tgindex
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)

व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)

Статистика

शेतीविषयी माहिती साठी संपर्क 8888167888

Последний пост
13 авг.
Последнее чтение
15 авг.
Постов за неделю
3
Всего постов
20
Тип
открытый
Язык
mr
Категория
Видео (по похожим)
В каталоге с
14 авг.
Подписчики
12 683
−9 за 2 дн.
Сутки
−8
−0,06%
Неделя
 
Месяц
 
Просмотров на пост
3 345
20 постов
Вовлечённость
26,4%
к подписчикам
Постов в день
0,4
всего 20
Упоминаний
0
каналов
Охват размещения
оценка
1/24сутки в ленте
1 098
1/48двое суток
1 258
1/72трое суток
1 357

Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.

Посты

  • без подписи

  • без подписи

  • 13 авг.1 2271

    без подписи

  • https://youtu.be/VPhk_ViXdZg?si=sc30ScWGbBQ_MSgh

  • 10 авг.3 0531

    🌱कापसाबद्दल माहिती🌱 👉 या वर्षी विविध कारणांमुळे कापसाची अपेक्षित वाढ नसल्यामुळे सुदृढ वाढीसाठी फवारणीत टॉप अप किंवा रिफ्रेश ५० मिली प्रति पंप वापरू शकता व आळवणीमध्ये अत्यंत महत्त्वाची आळवणी - एकरी अर्धा किलो एनपीके बूस्ट डीएक्स (NPK Boost DX) हे जिवाणू खत, या सोबत दीड लिटर रायझर हे चांगल्या गुणवत्तेचे ह्युमिक ॲसिड आणि एकरी ३ किलो १९:१९:१९ याची आळवणी केल्यास वाढ सुदृढ व चांगली होण्यास मदत होईल. 👉 गुलाबी बोंडअळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी फुलं लागल्याबरोबर फुलं तपासा व डोमकळ्या असल्यास अशी फुलं तोडून नष्ट करा; त्यामुळे गुलाबी बोंडअळीची पहिली पिढी नियंत्रित होऊन भविष्यातील मोठे नुकसान टळेल. 👉 पात्याला सुरुवात झाल्यानंतर लाईट ट्रॅपचा वापर करा. कापसाच्या उंची पेक्षा दीड फूट उंच तेलाच्या डब्यात हॅलोजनची कांडी लावून कापसाकडे तोंड करून रात्री सुरू ठेवा, त्यात पतंग येऊन मरतील. 👉 अमावस्येनंतर तीन दिवसाच्या आत सरेंडर या अंडीनाशकाचा व अळीनाशकाचा फवारा द्या. या तीन गोष्टी गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 👉 कापसावर गरज नसताना फवारणी टाळा. लहान कापसाला रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी रिहान्श, रेज, मोनोक्रोटोफॉस किंवा ॲसिफेट असे साधे कीटकनाशक फवारा. 👉 मात्र पाते लागून योग्य वाढ असलेल्या कापसाला सर्व रसशोषक किडींच्या एकत्रित नियंत्रणासाठी ओढाची एक्स्ट्रा ५० मिली फवारावे. 👉 या १२ तारखेला अमावस्या आहे व १५-१६ ऑगस्टपर्यंत फवारणी होत असल्यास, फुलं व पाते लागलेल्या कापसाला या ओढाची एक्स्ट्रा सोबतच सरेंडर सुद्धा फवारावे. 👉 योग्य वाढ असल्यास व पाते-फुलं असल्यास झेप, पण कमी वाढ व कमी फुटवे असल्यास फवारणीमध्ये टॉप अप या संजीवकाचा वापर करू शकता; सोबत १९:१९:१९ घ्यायला हरकत नाही. 👉 अतिघन किंवा दादा लाड पद्धतीने लावलेल्या कापसाची गळफांदी खोडापासून १ इंचाच्या अंतरावर सिकेटरने (म्हणजे चांगल्या कात्रीने) लागवडीनंतर ४५ दिवसादरम्यान कापावी. 👉 कापसाला खताची पहिली मात्रा १०:२६:२६, ८:२१:२१, ९:२४:२४ किंवा डीएपी अधिक पोटॅश देऊन, दुसऱ्या मात्रेत यापैकी एक अधिक युरिया, किंवा पहिली मात्रा भरपूर दिली असल्यास एकटा युरिया द्यावा. तिसरी मात्रा ५० दिवसा दरम्यान निखळ युरियाची देऊ शकता. 👉 बजेट असल्यास खतामध्ये रायझर जी एकरी ५ ते १० किलो व सल्फर डब्ल्यूडीजी एकरी २ किलो वापरावे. 👉 कापसाला जास्त कोवळं ठेवून फवारणीचा खर्च वाढवू नका. 👉 आंतरमशागत हलकी पण नियमित चालू ठेवा. 🌱तुरीबद्दल माहिती🌱 👉 तुरीचे बऱ्याच जागी शेंडे पिवळे दिसत आहे, त्याची फारशी चिंता करू नये. जास्त ओलावा किंवा वानांच्या वैशिष्ट्यामुळे हा पिवळेपणा सुरुवातीला दिसतो, जो कालांतराने कमी होईल. 👉 तुरीची भविष्यातील मर रोग व फांदीमर हे रोग टाळण्यासाठी आत्ताच जमिनीत ओलावा असतांनी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा वापरावे. ट्रायकोबूस्ट DX एकरी अर्धा किलो आळवणीत आपण वापरू शकता. यासोबतच अन्नद्रव्याच्या उपलब्धतेसाठी NPK बूस्ट DX हे जिवाणू खत सुद्धा एकरी अर्धा किलो वापरायला हरकत नाही. 👉 दोन ओळीतील अंतर योग्य असल्यास दोन झाडातील अंतर योग्य ठेवण्यासाठी लागवडीनंतर २५ दिवसादरम्यान तुरीची विरळणी करून दोन तासात दोन झाडात किमान एक फूट व जास्तीत जास्त दोन फूट अंतर ठेवावे इतर झाडे उपटून टाकावीत. 👉 विरळणी केल्यानंतर वाचलेल्या झाडांचे शेंडे खुडावे. ज्यामुळे फांद्याच्या संख्येत वाढ होते. मात्र ज्या ठिकाणी सोयाबीन तुरीमध्ये दोन फुटापेक्षा कमी अंतर आहे, तिथे तुरीचे शेंडे खुडू नये, नसता त्याला सोयाबीन दाबू शकते. 👉 पेरणीसोबत खत दिले नसल्यास दोन महिन्यात कधीही खत देता येते. पानं गुंडाळणारी अळी कमी असल्यास फवारणीची घाई तुरीसाठी करू नये.

  • 🟢श्री गजानन जाधव यांचा कृषी सल्ला🟢 🌱सोयाबीन बद्दल माहिती🌱 👉 अनियमित, कमी-जास्त पाऊस व वेगवेगळ्या वेळी झालेल्या पेरण्यांमुळे सध्या सोयाबीन विविध अवस्थांमध्ये आहे. त्यानुसार व परिस्थितीनुसार त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. 👉 जसे: * पिवळ्या पडलेल्या सोयाबीनवर १९:१९:१९ चा फवारा द्यावा. * चुनखडी किंवा पांढऱ्या जमिनीतील सोयाबीनवर झिंक व फेरस प्रत्येकी २० ग्रॅम फवारावे. * येलो मोझॅक किंवा लीफ रिंकल व्हायरस असल्यास ती पिवळी झाडे उपटून पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी ओढाची एक्स्ट्रा ५० मिली फवारावे. * हुमनी अळी असल्यास मेटारायझियम व बिव्हेरिया या जैविक कीटकनाशकाची आळवणी करावी. * तननाशकाचा शॉक लागू नये यासाठी तननाशकासोबत किंवा त्याचा शॉक लागला असल्यास नंतर शॉकअप सारखं संजीवक ५० मिली प्रति पंप फवारावे. 👉 यावर्षी आधी सांगितल्याप्रमाणे खोडमाशीचा प्रादुर्भाव जास्त आहे. तननाशकासोबत किंवा २० दिवसा दरम्यान किंवा पहिल्या फवारणीमध्ये रावडी या कीटकनाशकाचा २० मिली प्रति पंप वापर करावा. 👉 आता फवारणीबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती: फवारणीमध्ये अळीनाशक—रावडी २० मिली / सिंजो १० ते १२ मिली किंवा मस्केट ३० ते ४० मिली—हे अळीनाशक महत्त्वाचं आहे. यासोबत १२ तारखेनंतर (म्हणजे अमावास्ये नंतर) तीन दिवसाच्या आत, म्हणजे १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान फवारा असल्यास, सोबत सरेंडर हे अंडीनाशक व उडणाऱ्या पांढऱ्या माशीसाठी नियंत्रण करणारं कीटकनाशक वापरावं. 👉 आता या सोबत बुरशीनाशकांमध्ये आपण सुखई किंवा विसल्फ हे बुरशीनाशक घेऊ शकता किंवा वाढ जास्त असेल तर प्रोपिको या बुरशीनाशकाचं प्रमाण वाढवून २० ते २५ मिली घ्यावं. 👉 या सोबत जर कमी वाढ असेल तर टॉपअप किंवा योग्य वाढ व फुलं लागली असल्यास झेप हे संजीवक घेऊ शकता. 👉 तसेच ज्या ठिकाणी बोरॉनची कमतरता व खरबड पानं झाली आहेत, अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार बोरॉन २० ते ३० ग्रॅम सुद्धा फवारणीत घेऊ शकता. 👉 असे आवश्यकतेनुसार पहिला किंवा दुसरा फवारा घ्यावा. 👉 सोयाबीनमध्ये शक्यतो फुलं लागल्यानंतर आंतरमशागत करू नये व तसेच तननाशकांची फवारणी सुद्धा फुलं लागल्यानंतर टाळलेली बरी. 👉 काही ठिकाणी सोयाबीनमध्ये खरगे - खरगे म्हणजे पॅचेस पिवळे पडत आहे, सुकत आहे; अशा पॅचेसमध्ये व त्याच्या आजूबाजूला मेटालॅक्सिल + मॅन्कोझेब म्हणजे रिडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा दाट फवारा द्यावा. 👉 तसेच भविष्यातील चारकोल रॉट किंवा फायटोप्थोरा रोगापासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चांगल्या गुणवत्तेचे ट्रायकोर्मा जमिनीवर रेतीत किंवा मातीत मिसळून फेकावे. 👉 विरळ किंवा पातळ सोयाबीनमध्ये टॉपअप या संजीवकाचा फवारा देऊन फांद्याची संख्या वाढ करून घ्यावी. 👉 पावसाचा ताण पडत असलेल्या भागात सोयाबीनमध्ये हलकी आंतरमशागत करत राहावी व साधा १९:१९:१९ चा फवारा द्यावा. ज्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी हलके सिंचन सुद्धा करावे.

  • 10 авг.2 2612

    🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴 दिनांक: १० ऑगस्ट २०२६ ⛅️⛅️हवामान अंदाज ⛅️⛅️ 👉 या आठवड्यात सुद्धा मागच्या आठवड्यासारखेच हवामान राहण्याचा अंदाज आहे. कोणत्याही कमी दाबाच्या पट्ट्याची या आठवड्यात शक्यता नसल्याने मोठा दिवसभर चालणारा सार्वत्रिक पाऊस अपेक्षित नाही. मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार पाऊस पडू शकतो, ज्याबाबत निश्चित कुठे व किती पडेल हे सांगता येत नाही. 👉 आम्ही शिफारस करत असलेल्या औषधांचे प्रमाण हे २० लिटरच्या पंपाचे असून, पंप बदलल्यास त्यानुसार औषधाचे प्रमाण बदलावे. फवारणी करताना विषबाधा होणार नाही याची आवश्यक काळजी घ्यावी. 👉 १२ तारखेच्या अमावस्येनंतर तीन दिवसांच्या आत ज्या पिकांवर अळी येऊ शकते अशा पिकांवर अंडीनाशक सरेंडरचा फवारा अवश्य द्यावा.

  • 6 авг.4 4306

    без подписи

  • 6 авг.4 2428

    без подписи

  • 6 авг.4 3206

    без подписи

  • 6 авг.4 1164

    без подписи

  • 6 авг.3 7606

    без подписи

  • 6 авг.3 5416

    без подписи

  • 3 авг.4 2501

    https://youtu.be/aXJxfuWReUw

  • 3 авг.4 3951

    https://youtu.be/7qoHlejWNsg

  • 3 авг.3 9802

    🌱तुरीबद्दल माहिती🌱 👉 तुरीचे बऱ्याच जागी शेंडे पिवळे दिसत आहे, त्याची फारशी चिंता करू नये. जास्त ओलावा किंवा वानांच्या वैशिष्ट्यामुळे हा पिवळेपणा सुरुवातीला दिसतो, जो कालांतराने कमी होईल. 👉 तुरीची भविष्यातील मर रोग व फांदीमर हे रोग टाळण्यासाठी आत्ताच जमिनीत ओलावा असतांनी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा वापरावे. ट्रायकोबूस्ट DX एकरी अर्धा किलो आळवणीत आपण वापरू शकता. यासोबतच अन्नद्रव्याच्या उपलब्धतेसाठी NPK बूस्ट DX हे जिवाणू खत सुद्धा एकरी अर्धा किलो वापरायला हरकत नाही. 👉 दोन ओळीतील अंतर योग्य असल्यास दोन झाडातील अंतर योग्य ठेवण्यासाठी लागवडीनंतर २५ दिवसादरम्यान तुरीची विरळणी करून दोन तासात दोन झाडात किमान एक फूट व जास्तीत जास्त दोन फूट अंतर ठेवावे इतर झाडे उपटून टाकावीत. 👉 विरळणी केल्यानंतर वाचलेल्या झाडांचे शेंडे खुडावे. ज्यामुळे फांद्याच्या संख्येत वाढ होते. मात्र ज्या ठिकाणी सोयाबीन तुरीमध्ये दोन फुटापेक्षा कमी अंतर आहे, तिथे तुरीचे शेंडे खुडू नये, नसता त्याला सोयाबीन दाबू शकते. 👉 पेरणीसोबत खत दिले नसल्यास दोन महिन्यात कधीही खत देता येते. पानं गुंडाळणारी अळी कमी असल्यास फवारणीची घाई तुरीसाठी करू नये.

  • 3 авг.3 5002

    🟢श्री गजानन जाधव यांचा महत्वाचा कृषी सल्ला🟢 🌱सोयाबीन बद्दल माहिती🌱 👉 काही ठिकाणी विविध कारणांमुळे सोयाबीन पिवळं पडलं आहे. जास्त पावसाने किंवा पाणी साचल्यामुळे पिवळं पडलं असल्यास वापसा झाल्यावर आपोआप हिरवं होईल. 👉 चुनखडी जमिनीतील पिवळं पडलं असल्यास त्यावर झिंक EDTA २० ग्रॅम व फेरस EDTA २० ग्रॅमचा फवारा द्यावा. 👉 तणनाशकाचा शॉक लागल्याने पिवळं पडलं असल्यास शॉक-अब किंवा त्या सारखं संजीवक फवारावे. 👉 येलो मोझॅकमुळे पिवळं झाडं पडले असल्यास असे झाडं ताबडतोब उपटून पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी ओढाची एक्स्ट्रा फवारावे. 👉 हुमणी अळी असल्यास मेटारायझियम अधिक बिव्हेरिया याची आळवणी करावी. व खोडमाशीमुळे पिवळं पडल्यास नियंत्रणासाठी रावडी अधिक १९:१९:१९ फवारावे. 👉 यावर्षी पेरणीनंतर पडलेल्या पावसाच्या खंडामुळे मोठ्या प्रमाणात खोडमाशी वाढली आहे. त्यासाठी तणनाशकासोबत किंवा वेगळं रेज किंवा रावडी २० मिली प्रति पंप फवारावे. 👉 फुलं लागण्यापूर्वीचा पहिला फवारा असल्यास या अगोदर रेज / रावडी फवारलं नसल्यास रावडी किंवा सिंजो व सोबत वाढ व फुटवे कमी असल्यास टॉपअप किंवा रिफ्रेश व १९:१९:१९ फवारू शकता. 👉 मात्र फूल लागले असल्यास व योग्य वाढ असल्यास रावडी, सिंजो किंवा विटारा प्लस या अळीनाशकासोबत झेप व १२:६१:० व जास्त फुलां जास्त फुलांसाठी घ्यावे. वाढ जास्त असल्यास सोबत प्रोपिको २० मिली घेऊ शकता. 👉 सोयाबीनमध्ये उगवणपूर्व तणनाशक वापरले असल्यास २५ दिवसानंतर अंतरमशागत करावी. २५ दिवसादरम्यान उगवण पश्चात तणनाशक वापरावीत. तण मोठं झाल्यानंतर तणनाशकाचे निकाल फारसे चांगले येत नाहीत. 👉 भविष्यातील चारकोल रॉट किंवा फायटोप्थेरा रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये एकरी अर्धा किलो ट्रायकोबूस्ट डीएक्स किंवा इतर ट्रायकोडरमा शिफारसीत मात्रेत रेती किंवा मातीत मिसळून पेरणीनंतर ३० ते ४० दिवसादरम्यान ओलावा जमिनीत असतांनी वापरावे. 👉 तणनाशकाचा शॉक कमी करण्यासाठी तणनाशकासोबत शॉक-अब या संजीवकाचा वापर करावा. 👉 पातळ किंवा विरळ झालेल्या सोयाबीनला जास्त फुटवे काढण्यासाठी फवारणीत टॉपअप या संजीवकाचा वापर करू शकतो. 👉 पेरणीसोबत खत दिले नसल्यास किंवा कमी खत दिले असल्यास एकरी अर्धा किलो एनपीके बूस्ट डीएक्स रेती किंवा मातीत मिसळून एका एकरात फेकावे. सोयाबीनमध्ये फूल लागल्यानंतर शक्यतो अंतरमशागत करू नये. 🌱कापसाबद्दल माहिती🌱 👉 या वर्षी विविध कारणांमुळे कापसाची अपेक्षित वाढ सध्या दिसत नाही. सुदृढ वाढीसाठी फवारणीत टॉपअप किंवा रिफ्रेश या संजीवकाचा ५० मिली प्रति पंप वापर करू शकता. तसेच सुदृढ व चांगल्या वाढीसाठी आळवणी करू शकता. आळवणीमध्ये एकरी अर्धा किलो NPK बूस्ट DX अधिक दीड लीटर रायझर अधिक ३ किलो १९:१९:१९ हे घटक वापरू शकता याला सोबत वापरायला हरकत नाही. 👉 कापसावर शक्यतो कीड नसल्यास पहिला फवारा लांबवावा. मावा, तुडतुडा वाढल्यास रिहांश २५ मिली किंवा पाते लागल्यानंतर रेज २० मिली, यासोबत तुडतुडा जास्त असल्यास बोरिक ॲसिड २० ग्रॅम घ्यावे. सुदृढ वाढीसाठी टॉपअप किंवा रिफ्रेश अधिक १९:१९:१९ घेऊ शकता. 👉 अतिघण किंवा दाटलाड पद्धतीने लागवड केलेल्या कापसाची गळफांदी ४५ दिवसा दरम्यान कापावी. 👉 कापसाला खताच्या पहिल्या डोसमध्ये योग्य प्रमाणात स्फुरद व पालाश दिले असल्यास, दुसऱ्या डोसमध्ये युरिया व सल्फर २ किलो प्रति एकर द्यावे. पहिला डोस कमी दिला असल्यास दुसऱ्या डोसमध्ये युरियासोबतच १०:२६:२६, २४:२४:० किंवा DAP अधिक पोटॅश द्यावे. 👉 कापसावर वारंवार तणनाशकाचा वापर टाळावा व शक्य असल्यास निंदण व अंतरमशागत करून तणांचे नियंत्रण करावे. 👉 काही जागी प्री-मान्सूनमध्ये लागवड केलेल्या कापसावर पातेअळी दिसत आहे, ज्याचे प्रमाण नॉन-बीटीच्या झाडावर जास्त असू शकते. त्यासाठी फवारणीत इमान वापरावे अळी व फुलकिडा या दोघांचे याने नियंत्रण होईल.

  • 3 авг.3 1302

    🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴 दिनांक: ३ ऑगस्ट २०२६ 🌦हवामान अंदाज🌦 👉 या आठवड्यात कोणताही कमी दाबाचा पट्टा नाही, म्हणून या आठवड्यात सार्वत्रिक दमदार व दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता नाही. मात्र काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार दुपारनंतरचा विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. तसेच ऊन व ढग यांचा लपंडाव सुद्धा या आठवड्यात दिसून शकतो. होऊ शकते अशीच विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची स्थिती पुढच्या आठवड्यातसुद्धा कायम राहील. 👉 शेतकऱ्यांनी अशा स्थितीत शेतीकामे सकाळी लवकर सुरू करून दुपारपर्यंत आटपावी. 👉 फवारणीमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या स्टिकरचा वापर करावा. आम्ही शिफारस करत असलेल्या फवारणीच्या औषधांचे प्रमाण हे २० लिटरच्या पंपाचे आहे, पंप बदलल्यास औषधांचे प्रमाण त्यानुसार बदलावे.

  • 1 авг.4 4935

    без подписи

  • 1 авг.4 3754

    без подписи