झाला. तो खऱ्या अर्थाने मैदानावरील सेनापती होता. पहिल्या चेंडूवर षटकार मारणारे फलंदाज बघण्याची सवय झालेल्या आपल्या डोळ्यांना टायमिंगवर विश्वास ठेवणारा रहाणे कसा आवडेल? म्हणूनच ‘रहाणे टी-२०चा खेळाडू नाही,’ अशी टीकाही त्याच्यावर कित्येक वेळा झाली. पण राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने आयपीएलमध्ये स्वतःची अशी एक छाप उमटवली. पुढे चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतानाही त्याने आपल्या दर्जाची पुन्हा एकदा प्रचिती दिली. कोणताही फॉरमॅट असो, तो संघासाठी मनापासून खेळत राहिला. वयाच्या नवव्या वर्षी एका अण्णा नावाच्या पंचवीशीतील तेजतर्रार गोलंदाजाचा चेंडू डोक्याला लागल्याने मैदानातच १५-२० मिनिटे रडणारा तो लहानगा... त्याच वेळी पंचांनी दिलेला ‘एकतर मैदानाबाहेर जा किंवा खेळ सुरू ठेव’ हा इशारा ऐकून त्याने खेळणे निवडले आणि त्याच गोलंदाजाला सलग चौकार ठोकले. त्याच मुलाचं पुढे भारतीय क्रिकेटला ‘अजिंक्य रहाणे’ म्हणून दर्शन झालं. पण, ते टिकवून ठेवता आलं नाही.
👇👇👇👇
без подписи
रामायण सिनेमाचा ट्रेलर नुकताच बघितला. प्रचंड भंपक, अंगावर धावून येणारा आणि VFX ने पुरती वाट लावून ठेवलेला वाटला. रामायणावर कित्येक सिनेमे येतील आणि जातीलही पण ज्याची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन रामानंद सागर यांनी केलं होतं. त्या रामायण मालिकेची जागा कधीच कुणी घेऊ शकणार नाहीत. तेच श्रीकृष्ण मालिकेलाही लागू होतं. 💜☘