- Последний пост
- 28 июн.
- Последнее чтение
- 15 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- und
- Категория
- Видео (по похожим)
- В каталоге с
- 14 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
Channel name was changed to «Hanumant Hande-PW»
जनगणना सुरू होतेय लिव इन मधे राहणारे सुद्धा आता कुटुंब म्हणले जाणार !!! https://youtu.be/P9D1tUNuqe0?si=0TSw3tLGSIW8bMz6
भारतात एनर्जी लॉकडाउन लागणार का?? https://www.youtube.com/watch?v=GwsmyyzUwvg
Please do share कृपया शेयर करा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे https://youtu.be/v3xcnt4W08M
📚📚 SECRETS OF MATH – Mind Calculation Book 👑4000+ प्रश्न ⚡️ गणित वेगाने सोडवण्यासाठी सर्वात प्रॅक्टिकल बुक! फक्त 85 रुपयात. 🔥 फक्त काही दिवसांसाठी स्पेशल ऑफर! गणितातील वेग, accuracy आणि confidence वाढवण्यासाठी एकदम परफेक्ट पुस्तक! ⚫️ या पुस्तकात तुम्हाला काय मिळेल? ✅ Mind Calculation चे Shortcuts ✅ Vedic Maths techniques ✅ 30 सेकंदात Calculation करण्याचे पद्धती ✅पोलीस भरती, SSC, RRB, Banking, MPSC, तलाठी सर्व परीक्षांसाठी उपयोगी ✅ सोपी स्पष्टीकरण शैली 🎓 बुक ऑर्डर कसे करायचे? 🔖 खालील लिंक वर जाऊन आपली माहिती भरून 85 रू Payment करावे लवकरच हे पुस्तक तुम्हाला पाठवण्यात येईल. https://thesecretsofmath.myinstamojo.com/product/the-secrets-of-math/ 💬 WhatsApp: 9075488448 🚚📖 COD Not Available | Prepaid Only 📮🛍 All India Delivery Available 📚 डेमो PDF ⤵️ https://drive.google.com/file/d/1OgL9t9NysAmOnKxNSIjfyay_b1T7_c5G/view?usp=drivesdk 📱 Instagram - @csatharshad 📱Telegram - @mathreasoningssc 📱 YouTube : Harshad Maane Math Reasoning
नोंद - दोन वर्षांपूर्वी हे लिहिलेय, मात्र स्थिती बदलली नाही. त्यांचं जगणं, केवळ श्वासापुरते उरले असेल का असा प्रश्न राहून राहून मनात येतोय.
ओळखीच्या कुटुंबातील प्रौढ मतिमंद मुलाचे नुकतेच निधन झाले. चाळीशी पार वय होते त्याचे. त्याला दोन भावंडे होती जी नॉर्मल होती. हा धाकटा होता. याचे वडील काही वर्षांपूर्वी निर्वतलेले. याची दोन्ही भावंडे लग्न होऊन संसाराला लागलेली. त्यांच्या बायकांना, हा दाढीमिशा आलेला, कथित बेढब दिसणारा वयस्कर प्रौढ दीर सांभाळणे जिकिरीचे आणि काही प्रमाणात अवघडणारे लाजेचे वाटत असावे. अथवा आणखीही काही पारिवारीक वा व्यावहारिक कारण असावे. ते दुष्ट वाईटच असावेत असेही नसेल. पंचाहत्तरी गाठलेली आई आणि चाळीशीतला तिचा तो निरागस मुलगा दोघेच इकडे राहत. त्याचा दवाखाना वा आजारपण उद्भवले की एखादा भाऊ येऊन दोनेक दिवसांची चक्कर टाकून मदत करून जाई. गेल्या काही दशकात त्यांच्या कुटुंबात अनेक कार्यक्रम झाले मात्र ती आई आणि तो मुलगा क्वचित कुठे दिसले! तो मुलगा हेच तिचे विश्व! आठ वर्षांपूर्वी तिचे पती अपघाताने गेले तेव्हा ती कोसळून गेली कारण आता मुलगा आणि ती असे दोघेच त्या घरात उरलेले. मुलासाठी केअरटेकर ठेवणारे परवडणारे नव्हते. तुटपुंजे उत्पन्नात कसेबसे भागत होते. त्याची दाढी करणे, केस कापणे, लघवी संडास काढणे सारे ती माऊली करे. काही दिवसांपूर्वी त्याला फुफुसाचा संसर्ग झाला. आठवडाभराचे हॉस्पिटलायजेशन झाले. तो असा एकाएकी जाईल असे कुणाला वाटले नव्हते. डोक्याचा भलामोठा भेंडा सांभाळत आपले मोठाले डोळे मिचकावत निरागस हसणारा तो जीव आयसीयूमध्येच गेला. घरी असला की तो हाफचड्डी नि बंडीमध्ये असायचा. घसरत घसरत पुढे सरकायचा. आईच त्याला घास भरवायची. त्याला थापटत झोपी लावायची. त्याला इच्छा झाली तर टीव्हीवर जुनी गाणी सिनेमे लावून द्यायची. तिचा सारा दिवस त्याच्या देखभालीत जायचा. तो जन्मल्यापासून तिला वैयक्तिक आवडीनिवडी, इच्छा आकांक्षा, छंद यांचा विसर पडला होता. तिचे सुख त्याच्या मायेत समर्पित झाले होते. त्याचे वडील हयात होते तोवर त्यांची खूप मदत व्हायची. नंतर मात्र तिने एकटीने किल्ला लढवला होता. तो असा तडकाफडकी गेला तेव्हा अनेकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की, 'बरे झाले आता मथुराबाईची सुटका झाली. फार केलं तिने! त्याचं पुण्य तिच्या पदराला येईल!' तो गेला त्या दिवशी त्या माऊलीचे अश्रू सरत नव्हते! अख्ख्या गल्लीतल्या बायका तिच्या घरी येऊन हमसून हमसून रडल्या. त्याचे क्रियाकर्म मोठ्या भावाने केले. अन्य सारे विधी झाले. तिच्या दोन्ही मुलांनी आईला आपल्यासोबत येण्याचा खूप आग्रह केला मात्र ती माऊली काही त्यांच्यासोबत गेली नाही. पत्नीसोबत त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा त्या ओक्साबोक्शी रडल्या. "किस्ना (त्यांचा मुलगा) असताना त्यांनी मला राहायला बोलवलं खरं, पण किस्ना त्यांना रुजत नव्हता, आता तो नाहीये असं त्यांना वाटतं. पण तो तर माझ्या काळजात आहेच की! तो चालेल का त्यांना? तो हयात असता आणि त्यांनी आग्रह केला असता तर नक्की गेले असते, आता जाऊन काय करू? तिथे गेल्यावर घरच्या आठवणींनी ऊरात काहूर माजेल! जीव लागणार नाही. तिथेही नातवंडे आहेत त्यांच्यात मला किस्ना दिसेल! माझा किस्ना मला टाकून एकटाच निघून गेला, त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही." काही केल्या त्यांचा शोक ओसरत नव्हता. त्यांच्या बहिणीची विधवा मुलगी आता सोबतीस असते. गल्लीच्या कोपऱ्यालाच त्यांचे जुन्या पद्धतीचे दोन खोल्यांचे घर आहे. अंगणात तुळस आहे. बाहेर पांढऱ्या नि गुलाबी सदाफुलीची पुरुषभर उंचीची झाडे आहेत, दोन तीन नारळांची झाडे आहेत. देखणा सोनचाफाही आहे. दिवस मावळताना रोज सांजेला त्या तुळशी वृंदावनात दिवा लावायच्या, अगदी न चुकता, अजूनही लावतात! आताशा एक दिवा उंबरठ्यावरही दिसतो! गावाकडची माणसं जुन्या श्रद्धांवर जीव लावून असतात, त्यांना वाटतं की उंबरठ्यावर दिवा ठेवला तर हरवलेला, निघून गेलेला आपला जिवाभावाचा माणूस परत येईल! आताशा मथुराबाई याच हेतुने उंबरठ्यावर दिवा लावत असतील. त्या दिव्याच्या ज्योतीत त्यांना किस्ना दिसत असेल! न संपणारी प्रतीक्षा जिवघेणी असते, काळजाच्या न सुकणाऱ्या जखमा दाखवता येत नसतात! सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात, सारीच दुःखे सांगता येत नसतात, सर्वांना सर्व काही सांगता येत नसते! काही माणसं हयातभर जळत असतात, झिजत असतात, झटत असतात! लोक त्याला त्याग समर्पणाचे नाव बहाल करतात, मात्र ज्या जिवाने हे भोगलेले असते त्याच्या वेदना जगातला कुठलाही जीव समजून घेऊ शकत नाही हेच खरे सत्य असते! त्या दिवशी घरी गेल्यावर मथुराबाई रडत रडता म्हणाल्या होत्या की, पुनर्जन्म असतो की नाही मला ठाऊक नाही मात्र असलाच तर किस्नाच्या पोटी मला जन्माला यायचेय, त्याच्या कुशीत मला शांत झोपी जायचेय! आता नुकतीच दिवेलागण झालीय, बाहेर रस्त्यावरही बऱ्यापैकी अंधार आहे, घरोघरी लाईट्स लागल्यात. मथुराबाईंच्या घराच्या उंबरठ्यावर आजही दिवा नक्की तेवत असेल आणि घरात त्या तेवत असतील शांतपणे फुलवातीसारखं! - समीर गायकवाड
Channel photo updated
ती नेटाने अन कष्टाने नाचत होती आणि तरीदेखील लोक मिटक्या मारत तिचा नाच पाहत होते. तिच्यावर दौलतजादा करत होते. हे विदारक दृश्य पाहताच गुरुदत्त आपल्या मित्राशी कानगोष्ट करून तिथून उठून गेले. जाताना हातातली नोटांची बंडले त्यांनी तिथेच ठेवली. ते सर्व पैसे त्या मुलीच्याच हाती देण्याविषयी ते बजावून गेले.... या घटनेनंतर दोन दिवस त्यांनी स्वतःला बंदिस्त केलं, त्या धक्क्यातून सावरताच गुरुदत्तनी 'प्यासा'मधील गुलाबोला (वहिदा रेहमान) कळवले की, "मला साहिरच्या 'त्या' गाण्यासाठी कुंटणखाण्याचा सीन मिळाला आहे." आणि आधी ठरवल्याप्रमाणे त्याच लोकेशनप्रमाणे त्यांनी ते गाणे शूट केले आणि हिंदी चित्रपटसंगीताच्या खजिन्यात एका अनमोल रत्नाची भर पडली. एसडींनी संगीत दिलेलं, काळजाला पीळ पाडणारे रफींच्या दर्दभऱ्या आवाजातले ते आर्त गीत होतं - 'जिन्हें नाज है हिंदपर, वो कहा है.....' हळव्या मनाचा माणूस कोठा, तवायफ आणि वेश्यांकडे गेला की छिलून निघतो हेच खरे आहे, जे मी अनेकदा अनुभवले आहे, पाहिले आहे. 'प्यासा'साठी गुरुदत्तला त्रिवार सलाम ! गुरुदत्त तिथून निघून आले पण त्या मुलीला ते तिथून बाहेर काढू शकले नाहीत. त्या मुजरेवाल्या तवायफ तरुणीसारखीच लतादेखील सात महिन्याची पोटुशी असून कैकांच्या भुका मिटवत होती. लताच्या गर्भावर आशा ठेवून बसलेली नट्टीबाई धंदा करत नव्हती पण धंदेवालीपेक्षा वाईट जीवन ती जगत होती. लताला आपल्या भविष्याच्या तजविजीसाठी मूल हवं होतं तर नट्टीबाईला नवऱ्यासोबत जगण्यासाठी आधार म्हणून मूल हवं होतं. या दोघीत मला फरक असा वाटलाच नाही. त्यांची सर्व माहिती असून मी ही काही करू शकलो नाही, गुरुदत्तनी निदान त्या बाईला पैसे देऊन मनावरचे ओझे हलके केले पण माझे काय ? लताचे ओझे अजूनही काळजावर आहेच ! तेंव्हा लताचं वय तिशी पार होतं. सभ्य जगातल्या स्त्रिया आपल्या मुलाची वाढ नीटनेटकी व्हावी म्हणून डॉक्टरकडे जाऊन नित्य तपासणी करून हेल्थ सप्लिमेंटस, औषधे इत्यादी घेतात. पण लता सिगारेट दारू प्यायची. हे चालू ठेवलं तर गर्भातल्या मुलावर वाईट परिणाम होतील असं म्हटल्यावर ती मोठमोठ्याने हसली होती. सिगारेटची धूम्रवलये हवेत सोडत अत्यंत कोरड्या स्वरात उत्तरलेली, "तुमच्या दुनियेतलं शेळपट पोर हवंय कुणाला ? मला जगवायचं म्हणजे त्याला सगळं काही सोसता आलं पाहिजे ! भडवेगिरी सोडून सगळं काही करता आलं पाहिजे ! " पुन्हा विकट हास्य करत ती धुरांच्या वलयात हरवून गेली. मी निरुत्तर झालेलो. अजूनही त्या आठवणींनीं कासावीस व्हायला होतं. लता आणि नट्टीबाईचं पुढं काय झालं असेल? तिची प्रसूती झाली असेल का? मुलगा की मुलगी? दोघीतली कोण हरली असेल? आता कुणी हयात असेल का? एक ना अनेक प्रश्न मागे ठेवून रोजची लढाई लढावी लागते, त्याला पर्याय नाही. 'जिसका कोई नही उसका खुदा है' असं म्हटलं जातं मग इथं तर यांचं कुणीच नसतं ! या बायकाच जित्या जागत्या देवता होत, त्याच यांचं भविष्य ठरवणार आणि घडवणार. आपण फक्त नि फक्त सुस्कारे सोडत राहतो. पंधरा ऑगस्ट नि सव्वीस जानेवारीच्या दिवशी फार तर सवाल करतो की, "'जिन्हें नाज है हिंदपर, वो कहा है.....? खरेच कुठे गेलीत ती माणसं, ज्यांना या देशाचा देशातल्या मातीचा नि देशातल्या सर्वच माणसांचा अभिमान होता? - समीर गायकवाड
लता सात महिन्याची गर्भवती होती, तरीही बाजारात उभी होती. या अवस्थेत असताना तिच्याकडे येणार्या गिऱ्हाईकात सगळे आंबटशौकीन भरलेले असत. गर्भवती बाईसोबतची 'मजा' कशी असते याचा अधाशी हव्यास असणारे लोक तिच्याकडे येत. पन्नास ते पंधरा असा त्यांच्या वयाचा लंबक होता. असो.. लताचा आणि गुरुदत्तच्या 'प्यासा'चा घनिष्ट संबंध आहे. लताला पाहिल्याबरोबर गुरुदत्तचा 'प्यासा'मधला तो सीन आठवला होता कारण लता सात महिन्याची गरोदर असूनही चमडीबाजारमध्ये रात्रीच्या अंधारास आपल्या उरावर घेण्यासाठी नटून थटून तयार व्हायची. शक्य झालं असतं तर अंधारानेही तिच्याशी समागम केला असता का असा प्रश्न पडावा अशी स्थिती! (REPOST) दुपारची जेवणं झाली की या बायका आपली दमलेली शरीरं घेऊन आपआपल्या पिंजऱ्यात झोपी जातात, अस्ताला जाणारा सूर्य यांच्यापर्यंत पोहोचत नाही पण तो अस्त पावल्याची खूण म्हणून अंधार तिथं येतो, पाठीवरचं कुबड सांभाळत पाय खुरडत खुरडत यावं तसा हा अंधार येतो. जिला जास्त गरज असते ती आपल्या देहाचं गाठोडं ढिलं करते आणि आरशापुढे बसते, लेप चढवत राहते. आरसा छद्मीपणे हसत राहतो, रात्रभर कपडे चढत राहतात उतरत राहतात. नट्टापट्टा होण्याआधी चरबटलेल्या केसांवर वेटोळं घालून बसलेला अधाशी मोगरा मध्यरात्री उलटून गेल्यावर पुरता चोळामोळा होतो. जवळपास अख्खी रात्र लतापाशी थांबलो होतो. रात्री दिडच्या सुमारास तिनं दोन घास जेवण केलं आणि पहाट होईपर्यंत सिगारेटी फुंकत आपला भूतकाळ उगाळत बसली. पोर जन्माला घालायचं होतं तिला, मुलगा झाला तर ती सांभाळणार होती आणि मुलगी झाली तर कामवाल्या नट्टीबाईला देऊन टाकणार होती कारण मुलीच्या आयुष्याचा नरक होऊ द्यायचा नव्हता. नट्टीबाईला पोर होत नव्हतं, नवरा मारझोड करायचा. तिचीच कमाई घेऊन व्यसनात उडवायचा. लताची पोर ती आपली म्हणून सांभाळणार होती त्यासाठी तिनं पोटुशी असल्याचं नाटकही रचलं होतं. लताला पोरगं झालं तर पोट खाली झाल्याची नौटंकी करून नवऱ्याचा अंगभर मार खाण्याची तयारी तिनं केली होती. लताच्या अड्ड्यावरून निघताना इतकं असहय अगतिक वाटलं की जिने उतरून खाली आल्यावर भडाभडा उलट्या झाल्या. रस्त्यावर नुकतीच रिक्षांची वर्दळ सुरु झाली होती. माझ्याजवळून जाणारा रिक्षावाला मला उलट्या करताना पाहून स्पीड कमी करत जवळ येत शिव्या हासडत म्हणाला, "***** थोडा कम पीने का.. स्साला... " किती तरी दिवस लताचा विचार मनातून गेलाच नाही. लताचं पुढे काय झालं हे नंतर चौकशी करून विचारण्याची हिंमतही नव्हती, काही वर्षांनी तिथं पुन्हा गेलो तर ती तिथं नव्हती. कुठे गेली कुणालाच माहिती नव्हतं. हे एक बरं असतं, इथल्या बायका आपली जागा बदलून गेल्या की त्या आणि त्यांचा भूतकाळ एकमेकासाठी मरुन जातो. नट्टीबाईने तिथलं काम सोडून बरीच वर्षे झालेली पण तिला शेवटचं कुणी कधी पाहिलं ते सांगणारं भेटलं नाही. एकदोघींना वाटलं चौकशीचं नाटक करत सावज हेरायला आलाय, बाकीच्यांनी खुणावताच त्या मागे सरल्या. पुन्हा लताची भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही पण मेंदूच्या कप्प्यातून तिला बाहेर काढू शकलो नाही. आता तुम्ही म्हणाल यात गुरुदत्त आणि 'प्यासा' कुठून आले ? त्यांचा काय संबंध ? तर संबंध आहे मित्रांनो. त्यासाठी आणखी थोडं वाचावं लागेल. 'प्यासा'च्या सुरुवातीच्या दिवसांत निर्णय घेण्यात आला होता, की सिनेमाची थीम शूट कोठ्यावर आधारित असेल आणि तिचं चित्रीकरणही वास्तववादी असेल. ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित चालू होतं. एका गाण्याच्या शूटिंगला मात्र घोडं अडलं. गाण्यासाठी परफेक्ट लोकेशन ठरवता येत नव्हते. गुरुदत्तनी तर पक्के केले होते की, कोलकत्त्यातील रेड लाईट एरियातील एका बनारसी कोठ्यावरच हे गाणं शूट करायचं. त्याशिवाय गाण्यात सच्चेपणा येणार नाही, त्याशिवाय ते प्रेक्षकांच्या मनाला भिडणार नाही. त्यांचा निर्णय पक्का होता पण अडचण अशी होती की गुरुदत्त कधीच कोठ्यावर गेलेले नव्हते. पण त्यांनीच निर्णय पक्का केलेला असल्याने पिक्चरायजेशनसाठी आधी सेट पोझिशन्स आणि कॅमेरा अँगलच्या नोंदी घेण्यासाठी आपला लवाजमा टाळून आपल्या मित्रांसह गुरुदत्त तिथे गेले. गुरुदत्त तिथे येताच त्यांची खातरदारी झाली. चिकाच्या पडद्याआड नर्तकी येऊन उभी राहिली आणि बाहेरच्या लफ्फेदार बैठकीत मैफल सजली. मनगटाला गजरा बांधून झाला, हातावर अत्तर मळून झाले, वादक मंडळी सज्ज झाली, विडा देऊन झाला आणि मुजऱ्यास सुरुवात झाली. इथवर गुरुदत्त कमालीच्या उत्सुकतेने सर्व बारकावे टिपत होते. पण मुजरा सुरु झाल्यानंतरचे दृश्य पाहून ते कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्या अंगावर सर्रकन काटा आला. काही क्षण त्यांना स्वतःचीच लाज वाटली. मुजरा पाहताना त्यांच्या चाणाक्ष नजरेने ताडले होते की, कोठ्यावर नाचणारी ती तरुणी जवळपास सात महिन्यांची गर्भवती होती. ती हसऱ्या चेहऱ्याने नाचत होती पण तिच्या हालचाली अवघडलेल्याच होत्या, त्यातून तिची मजबुरी साफ झळकत होती.
अर्थात, नव्हते मिळाले ते बरेच झाले. जे नोबेल गांधींना मिळाले, त्यावर कोणी डोनाल्ड ट्रम्प हक्क सांगतोय, हे सहन करणेही कठीण गेले असते. एनी वे, मारिया मचाडो यांचे अभिनंदन. त्यांना नोबेल मिळणे हाही अमेरिकेचाच डाव असला तरीही!
शांततेचे नोबेल मारिया कोरिना मचाडो यांना मिळालं, या बातमीपेक्षाही ते डोनाल्ड ट्रम्प यांना नाही मिळालं, याची चर्चा अधिक आहे. नोबेल समितीने स्वतःची लाज राखली. शांततेचे नोबेल डोनाल्ड ट्रम्प यांना दिले गेले असते, तर नोबेलवरचा उरलासुरला विश्वासही उडून गेला असता. ट्रम्प यांच्यापेक्षा या मारिया बर्याच म्हणायच्या. बराक ओबामांना शांततेचे नोबेल मिळाले होते. अमेरिकेचे अध्यक्ष असतानाच नोबेल मिळाले, तेव्हा नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारताना ओबामा म्हणाले होते, “नोबेल मिळण्याइतकं फार काही काम मी करू शकलो आहे, असं मला वाटत नाही. पण यापुढे मात्र शांततेसाठी मी प्रयत्न करावे, यासाठी हा पुरस्कार दिला असावा.” तेव्हा गमतीने एक पत्रकार त्यांना म्हणाला होता, “अमेरिकेचे अध्यक्ष शांततेच्या रस्त्याने निघाले, तरी जगातली निम्मी युद्धं आपोआप संपतील." मुळात, अमेरिकेच्या अध्यक्षाला शांततेचे नोबेल देणे अयोग्यच. अगदी ते ओबामा असले तरी. अर्थात, आहे त्या चौकटीत ओबामांनी शांतता आणि सलोखा या दिशेने काम केले हे निश्चित. ओबामा ही जगाची आशा होती. धाकट्या जॉर्ज बुश यांच्यानंतर ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष झाले. बुश साहेबांनी जगाचे रूपांतर युद्धभूमीत करून टाकले होते. अशावेळी अवघ्या जगाचे प्राक्तन समान आहे, अशी भूमिका घेणारा कवी मनाचा एक काळासावळा तरुण व्हाइट हाऊसमध्ये आला. तेव्हा तर ती क्रांतीच होती. ओबामांना नोबेल मिळाले, म्हणून मलाही मिळायला हवे, असा हट्ट डोनाल्ड ट्रम्प यांचा होता. त्यासाठी, काहीही संबंध नसलेल्या ठिकाणीही, आपण युद्ध थांबवले, असा दावा ते करत होते. ज्या मारिया बाईंना नोबेल मिळाले आहे, त्या आहेत व्हेनेझुएलाच्या. ट्रम्प यांना हा आणखी त्रास. कारण, अमेरिकेच्या अगदी शेजारी व्हेनेझुएला आहे. मारिया हार्वर्डमध्येच शिकल्या आहेत. लॅटिन अमेरिकेच्या राजकारणातले हे एक महत्त्वाचे नाव. ह्युगो चावेझ नावाचा तगडा नेता दीर्घकाळ इथे अध्यक्ष होता. अमेरिकेच्या अनेक अध्यक्षांना चावेझ यांनी वठणीवर आणले. अमेरिका जगभर धुमाकूळ घालत असताना, या शेजारच्या चिमुकल्या देशाकडे मात्र अमेरिकेला बघताही येत नव्हते. चावेझ हे अनेक अर्थाने महत्त्वाचे. मात्र, अनेक डावे पक्ष पुढे हुकूमशाहीकडे वळतात. समाजवाद आणि साम्यवाद हे शब्द कागदावर कितीही गोड वाटले, तरी ज्यातून हुकूमशाही जन्माला येते, अशा समाजवादाचे करायचे काय? ही तुलना नाही. मात्र, तसेच सांगायचे झाले, तर हिटलरच्या पक्षाचे नावही ‘सोशालिस्ट पार्टी’ होते. चावेझ यांच्यासमोर बोलण्याची हिम्मत कोणाचीही नव्हती, त्यावेळी एक तरुण मुलगी थेटपणे त्यांना विरोध करत होती. तिचे नाव मारिया. ही मारिया शिकली अमेरिकेतच. तिचे व्यक्तिमत्त्वही काहीसे अमेरिकी वळणाचे. त्यामुळे अमेरिकेनेच चावेझ यांच्या विरोधात त्यांना चावी दिली आहे, अशी टीका चावेझ यांचे समर्थक तेव्हा करत असत. ते अशक्य नव्हतेही. अमेरिकेला लॅटिन अमेरिकेला नेहमीच धडा शिकवायचा असतो. ट्रम्प यांना तर लॅटिन अमेरिकेचा फार त्रास. आता मारियांना नोबेल मिळाल्याने ते अधोरेखितच झाले! चावेझ गेल्यानंतर मादुरो नावाचा नवा सत्ताधीश खुर्चीवर बसला. चावेझ यांच्याकडे काही उद्दिष्ट होते. दृष्टी होती. मादुरो ही त्या विचारांची अधोगती होती. हुकूमशहाचे अवगुण त्याच्यामध्ये ठासून भरलेले. मात्र, त्यालाही मारियाला संपवणे शक्य झाले नाही. विरोधकांचा चेहरा म्हणून मारिया पुढे आल्या. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत त्या उभा ठाकल्या असत्या, मात्र त्यांना निवडणुकीत अपात्र ठरवून त्यांचे राजकीय करियर संपवण्याचा प्रयत्न सरकारने केला. तरीही, बाई हिम्मत हरल्या नाहीत. त्यांना अमेरिकेचा पाठिंबा होता. आहेही. मादुरो हे हुकूमशहा आहेतच, पण ट्रम्प यांनी त्यांना लोकशाही सांगावी, हे फारच झाले. असो. तर आपण मारियाविषयी बोलतोय. त्यांना मागे एकदा विचारलं होते- इतकी वर्षे तुम्ही लढत आहात. झुंजत आहात. तरी यश मिळत नाही. तुम्हाला नैराश्य येत नाही का? त्या हसल्या आणि म्हणाल्या, “येतं तर. पण, अशावेळी मी महात्मा गांधींकडे बघते. सहा दशके या माणसाने संघर्ष केला, तेव्हा कुठे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. मात्र, गांधी हिंमत हरले नाहीत. सत्य आणि अहिंसा या मार्गानेच यश मिळते, यावर माझी श्रद्धा आहे.” आफ्रिकेतले नेल्सन मंडेला असोत की अमेरिकेतला बराक ओबामा किंवा लॅटिन अमेरिकेतील ही मारिया. मोहनदास करमचंद गांधी हाच या माणसांचा आदर्श असतो. किमान, त्यांचे नाव तरी घ्यावे लागते! त्यातही गंमत अशी की, खुद्द महात्मा गांधींना मात्र नोबेल कधीच मिळाले नाही. त्यांचे नाव अनेक वेळा चर्चेत आले. नामांकनही मिळाले. प्रत्यक्षात मात्र गांधींना नोबेल कधीच मिळाले नाही. नोबेल समितीलाही त्याचा पश्चाताप होत असतो. गांधींच्या वाटेने चालणाऱ्या, त्यांचे नाव घेणार्या अनेकांना नोबेल मिळाले. गांधींवर काढलेल्या सिनेमाला 'ऑस्कर' मिळाले. गांधींना मात्र नोबेल कधीच मिळाले नव्हते.
Big News 🗞️ समाजशास्त्र ऑप्शनल बैच २०२६ साठी चालू होत आहे समाजशास्त्रच का ? मानवी जीवन समृद्ध करणारा विषय पाश्चात्य संस्कृतीपासून भारतीय जातीव्यवस्थेपर्यंतचा थरारक प्रवास पितृसत्ताक व्यवस्थेपासून समानतेकडे जाणारा मार्ग विचारांच्या सर्व कक्षा विस्तारून जगण्यालाच नवा अर्थ देणारा विषय !! भेटूया !!
आरएसएसने सुरुवातीला तिरंगा हा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्य केला नव्हता. संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ने संपादकीयामध्ये भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून भगवा ध्वज स्वीकारावा, अशी मागणी केली होती. तिरंग्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृती दिली गेल्यानंतर, ‘ऑर्गनायझर’ने तिरंग्यावर आणि त्या निर्णयावर तीव्र टीका केली. एवढेच काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरुवातीला भारतीय राज्यघटनेलाही मान्यता दिली नव्हती. राज्यघटनेत मनुस्मृतीतील 'महर्षी मनूंचे कायदे' यांचा उल्लेखच नाही, अशी त्यांची टीका होती. राज्यघटना अंतिम झाल्यानंतर, संघाचे मुखपत्र असलेल्या याच ‘ऑर्गनायझर’ने ३० नोव्हेंबर १९४९ च्या अग्रलेखात म्हटले होते- "आपल्या राज्यघटनेत प्राचीन भारतातील विलक्षण घटनात्मक परंपरांचा उल्लेखच नाही. मनुस्मृतीत मांडलेल्या कायद्यांचे कौतुक जग करत आहे. पण आपल्या घटनाकारांना त्याचा अर्थ समजत नाही." भारतीय राज्यघटनेपेक्षा ‘मनुस्मृती’ महत्त्वाची, असेही एका लेखात म्हटले होते. ‘डॉ. आंबेडकर यांनी ‘मनूचे दिवस संपले’ असे म्हटले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, हिंदूंचे दैनंदिन जीवन आजही ‘मनुस्मृती’ आणि इतर स्मृती यातील तत्त्वे व आदेश यावरच सुरू आहे. अगदी परंपरा न पाळणारा हिंदूदेखील काही बाबतीत तरी स्मृतीतील नियमांनी स्वतःला बांधलेले मानतो', असे संघाचे मुखपत्र म्हणते. आणि, आंबेडकर-नेहरूंवर जोरदार हल्ला चढवते. डॉ. बाबासाहेबांनी राजर्षी शाहू महाराजांना सोबत घेऊन माणगाव परिषद केली. त्यानंतर ‘मनुस्मृती’ जाळली. राज्यघटना लिहून कायद्याची नवी भाषा दिली. गांधी-नेहरू-पटेलांच्या खांद्याला खांदा लावून बाबासाहेब उभे ठाकले. बाबासाहेब ध्वज समितीवरही होते. त्यांनीच तिरंग्यावर शिक्कामोर्तब केले. आणि, नागपुरातच बाबासाहेब लाखो अनुयायांना घेऊन बुद्धांच्या वाटेने निघाले. १९२०मध्ये टिळकांचे देहावसान. १९२० मधील नागपूरच्या कॉंग्रेस अधिवेशनातील गांधीपर्वाची झलक. १९२०मधील ऐतिहासिक माणगाव परिषद. १९२० मध्ये सुरू झालेल्या ‘मूकनायक’मधील क्रांतिकारी भाषा. यामुळे संघाच्या स्थापनेची निकड भासू लागली. १९२४मध्ये गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले आणि मग तर ती तातडीची गोष्ट झाली. आणि, शंभर वर्षांपूर्वी संघ स्थापन झाला. त्यामुळेच कदाचित संघासाठी गांधी प्रातःस्मरणीय आहेत! गंमत बघा. १९२०मधील नागपूर अधिवेशनात गांधींना विरोध करत बॅ. मोहम्मद अली जिनांनी कॉंग्रेस सोडली. त्यानंतरच मुंजे आणि हेडगेवारांनीही कॉंग्रेस सोडली. धर्माच्या पायावर उभ्या राहिलेल्या संघटनांच्या दिशेने त्यांचा प्रवास झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तिथेच देशाला बुद्धांची नवी वाट दाखवली! - संजय आवटे {गांधी+नेहरू+आंबेडकर = भारत या विषयावर बोलताना...}
बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला गांधींना सुनावले, पण त्यानंतर गांधींचे महत्त्व त्यांच्याही लक्षात येत गेले. बाबासाहेबांनी १९२०मध्ये ‘मूकनायक’ सुरू केले. सुरुवातीला महात्मा गांधींबद्दल कडक शब्दात बोलणारे आंबेडकर ‘मूकनायक’मधून गांधी विचार प्रकाशित करू लागले. नंतर हे संबंध ताणले गेले आणि संविधानाच्या चौकात पुन्हा दोघे एकत्र आले! काँग्रेसमधील महात्मा गांधींच्या उदयामुळे आता आपले काही चालणार नाही, हे मुंजे-हेडगेवार आणि मंडळींच्या लक्षात येत गेले. काँग्रेसमध्ये कट्टर हिंदुत्ववादी असा मोठा गट होता. हे हिंदू राष्ट्र आहे, असे ठामपणे सांगणारा तो गट होता. गांधींच्या अहिंसा आणि धर्मनिरपेक्षता या दोन्ही मूल्यांना त्यांचा विरोध होता. गांधींना विरोध करण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला, मात्र गांधींचे महत्त्व वाढतच गेले. १९२४ मध्ये गांधी बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर या गटाने हार मानली. याच गटाने पुढे १९२५मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला. हिटलर आणि मुसोलिनी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रभाव होता. बी.एस. मुंजे स्वतः मुसोलिनीला इटलीमध्ये जाऊन भेटले. लष्करी शिस्तीतच देशाची प्रगती होऊ शकते. अहिंसेला काही अर्थ नाही, अशी त्यांची धारणा होती. या देशाला ‘हिंदू राष्ट्र’ करण्याचा त्यांचा निर्णय पक्का होता. या सगळ्यांमध्ये महात्मा गांधी हा मुख्य अडसर होता. गांधींना विरोध करण्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झाला आणि काँग्रेसमध्ये गांधीपर्व सुरू झाल्यामुळेच तो स्थापन करावा लागला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपूर्वी हिंदू महासभा होती. १९१५मध्ये हिंदू महासभा स्थापन झाली. मुस्लिम लीग स्थापन झाल्यानंतर आणि मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले गेल्यानंतर हिंदूंची स्वतःची संघटना असावी, अशी मागणी १९०९पासून जोर धरू लागली होती. त्यातून हिंदू महासभेचा जन्म झाला. ज्या मुस्लिम लीगला विरोध करण्यासाठी हिंदू महासभा स्थापन झाली, त्या हिंदू महासभेने पुढे मात्र प्रांतिक निवडणुकांमध्ये मुस्लिम लीगशी हातमिळवणी केली. १९३७ च्या प्रांतिक निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने प्रचंड विजय मिळवला आणि हिंदू महासभा जवळजवळ नामोहरम झाली. मात्र १९३९ मध्ये, भारतीय जनतेचा सल्ला न घेता इंग्लंडने भारताला दुसऱ्या महायुद्धात सहभागी राष्ट्र म्हणून घोषित केले. याच्या निषेधार्थ काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. यानंतर हिंदू महासभेने मुस्लिम लीग आणि इतर पक्षांसोबत हातमिळवणी करून काही प्रांतांत आघाडी सरकारे स्थापन केली. अशी आघाडी सरकारे सिंध, बंगालमध्ये स्थापन झाली. हिंदू महासभेचा अंतर्विरोध इथेच संपत नाही. एकीकडे अखंड हिंदुस्थान, हे आमचे स्वप्न आहे, असे म्हणणार्या हिंदू महासभेने, संस्थाने भारतामध्ये सामील होऊ नयेत, अशी भूमिका घेतली. प्रामुख्याने मैसूर, त्रावणकोर, बडोदा अशी जी हिंदू संस्थाने आहेत, त्यांनी आपले हिंदूपण कायम ठेवावे आणि भारतात सामील होण्याच्या फंदात पडू नये, अशी अधिकृत भूमिका हिंदू महासभेने घेतली होती. हिंदू महासभेला या संस्थानांकडून आर्थिक मदत मिळत असे आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतरही ती संस्थाने स्वतंत्र राहावीत, यासाठी महासभेने त्यांना पाठिंबा दिला. सावरकरांनी तर या संस्थानांना ‘हिंदू सामर्थ्याचा पाया’ असे संबोधले. गांधी आणि नेहरूंना फाळणीसाठी जबाबदार मानणारी एक टोळी आहे. मात्र, हिंदू आणि मुस्लिम असे दोघेही एका देशात राहू शकत नाहीत. ते स्वतंत्र दोन देश आहेत, असा द्विराष्ट्र सिद्धांत बॅरिस्टर जिना यांनी मांडला. तोच सावरकरांनी उचलून धरला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या संदर्भात म्हणतात, ‘हे विचित्र आहे, पण खरे आहे. सावरकर आणि जिना हे एक राष्ट्र विरुद्ध द्विराष्ट्र या प्रश्नावर परस्परविरोधी नसून पूर्णपणे एकमताने एकमेकांसोबत उभे राहतात. भारतात दोन राष्ट्रे आहेत. एक मुस्लिम राष्ट्र आणि दुसरे हिंदू राष्ट्र, यावर ते दोघे केवळ सहमतच नाहीत. तर त्याबद्दल ते ठाम आग्रहही धरतात.' या दोन प्रवाहांमुळेच भारताची फाळणी करणे इंग्रजांना शक्य झाले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हिंदू महासभा अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कुठेही नव्हते. आरएसएसने स्वातंत्र्य चळवळीत सहभागी व्हायला विरोध केला. उलटपक्षी या संघटनेने ब्रिटिश वसाहतवादी सत्तेशी सहकार्याची धोरणे स्वीकारली. काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव केला, तोही यांना मान्य नव्हता. लाहोरमध्ये रावी नदीच्या किनारी झालेल्या काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झाला. आणि, त्यानंतर २६ जानेवारी १९३० रोजी देशभर स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला. २६ जानेवारीला भारतभर सगळ्यांनी तिरंगा फडकवला. संघाने मात्र या निर्णयाला विरोध केला. सगळीकडे भगवा झेंडा फडकवण्याचा आदेश संघाने अधिकृतपणे दिला. त्यानंतर तर भगवा काय आणि तिरंगा काय, या दिवशी कुठलाही झेंडा न फडकवण्याचा निर्णय संघाने घेतला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षांचा झाला आहे. आज गांधी जयंती आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनही आहे. या तिन्ही घटनांचा परस्परांशी खूप जवळचा संबंध आहे. कोणी काही म्हणो, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे श्रेय महात्मा गांधींना दिले पाहिजे. तेवढेच ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही दिले पाहिजे. १९१५मध्ये गांधी आफ्रिकेतून भारतात परतले. त्यांचे गुरु नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी त्यांना सल्ला दिला की, तुला काही बदल घडवायचा असेल, तर त्यासाठी भारत बघितला पाहिजे. आणि, भारत बघायचा असेल तर भारतभर फिरलं पाहिजे. गांधी चालत राहिले. भारत बघत राहिले. त्यानंतर १९१६मध्ये काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनात गांधी पहिल्यांदा सहभागी झाले. तेव्हा, काँग्रेसमध्ये टिळकयुग सुरू होते. एवढे असूनही लोकमान्य टिळकांना काँग्रेसचे अध्यक्षपद कधीच मिळू शकले नाही. तसा प्रयत्न त्यांनी अनेकवेळा करून पाहिला. मात्र, प्रत्येकवेळी ते अपयशी झाले. १९०७मध्ये सुरतच्या अधिवेशनात तर सर्व बळ एकवटून त्यांनी तो प्रयत्न केला. मात्र, शक्य झाले नाही. १९१६मध्ये महात्मा गांधी पहिल्यांदाच काँग्रेस अधिवेशनाला उपस्थित राहिले. त्यानंतर अल्पावधीत मोहनदास करमचंद गांधी हे नाव काँग्रेसमध्ये महत्त्वाचे झाले. चंपारण्य सत्याग्रह १९१७चा. त्यानंतर राष्ट्रीय राजकारणातील गांधींचे महत्त्व अधिकच वाढले. अवघ्या दोन-तीन वर्षातच गांधी एवढे महत्त्वाचे नेते झाले की, टिळकांच्या समर्थकांना चिंता वाटू लागली. गांधींचा प्रभाव संपवायचा असेल, तर लोकमान्य टिळकांना काँग्रेसचे अध्यक्ष केले पाहिजे. त्यांच्या समर्थकांनी हे मनोमन ठरवून टाकले. १९२० मध्ये काँग्रेसचे अधिवेशन नागपूरला होणार होते. या अधिवेशनात लोकमान्यांना अध्यक्ष करायचे, असे यांचे जवळपास ठरले होते. टिळकांचे कट्टर समर्थक बी. एस. मुंजे आणि मुंजेंचे शिष्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा त्यासाठी पुढाकार होता. अधिवेशनाच्या आयोजनाची जबाबदारीही प्रामुख्याने या दोघांकडे होती. मात्र, अधिवेशनापूर्वीच लोकमान्यांचे देहावसान झाले. त्यामुळे टिळकांना अध्यक्ष करण्याची त्यांच्या समर्थकांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. १९२०च्याच या अधिवेशनाने महात्मा गांधींचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. काँग्रेसमध्ये आता ‘गांधीयुग’ सुरू झाले आहे, याची खात्री सर्वांना पटली. पूर्ण अधिवेशनावर प्रभाव होता तो गांधींचा. टिळक समर्थकांना त्याचा ज्याप्रमाणे त्रास होता, तसाच बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनाही होताच. याच नागपूर अधिवेशनात जिनांना अपमानास्पद प्रसंगाला सामोरे जावे लागले. ते बोलत असताना लोकांनी त्यांना जोरजोरात ओरडून गप्प केले. एका वादाच्या प्रसंगी जिनांनी गांधींना ‘महात्मा’ म्हणून संबोधण्यास नकार दिला आणि ते वारंवार फक्त ‘मिस्टर गांधी’ असेच म्हणत राहिले. लोक भडकले. अखेरीस परिस्थिती शांत करण्यासाठी स्वतः गांधींनाच मध्यस्थी करावी लागली. १९२० च्या याच अधिवेशनात महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद आयोजित करण्यात आली होती. मोतीलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि सरोजिनी नायडू त्यासाठी उपस्थित होते. टिळक आणि गांधी यांच्यातील फरक इथे लक्षात येतो. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी लोकमान्य टिळकांविषयी एक आठवण त्यांच्या आत्मकथनात दिली आहे. पुण्यातील अस्पृश्यता निवारण परिषदेत लोकमान्य टिळकांनी भावना उचंबळून टाकणारे भाषण केले. “अस्पृश्यता ही देवाला मान्य असेल, तर मला तो देव मान्य नाही.“ लोकांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला. दुसर्या दिवशी विठ्ठल रामजींनी “मी माझ्या खासगी आणि सार्वजनिक जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही” अशा आशयाचे पत्रक तयार केले. परिषदेतील सर्व नेत्यांच्या सह्या घेऊन ते प्रसिद्ध करण्याचा त्यांचा विचार होता. टिळकांना पत्रक दाखवले आणि सही करण्याची विनंती केली. टिळक विठ्ठलरावांना बाजूला घेऊन गेले आणि त्यांनी सही केली नाही. “शिंदे मला आताच याच्यावर सही करता येणार नाही. मला माझ्या सहकार्यांना विचारावे लागेल..!” १९२० हे वर्ष आणखी महत्त्वाचे आहे. अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी आयोजित केलेली महत्त्वाची माणगाव परिषद तेव्हा झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांनी क्रांतिकारी कार्यक्रम जाहीर केला. बाबासाहेब हेच अस्पृश्यांसह सर्वांचे नेते आहेत, असे खुद्द राजर्षींनी जाहीरपणे सांगितले. राजर्षी आणि टिळक यांच्या संबंधांविषयी काय सांगावे! एकूणच, हिंदुत्वाच्या कर्मठ मांडणीला हा तडाखा होता. गांधी आल्यानंतर काँग्रेसची दिशा बदलणार आहे, याचा अंदाज अनेकांना आला होता. १९१६च्या लखनौ अधिवेशनात नेहरू प्रथमच गांधींना भेटले. सुरुवातीला ते गांधींविषयी साशंक होते. त्यानंतर मात्र नेहरूंवरील गांधींचा प्रभाव वाढत गेला. आणि, त्यांच्यामध्ये दृढ नाते तयार झाले. डॉ.
*PSI Free Interview Guidance Program* सर्व विध्यार्थ्यांना *PW MPSC WALLAH* चा नमस्कार !! MPSC PSI Physical 2024 साठी Qualify झालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन !! Fill the form for the Interview Guidance Program @Pune कृपया Google Form भरून आम्हाला तुमचा Result कळवा. Link 🔗 https://forms.gle/ZzJEFE94CGtds5Pt9
आज शेवटचा दिवस 🚨 MPSC Rajyaseva Interview 2024 Qualifiers! 🚨 PW MPSC WALLAH कडून तुमचं हार्दिक अभिनंदन! 🎉 🔥 Free Interview Guidance Program – नक्की Join करा! ✔️ मुलाखतीची भीती आणि तणाव कमी करा ✔️ प्रभावी बोलणं आणि सादरीकरण शिका ✔️ शारीरिक भाषा सुधारून आत्मविश्वास वाढवा ✔️ Govt अधिकारींच्या अनुभवातून थेट मार्गदर्शन 🗓 नोंदणी आवश्यक: २४ सप्टेंबर मॉक इंटरव्ह्यूचा शेवटचा दिवस 📍 स्थळ: लक्ष्मी चेंबर्स (2रा मजला), रामकृष्ण हॉस्पिटल वर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे Google Form भरून आम्हाला इंटरव्यू ची तारीख क Link 👉🏻https://forms.gle/cUrGgifhn8VV9hkV6
*MPSC Combined(Group B) Final Result 2024 Out!!* सर्व विध्यार्थ्यांना *PW MPSC WALLAH* चा नमस्कार !! *MPSC Combined (Group B) Mains 2024* अंतिम निकालानुसार ज्या उमेदवारांची *STI आणि ASO* पदासाठी निवड झाली आहे. सर्वांचे हार्दिक अभिनंदन !! Fill your Details for STI &ASO Final Result कृपया Google Form भरून आम्हाला तुमचा Result कळवा. Link 🔗 https://forms.gle/koiVUJK3wfbgCUN26
🚨 MPSC Rajyaseva Interview 2024 Qualifiers! 🚨 PW MPSC WALLAH कडून तुमचं हार्दिक अभिनंदन! 🎉 🔥 Free Interview Guidance Program – नक्की Join करा! ✔️ मुलाखतीची भीती आणि तणाव कमी करा ✔️ प्रभावी बोलणं आणि सादरीकरण शिका ✔️ शारीरिक भाषा सुधारून आत्मविश्वास वाढवा ✔️ Govt अधिकारींच्या अनुभवातून थेट मार्गदर्शन 🗓 नोंदणी आवश्यक: १९ ते २४ सप्टेंबर 📍 स्थळ: लक्ष्मी चेंबर्स (2रा मजला), रामकृष्ण हॉस्पिटल वर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे Google Form भरून आम्हाला इंटरव्यू ची तारीख क Link 👉🏻https://forms.gle/cUrGgifhn8VV9hkV6