मराठी साहित्य आणि इतर बरंच काही ....
Статистикаमराठीतील सर्वोत्तम साहित्य, ललित, पुस्तके इतर अपडेट्स Promotion: @dappu
- Последний пост
- 12 авг.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 1
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 503
- 1/48двое суток
- 576
- 1/72трое суток
- 621
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
*डेली बाईट्स* कारल्याची भाजी आवडत नाही म्हणून सोबत खायला केळ्याचे शिकरण बनवले तर आई म्हणते कारले आणि दूध खाऊ नाही, जेमिनाय ला विचारले तर तो पण तिच्याच पार्टीचा निघाला. 🤨 दुःखद गोष्ट म्हणजे शिकरण बनवण्याआधी दोन घास कारल्याच्या भाजीचे खाल्लेले होते मी 🥹 चुपचाप कारल्याची भाजी खाल्ली हो तुमच्या चॅनलच्या ऍडमिनने 🫠 आता दुपार होईपर्यंत फ्रिजमधल्या शिकरणावर कोणाची नजर पडू नाही म्हणजे झाले 😊😇
मराठी - देवनागरी टाइप करताना Gboard ऍप मधे येणारा प्रॉब्लेम : स्वयंपाकी हा शब्द टाइप होतो पण बोलीभाषेतला सैपाकी टाइप करायला खूप अवघड जाते सै आणि पाकी टाइप करण्यासाठी ते ते अक्षर/जोडाक्षर कोणत्या दुसऱ्या शब्दांमध्ये आहे ते शोधून ते शब्द टाइप करून मग त्यांची काटछाट करून तुकडे(म्हणजे अक्षरे) जोडावे लागतात. आणखी कुणाला असा काही प्रॉब्लेम येतो का? आल्यावर तुम्ही काय करता ?
देवनागरी लिपीमधून मराठी टाइप करायला फार अवघड जात आहे का ? तुम्हाला काय काय अडचणी येतात? त्या आल्यावर तुम्ही काय करता? ह्यावर विस्तृत चर्चा करूयात. (तुम्ही कोणते app, की व्हॉईस टायपिंग वापरता ह्याबद्दल स्वतंत्र पोस्ट घेण्यात येणार आहे त्यावर आताच इथे चर्चा नको, एका वेळी एकच मुद्दा घेऊ)
दर्शक म्हणजे बघणारे.., आणि नकारदर्शक म्हणजे नकार दाखवणारे. 😁 आहे की नाही गंमत. अशाच मराठी शब्दांच्या गमतीजमतीसाठी आमचे चॅनल फॉलो करा. आता दर्शक शब्द शेवटी येणारे सात तरी शब्द आम्हाला सापडले आहेत, सांगा कमेंट करून तुम्हाला कोणकोणते आठवतात ते.
Jio चा रिचार्ज संपत आलेला म्हणून ते एक आठवडा अगोदरचं मागील आठवडा भरापासून मला दररोज मेसेज करून सांगत होते. आणि म्हणत होते की,रिचार्ज करा नाहीतर तुमच्या सेवा बंद होतील आणि असे दररोज म्हणत होते. अखेर मी परवा रिचार्ज केला आणि सकाळी सकाळी त्यांच्या कस्टमर केयर ला कॉल करून सांगितलं की मी रिचार्ज केलेला आहे. नंतर दुपारी पण कॉल करून सांगितलं की मी रिचार्ज केलेला आहे. नंतर रात्री झोपताना परत एकदा आठवण करून देण्यासाठी त्यांना कॉल केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या ऑफिस मध्ये जावून 3/4 स्टाफ मेंबर्सला मी रिचार्ज केलायं हो म्हणून सांगितलं. दुपारी परत सांगण्यासठी पुन्हा एकदा चक्कर मारली तेंव्हा त्यांचं लंच टाईममुळे जेवण चालू होतं म्हणून मग सायंकाळी पुन्हा एकदा जावून सांगितलं. वैतागून त्या मॅडम म्हणाल्या,अहो सर तुम्ही रिचार्ज केलयं हे 10 वेळा सांगायची काहीही गरज नाहीये. त्यांना मी अगदी सिरियसपणे म्हणालो, तुमचं अगदी खरय मॅडम,पण तुम्ही जसं 10 वेळा आम्हाला रिचार्ज संपला रिचार्ज संपला असं सांगता तसं आम्ही पण तुम्हाला 10 वेळा रिचार्ज केल्याची माहिती सांगितलीचं पाहिजे ना. येता येता मॅडम कडून jio च्या मुंबईच्या ऑफिसचा पत्ता घेवून आलोयं. तिकडं पण एखादं पत्र पाठवतो. 😊😂😊😂😊
*पिंपरी चिंचवड वाहतूक विभाग* पावसाची स्थितीबाबत माहिती *६ जुलै २६, वेळ १२.०० वाजता* ✳️*भोसरी वाहतूक विभाग* पाणी साठलेले ठिकाणे - 1. बाणाचा ओढा 2. माई वडेवाले चौक 3. क्लाऊड नाईन हॉटेल पाणी साठल्याने वाहतूक संथ गतीने चालू आहे. ✳️*बावधन वाहतूक विभाग* पाणी साठलेले ठिकाणे - 1. राधा चौक 2. ननावरे अंडरपास 3. भुगाव पाणी साठल्या कारणाने वाहतूक संथ गतीने चालू आहे. ✳️*चाकण वाहतूक विभाग* पाणी साठलेले ठिकाणे - 1. वाकी फाटा येथील वाहतूक पाणी साठल्या कारणाने बंद करण्यात आली आहे. ✳️*दिघी आळंदी वाहतूक विभाग* पाण्याखाली गेलेले पूल - 1. दाभाडे सरकार चौक येथील पूल 2. इंद्रायणी नदी जुना पूल 3. इंद्रायणी नदी नवीन पूल 4. पुणे शहर हद्दीतील मरकळ गावातील पूल 5. सिद्धबेट पूल पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. श्री क्षेत्र आळंदी येथे सर्व प्रकारचे वाहने येण्यास मनाई करण्यात आली आहे. ✳️*वाकड वाहतूक विभाग* पाणी साठलेले ठिकाणे - 1. ताथवडे अंडरपास (वाहतुकीस पूर्णपणे बंद) 2. पुनावळे अंडरपास (वाहतूक संथ गतीने) 3. रिव्हर व्ह्यू चौकातील पूल थेरगाव (वाहतुकीस पूर्णपणे बंद) ✳️*सांगवी वाहतूक विभाग* वाहतुकीस बंद केलेले ठिकाणी 1. MM चौक येथून चिंचवड कडे येणारी वाहतूक बंद 2. साई चौक पाणी साठल्याने बंद 3. रहाटणी येथील पूल पाणी साठलेले बंद. ✳️*निगडी वाहतूक विभाग* पाणी साठलेले ठिकाणे - 1. रिव्हर व्ह्यू चौक पूर्णपणे बंद 2. केशवनगर चिंचवड 3. रुद्र पार्किंग 4. भेळ चौक गीता वडापाव (महानगरपालिकेने मॅन हॉल उघडे असल्याने बंद केले आहे) ✳️*पिंपरी वाहतूक विभाग* पाणी साठलेले ठिकाणे - 1. वल्लभनगर अंडरपास पूर्णपणे बंद 2. साई चौक अंडरपास पूर्णपणे बंद ✳️*हिंजवडी वाहतूक विभाग* पाणी साठलेले ठिकाणे - 1. शनी मंदिर इंदिरा कॉलेज समोर पाणी साठले असल्याने बंद 2. ताथवडे अंडरपास हिंजवडी कडील बाजू पाणी साठल्याने बंद 3. सूर्या अंडरपास व सयाजी अंडरपास येथे पाणी साचले असून वाहतूक संथ गतीने चालू आहे. ✳️*म्हाळुंगे वाहतूक विभाग* वाहतूक बंद ठिकाण - 1. आळंदी फाटा येथून आळंदीकडे जाण्यास बंद 2. KBM कंपनी येथील नाला पूल खचला आहे वाहतूक बंद आहे. ✳️*चिखली वाहतूक विभाग* वाहतूक बंद ठिकाण 1. हवालदार वस्ती ते आळंदी 2. डायमंड चौक येथून मोईकडे जाण्यास बंदी 3. चिखली कमान ते चिखली स्मशान रोड बंद पाणी साठलेली ठिकाण लक्ष्मी चौक कुदळवाडी पाटील नगर जाधव सरकार चौक ✳️*देहूरोड वाहतूक विभाग* - वाहतूक बंद ठिकाण सेंट्रल चौकातील वाहतूक बदल सुरू केले आहे - पाणी साठलेले ठिकाण शिंदे पेट्रोल पंप येथील दोन्ही सर्विस रोड पाण्याखाली ✳️*तळेगाव वाहतूक विभाग* - पाणी साठलेले ठिकाण हॉटेल इंद्रायणी घोराडेश्वर मंदिर समोर हॉटेल थंड मामला येथे डोंगरातून आलेले पाणी तळेगाव चाकण रोड वरील देव फाटा येथे. (नगरपरिषदेकडील मनुष्यबळ येथे कामकाज करीत आहे)
🚨 अत्यंत महत्वाची सूचना : 🚨 भारत सरकारने काही दिवसांसाठी टेलिग्राम वर बंदी घातलेली आहे, त्यामुळे आमचे सर्व अपडेट्स WhatsApp वर मिळतील. जर आणखी काही चेंजेस, अपडेट्स, सूचना (व्हॉट्सॲप ग्रुप काढल्यास त्याच्या लिंक) वगैरे जे काही असतील तर त्या सुद्धा WhatsApp चॅनल वरती मिळतील. त्यासाठी आमचे WhatsApp चॅनल बॅकअप म्हणून जॉइन करून ठेवा. https://whatsapp.com/channel/0029Va4WdTC8aKvIxAThKq3k टीप: WhatsApp चॅनल जॉइन केल्याने, ॲडमिशन किंवा इतर सदस्यांना तुमचा नंबर दिसत नाही. - मराठी ग्रुप - D3 group - D3 नेटवर्क आणि मित्र परिवार
प्रत्येक पुस्तक वाचणारी गृहिणी be like ...
🪷 🍞❤️ *शेवटच्या तंदुरी रोटीची चव* ❤️🍞 शहरातील एका मोठ्या हॉटेलसमोर संध्याकाळची वेळ होती. लोक आपापल्या कामात व्यस्त होते. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला घडणारे एक दृश्य पाहून अनेक जण थांबले. 👀 सुमारे पंच्याहत्तर वर्षांचे एक वृद्ध गृहस्थ हॉटेलसमोर उभे होते. त्यांच्यासोबत त्यांचा जवळपास पंचावन्न वर्षांचा मुलगा होता. दोघेही साध्या कपड्यांत होते. 👨👦 मुलाने हॉटेलच्या काचेच्या आत पाहिले आणि हसत म्हणाला, "बाबा, आज खूप दिवसांनी इथे आलो आहे. एक गोष्ट सांगू का?" 😊 वृद्धांनी हसत विचारले, "सांग बाळा, काय हवंय?" ❤️ मुलगा अगदी लहान मुलासारख्या निरागसपणे म्हणाला, "मला आतली तंदुरीरोटी खायची आहे, पण पैसे तुम्ही द्यायचे." 🍞😄 हे ऐकून आजूबाजूचे काही लोक हसू लागले. कुणाला वाटलं, कदाचित मजा-मस्करी सुरू आहे. वृद्धांनी काहीही न बोलता आपल्या जुन्या खिशात हात घातला. त्यातून त्यांनी शंभर रुपयांची एक जुनी, दुमडलेली नोट काढली आणि मुलाच्या हातावर ठेवली. 💵🤲 मुलाने ती नोट अगदी एखाद्या लहान मुलाला पहिल्यांदा खाऊसाठी पैसे मिळाल्यासारखी आनंदाने घेतली. 😊 दोघे हॉटेलमध्ये गेले. त्यांनी तंदुरी रोटी आणि भाजी मागवली. मुलगा मोठ्या आनंदाने जेवू लागला. 🍽 तेवढ्यात शेजारच्या टेबलवर बसलेल्या एका तरुणाला राहवले नाही. तो म्हणाला, "काका, तुम्ही तर अगदी ठणठणीत दिसता. या वयातसुद्धा वडिलांकडून पैसे घेऊन जेवता? तुम्हाला लाज वाटत नाही का?" 🤔 संपूर्ण हॉटेलमध्ये शांतता पसरली. 😶 सगळ्यांच्या नजरा त्या माणसाकडे वळल्या. तो हसला. 😊 "नाही... मला अजिबात लाज वाटत नाही." मग त्याने खिशातून आपले चामड्याचे पाकीट काढले. पाकीट उघडले तर त्यात हजारो रुपये आणि अनेक बँकेची कार्डे होती. 💳💰 तो म्हणाला, "पैशांची काहीच कमतरता नाही रे बाळा. देवाच्या कृपेने सर्व काही आहे." 🙏 तो तरुण आश्चर्यचकित झाला. 😳 मग त्या माणसाने आपल्या वडिलांकडे पाहिले आणि म्हणाला, "मी लहान होतो तेव्हा प्रत्येक रविवारी बाबा मला बाजारात घेऊन जायचे." "मी एखाद्या दुकानासमोर थांबून म्हणायचो – बाबा, समोसा खायचा आहे." 🌮 "कधी आईस्क्रीम मागायचो... कधी खेळणं." 🍦🧸 "आणि बाबा प्रत्येक वेळी आपल्या खिशातून पैसे काढून द्यायचे." हे बोलताना त्याचे डोळे पाणावले. 😢 तो पुढे म्हणाला, "तेव्हा मला वाटायचं की बाबांकडे जगातील सगळा खजिना आहे." 👑 "मग काळ बदलला. मी मोठा झालो. नोकरी मिळाली. व्यवसाय केला. पैसा कमावला." 💼💰 "आज माझ्याकडे बाबांपेक्षा हजारपट जास्त पैसा आहे." "पण..." 😔 तो काही क्षण थांबला. संपूर्ण हॉटेल त्याचे बोलणे ऐकत होते. ❤️ तो हळू आवाजात म्हणाला, "पण आता बाबांच्या खिशातून निघालेली शंभर रुपयांची नोट मला कोट्यवधी रुपयांपेक्षा जास्त मौल्यवान वाटते." 💵❤️ तो पुढे म्हणाला, "कारण त्या नोटेत फक्त पैसे नसतात." "त्यात माझं बालपण दडलं असतं." 👶 "त्यात ती बोट असते, जी धरून मी चालायला शिकलो." 🤝 "त्यात त्या रात्री असतात, जेव्हा माझ्या तापात बाबा रात्रभर जागे राहिले." 🌙😢 "त्यात तो संघर्ष असतो, ज्यात त्यांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून माझ्या गरजा पूर्ण केल्या." ❤️ आता हॉटेलमधील अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. 😢 वृद्ध वडील फक्त आपल्या मुलाकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यांत अभिमान होता. 🥹❤️ मुलाने ती शंभर रुपयांची नोट काढली आणि सर्वांना दाखवत म्हणाला, "तुम्हाला ही फक्त शंभर रुपयांची नोट दिसत आहे." "पण मला यात माझं संपूर्ण आयुष्य दिसतं." 💖 त्याने ती नोट प्रेमाने दुमडली आणि आपल्या शर्टच्या खिशात ठेवली. 👔💵 मग तो म्हणाला, "आज मी माझ्या वडिलांना हजारो रुपये देऊ शकतो." "त्यांच्यासाठी मोठं घर घेऊ शकतो." 🏡 "महागडी गाडी आणू शकतो." 🚗 "पण त्यांच्या हातून शंभर रुपये घेण्यात जो आनंद आहे, तो जगातील कोणतीही संपत्ती देऊ शकत नाही." ❤️ वृद्ध वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. 😢 त्यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "बाळा, माणूस पैशाने मोठा होत नाही." "माणूस तेव्हा मोठा होतो, जेव्हा यश मिळाल्यानंतरही त्याला आपल्या वडिलांचा हात डोक्यावर हवा असतो." 🙏❤️ संपूर्ण हॉटेल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. 👏👏👏 त्या दिवशी अनेक लोकांनी जेवण केले. पण सर्वात जास्त तृप्ती त्या मुलाला मिळाली, ज्याने रोटी नाही तर आपल्या वडिलांचे प्रेम खाल्ले होते. ❤️🍞 कारण खरं तर... ज्या दिवशी वडिलांच्या खिशातून पैसे घेणं बंद होतं, त्या दिवशी माणूस मोठा तर होतो... पण त्याचं बालपण कायमचं मागे राहून जातं. 🥹💔👨👦❤️ सौजन्य : ज्योती निंबाळकर 😊
आमचे व्हॉट्सऍप चॅनल अजूनही जॉइन केले नसेल तर तुम्ही खूप चांगले कन्टेन्ट मिस करत आहात. सादर आहे आता आणखी नव्या स्वरूपात, आमचे मराठी अपडेट्स ऑफिशियल चॅनल. त्यावर काय आहे हे आम्ही सांगितल्यापेक्षा तुम्हीच बघा म्हणजे लगेच प्रेमात पडणार 😁 लव ॲट फर्स्ट साईट असते तसे सबस्क्राईब ॲट फर्स्ट व्हिजिट होणार 😍 https://wa.me/channel/0029Va4WdTC8aKvIxAThKq3k
без подписи
सुट्ट्या आता संपत आल्यात. तर मग त्यांच्या हाती द्या... Fun With Puzzles. विंग्रजी शिकू इच्छीणाऱ्या जेमतेम अक्षर ओळख झालेल्या छोट्यांसाठी. आणि दुसरं: Tenaliram. सहा पैकी एकच मिळालं. करड्या पार्श्वभूमीवर, वाचायला जड. नेटवर, आणि इथं तारायंत्रावर ‘पंचतंत्र’ नक्की सापडेल. मुलांना तेही जरूर वाचायला द्या.
без подписи
आपल्या देशात मोठे वादळ येऊन लोक मेलीत हे तुम्हाला माहिती आहे का?
без подписи
*फक्त दोन हिशोब सांगतो* पहिला इंधनावर असलेल्या उत्पादन शुल्क आणि विक्रीकराचा केरळच्या अर्थमंत्र्यांच्या विधानानुसार इंधनाच्या उत्पादन शुल्क, सेस आणि अतिरिक्त उत्पादन शुल्क या माध्यमातून केंद्र सरकारला २०२० ते २०२१ या आर्थिक वर्षात ३७२००० कोटी रुपये मिळालेले आहेत. यापैकी १८००० कोटी मूळ उत्पादन शुल्क म्हणून दाखवलेले आहेत, उर्वरित रक्कम सेस आणि अतिरिक्त उत्पादन शुल्क म्हणून दाखवले आहेत. साहजिकच राज्य सरकारांना जो वाटा द्यावा लागतो तो मुळ उत्पादन शुल्कावर म्हणजेच फक्त १८००० कोटी पैकी ४१ टक्के म्हणजे ७३८० कोटी राज्यांना मिळालेले आहेत. बाकीचे उपकर,सेस जे केंद्राने लावलेले आहेत ते सगळे केंद्राच्या खिशात. म्हणजे उर्वरित ३५४००० कोटी रुपये पूर्णपणे केंद्राला मिळालेले आहेत. ही कररचना कशी दाखवली जाते त्यावर सगळं अवलंबून आहे. २०१४ पासून क्रुडऑइलच्या किमती सातत्याने कमी होत असताना पेट्रोल डीझेल च्या किमती मात्र वाढतच होत्या. इकॉनॉमिक टाईम्सच्या ३० नोव्हेंबर २०१८ च्या बातमीनुसार २०१४ पासून साडेचार वर्षात केंद्राला फक्त इंधनाच्या कराच्या माध्यमातून ११ लाख कोटी रुपये मिळालेले आहेत. साडेचार वर्षात ११ लाख कोटी मिळाले असतील तर दहा वर्षात २५ लाख कोटी मिळाले असतील. इंधनापासून मिळालेला आकडा २५ लाख कोटी. दुसरा रिझर्व बँक सरप्लसचा वर्ष २०१४-१५ पासून २०२३-२०२४ पर्यंत रिझर्व्ह बँकेकडून एकूण ८७३३२९ कोटी रुपये ( अक्षरी आठ लाख त्र्याहत्तर हजार तीनशे एकोणतीस कोटी रुपये ) यांनी घेतलेले आहेत. २०२४-२५ मधला सरप्लस आकडा आहे दोन लाख पंचाहत्तर हजार कोटी आणि रिझर्व्ह बँकेने दिलेला डिव्हिडंड आहे दोन लाख एकोणसत्तर हजार कोटी. सरप्लस गोळाबेरीज ११ लाख ४८ हजार कोटी. रिझर्व्ह बँकेच्या आंतरराष्ट्रीय चलनाच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवसायातून आणि देशातल्या बँकांच्या व्यवसायातून जे उत्पन्न आणि नफा मिळतो त्याच अथवा विल्हेवाट तीन प्रकारे होते. एक डिव्हिडंड जो सरकारला दिला जातो. दोन रिझर्व्ह सरप्लस जो आपत्कालीन निधी असतो तीन निव्वळ नफा. रिझर्व बँकेकडून घेतलेली रक्कम ११ लाख ४८ हजार कोटी, २५-२६ चा हिशोब धरला तर किमान १२ लाख कोटी. फक्त इंधन २५ लाख कोटी आणि रिझर्व्ह बँक सरप्लस १२ लाख कोटी, आकडा झाला ३७ लाख कोटी. २०१४ साली देशावर असणार कर्ज ५० लाख कोटी होत ते २०० लाख कोटी झालेलं आहे. या लाखो कोटी रुपयांचं तुम्ही केलत काय ? कोविड लस विकत घेतली त्याच बिल दाखवता ? कि तेलरोखे परतफेड केली त्याचे आकडे दाखवता ? त्याचे आकडे दाखवले तरी बेरीज ३७ लाख कोटी होत नाही. रस्त्याची काम टोल लावून करताय. विमानतळ, बंदर, रेल्वे सगळ सगळ विकून मोकळे झालात त्याचे किती लाख कोटी आलेले आहे ? या लाखो कोटी रुपयांचं तुम्ही केलत काय ? काटकसर करा म्हणून ज्या जनतेला तुम्ही सांगून राहिलेत त्या जनतेचा हा पैसा आहे. आनंद शितोळे आपल्या_धडावर_आपलेच_डोके सीधी_बात नफ्याचे_खाजगीकरण_तोट्याचे_राष्ट्रीयीकरण
रात्रीची चॅटिंग..( काल्पनिक आहे ) जेवण उरकल की मग..अंथरुणात जायच.. दिवा बंद करायचा मस्त..अंगावर पांघरून घ्यायच.. मग होते ठराविक वेळ..ती ऑनलाईन येते.. तीच सगळ काम आवरून..मोबाईल घेते.. कोणी नाहीये ना जाग..करते ती खात्री.. अन सुरु होते मग आमची..चॅटिंग रोज रात्री..|| जेवलास का, काय करतोय..हा पहिला प्रश्न.. तिच्याशी गप्पा म्हणजे..एक उत्साह अन जश्न.. माझ झाले तुझ..?..हा पहिला असतो टप्पा.. चालू होतात मग आमच्या..रोजच्या गप्पा.. भयाण शांतता असते..फक्त रोमांच सर्वत्र.. अनुभवली आहे प्रत्येकाने..चॅटिंग ची रात्र..|| दिवसभर काय केल..सगळ विचारून होते.. मग भावना संचारतात..मन शृंगारिक होते.. मग चालू होते तिच्या..सौन्दर्याची स्तुती.. छान वाटत तिलाही..बोलायचे तरी किती.. दोन तास तरी सुरु असते..फक्त हेच सत्र.. खरंच भारी असते ना..ती चॅटिंग अन ती रात्र..|| एकमेकाच्या गुणदोषावर..होते मग चर्चा.. कधी अभिमान वाटतो..कधी झोंबतात मिरच्या.. मग एखाद्या मुद्द्यावर..होतात किरकोळ भांडण.. मग तिचे नखरे, रुसणं..अन अश्रू सांडण.. रुसते ती तात्पुरती..शांत होते मात्र.. एकदा तरी जगा रे..एक चॅटिंग ची रात्र..|| पहाट झालेली कळत नाही..आता मन वेड होत.. मेसेज मधेच थोडस..खट्याळ पणे वागत.. शेवटी भावना असतात..त्यात नसते काही चुक.. स्त्री असो वा पुरुष..ती एक नैसर्गिक भूक.. प्रत्येकजण असतो या..वागण्यास पात्र.. क्वचित च नसेल जगली कोणी..चॅटिंग ची रात्र..||
без подписи
दुसरा तारा सिंदबाद. मुलांना सुट्टीत वाचण्यासाठी. विक्रम भागवत , २०१७. दर्यावर्दी सिंदबादच्या सात सफरी. अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी. बुकहंगामा, पुणे. छोट्या टायपात ५४ पानं. सुरेश भोसले. सिंदबादच्या साहसी सफरी. अमोल, पुणे. २००९ ७५/- ८० पानं. दोन्हींत रेखाचित्रं. एकूण मजा येते. लहानपणी बिरबल, सिंदबाद, गुलबकावली, हातिमताई, ठकसेन सुट्टीच्या आनंदाचा भाग होते.
मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली असेल. सुट्टीत त्यांचा मोबाईल आणि टीव्हीवरचा स्क्रीन टाइम वाढतो. त्यांना या सुट्टीत स्क्रीन पासून ठेऊ दूर आणि पुस्तकांचा खाऊ देऊ भरपूर.. 🥳डॉ. नितीन हांडे यांची सहज सोप्या भाषेत विज्ञानाची गोडी लावणारी पुस्तकं.. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणारी पुस्तकं.. कुतूहल जागं करणारी पुस्तकं..❤️ शिक्षक, पालक आणि विद्यार्थी सर्वांनी वाचली पाहिजेत अशी पुस्तकं.. 🎈 १) आपले भवताल : आपल्या सौरमालेची, या ग्रहांनी, नक्षत्रांनी जगभरातील संस्कृतीमध्ये, कालमापन पद्धतीमध्ये मिळवलेले स्थान यांची रंजक माहिती. मूल्य: २०० २) की की की की कीटक : आपल्या भवताली असणाऱ्या कीटकांची रंजक माहिती.. मुलांच्या डोक्याला खुराक. मूल्य: २०० ३) सायंटिस्ट खोपडी भाग १.. बेलपासून नोबेलपर्यंत : वेगवेगळ्या रंगात रंगलेल्या २७ शास्त्रज्ञांचे किस्से आणि त्यांनी लावलेले शोध यांची रंजक माहिती आणि त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी. मूल्य: ३०० ४) सायंटिस्ट खोपडी भाग २… जेन झी पासून रिव्होल्युशनरी जनरेशन पर्यंत.. २१ अफलातून शास्त्रज्ञांचे किस्से आणि त्यांनी लावलेले शोध यांची रंजक माहिती आणि त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी. मूल्य: ३०० ५) मेलुहा ते भारत : हजारो वर्षापूर्वी भारतात असलेल्या गौरवशाली ज्ञानपरंपरेचा वेचक आढावा. मूल्य: ३०० ६) ज्ञानाचा प्रवाहो चालिला : देवी, रेबीज या लसींपासून कोरोना लसपर्यंत जीवरसायनशास्त्राचा झालेल्या प्रवासाचा रंजक आढावा. मूल्य: २०० ७) इस्रो : द प्राईड ऑफ इंडिया: इस्रो या भारतातील अग्रगण्य संस्थेची इत्यंभूत माहिती. संस्थेची वाटचाल आणि त्यातील महत्त्वाचे टप्पे महत्वाच्या मोहिमा. अगदी सोप्या भाषेत रॉकेट सायन्स. मूल्य: ३०० ८) पाथमेकर्स : लिंगभेदाच्या अडथळ्यांवर मात करून स्त्री संशोधकांसाठी नवीन रस्ता निर्माण करणाऱ्या बारा स्त्री शास्त्रज्ञांची प्रेरक कहाणी. मूल्य: २७० ९) मिथकांचे जग: जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतीतील सृष्टीच्या जन्म कथा, सृष्टी निर्माण करणारे त्यांचे देव यांची रंजक गुंफण. मूल्य: ३८० कोणतीही चारपेक्षा अधिक पुस्तके मागवली तर त्यावर २० टक्के सवलत असेल. ऑर्डर देण्यासाठी ८९५६४४५३५७ या नंबर वर व्हाट्सअप कराल. पोस्ट शेअर देखील कराल🙏