Marathi joks | मराठी जोक्स
Статистика"हसत रहा, झकास रहा!" मराठी जोक्सचा धमाल खजिना – हलकेफुलके, थोडेफार चावट, पण कायम खळखळून हसवणारे! रोजच्या ताणतणावाला विसरायला, एकदम परफेक्ट ठिकाण!
- Последний пост
- 7 авг.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- 58
- 1/48двое суток
- 66
- 1/72трое суток
- 71
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
एक म्हातारा ऑपरेशन टेबलवर झोपला होता, खूपच मोठं ऑपरेशन होणार होत आणि ऑपरेशन त्याचाच डॉ. जावई करणार होता जेव्हा डॉ. जावई ऑपरेशन थिएटर मध्ये आला तेव्हा म्हाताऱ्याने खूपच प्रेमात त्याच्या जावयाचा हाथ पकडला आणि बोलला “बेटा मला माहित आहे कि तु मला काही होऊ देणार नाहीस ….”🤔 पण जर मला काही झालं तर तुझी सासू तुमच्या बरोबर राहील तिची काळजी घे… 😉 ऑपरेशन एकदम ओके झाले 🫣 😂🤣😂🤣😊
#हास्यकल्लोळ एका बाईचं घरातलं ए.सी. बिघडलं. तिनं मेकॅनिकला फोन केला. "मी सौ. जाधव बोलतेय… फ्लॅट नं. 1254, गंगा अपार्टमेंट, चिंचपोकळी. माझं नुकतंच लावलेलं ए.सी. चालत नाहीये. तुम्ही दुपारी, मी ऑफिसला गेल्यावर येऊन दुरुस्त करून जा. घर पूर्ण लॉक असेल, फक्त हॉल उघडा असेल. मुख्य दरवाज्याची किल्ली शेजारच्या कुंडी खाली ठेवलेली आहे. तुम्ही कुलूप उघडून हॉलमधला ए.सी. दुरुस्त करा. हॉलमध्ये एक डॉबरमॅन कुत्रा असेल, पण तो बांधलेला नसेल. भीऊ नका… तो ट्रेन केलेला कुत्रा आहे. तोवर काहीच करणार नाही जोवर आदेश दिला जात नाही. तिथं एका पिंजऱ्यात पोपट आहे. तो खूप बोलतो… पण त्याच्याशी एक शब्दही बोलायचं नाही! काम झाल्यावर हॉल लॉक करून किल्ली परत त्या कुंडीखाली ठेवायची. संध्याकाळी ऑफिसहून आल्यावर मी पैसे देईन. एकदा परत सांगतेय – पोपटाला एक शब्दही बोलायचं नाही, नाहीतर स्वतःच भोगाल…!" --- दुपारी मेकॅनिक हॉलमध्ये शिरला. सोफ्याजवळ खतरनाक डॉबरमॅन झोपला होता. तो बिचकला, पण कुत्र्याने त्याच्याकडे पाहिलं आणि परत डोळे मिटले. मेकॅनिक ए.सी. कडे गेला तर तो पोपट झाला ना सुरु 😃 "ए चोरा! काय करतोस रे?" दोन तास ए.सी. दुरुस्त करताना पोपट सतत ओरडत राहिला.. कधी "चोर" म्हणायचा.. कधी "बैल" म्हणायचा.. कधी गलिच्छ शिव्या द्यायचा! मेकॅनिक एवढा त्रासला की स्क्रुड्राइवरने त्याला टोचावं असं त्याला वाटलं. पण मॅडमची सूचना आठवून तो गप्प राहिला. काम संपल्यावर तो सामान गोळा करू लागला. पोपट पुन्हा चिडवायला लागला – "ए चोरा! काय चोरून नेलंस रे रेड्या…?" आता मेकॅनिकचा संयम सुटला! त्याला वाटलं – "मॅडम उगाच घाबरवत होती. पिंजऱ्यातला पोपट माझं काय बिघडवणार?" तो स्क्रूड्राइवर काढून पोपटाकडे गेला – "थांब रे हरामखोर … तुला आत्ता दाखवतो!" इतक्यात पोपट ओरडला – "छूऽऽ टॉमी, छूऽऽ! टॉमी, छूऽऽ छूऽऽ!!" आणि मग डॉबरमॅन असा झेपावला की मेकॅनिक थेट दरवाज्याकडे धावला! जिव वाचवून तो कसाबसा बाहेर पळाला… पण अजूनही तो धक्क्यात आहे!😄😄
без подписи
без подписи
काल रात्री नव्याने लग्न केलेल्या नवऱ्याने त्याच्या बायकोला विचारले... लग्नापूर्वी तुज्या आयुष्यात कोणी होते का? बायकोने बेडवरून खाली उतरून कपाटातून एक डबा काढला आणि नवऱ्याला दिला... त्या डब्यात ५० रुपयांची नोट आणि ७ तांदळाचे दाणे होती... नवऱ्याने म्हटलं, मला सांग हे काय आहेत...? बायको: जेव्हा जेव्हा मला एखादा मुलगा आवडायचा किंवा प्रेमात पडायचो, तेव्हा मी या डब्यात एक तांदूळ टाकायची... नवरा: अरे, म्हणजे तु ७ जणांच्या प्रेमात पडली होती...??? आणि हे ५० रुपये काय आहे..😮😮😮 बायको: १ आठवड्यापूर्वी १ किलो तांदूळ विकून मी हे ५० रुपये मिळवले आणि मी हे ७ शिल्लक तांदूळ विकू शकलो नाही....😁😁😁 नवरा हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला आहे आणि नर्स नर्सला सांगत आहे की १ किलो तांदळात किती तांदूळ आहेत....☹️
एकदा बायकोचं आणि माझं दळण आणणे या कामावरून वाजलं.. . चांगलीच खडाजंगी झाली. . आता माझा जन्म काय दळण आणण्यासाठी थोडीचं झालाय राव?. . पण शेवटी मी पडलो आपला *बिचारे नवरे संघटनेचा अध्यक्ष* . गपगुमान जावून दळण आणावे लागले....दळण घेऊन तर गेलो पण तिथे विचार करू लागलो..... . मनात म्हंटल अशी हार मानून चालणार नाही... . एवढ्या वेगवेगळ्या संघटनेचे आपण अध्यक्ष आणि असं कच खावून कसं चालेल.... . दळण सुरू असताना जरा आजूबाजूला नजर गेली आणि लगेच डोक्यात भन्नाट आयडिया आली.... . डोक्यात किडा वळवळायला लागला... अन चेहराच खुलला.... . प्रसन्न मनानं हसरा चेहरा घेऊन दळण घेऊन घरी गेलो...माझं हास्यवदन पाहून ती जरा गोंधळात पडली... मघाशी तणतणत गेलेलं शिंगरू असं हरणाच्या पाडसासारखं बागडत घरी आल्यावर तिच्या कपाळावर साडेबावीस आठ्या पडल्या.... काही दिवस गेले आणि मी मग स्वतःहून तिला विचारले, अरे पिठं संपलं नाही का अजून दळण कधी आणायचं? तिला वाटलं नवरा ताळ्यावर आला....डबा घेऊन मी दळण आणायला गेलो... . यावेळी मात्र जरा उत्साहाने गेलो... बायको बुचकळ्यात पडली...! . हाच उत्साह मी अजून एक दोन वेळा दाखवला... . पुन्हा काही दिवस गेले ....मी पुन्हा विचारलं.. दळण कधी आणायचं ?... . यावेळी दळणाला जाताना जरा छान ठेवणीतला शर्ट घालून गेलो...आता मात्र बायकोचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता... . नवरा खुशीत, उत्साहाने दळण आणतोय म्हणजे काय तरी भानगड असणार ....संशयाचे बी आपोआप पेरलं गेलं होतं.....त्यात आता मला दळण आणायला नेहमी पेक्षा जास्त उशीर होऊ लागला.... . आणखी पुढच्या वेळी जाताना मी मस्त छान आवरून, नीटनेटका भांग पाडून, जरा बऱ्यापैकी कपडे घालून, त्यावर स्प्रे वगैरे मारून दळण आणायला निघालो..... माझा हा तामझाम पाहून तिची विकेट पडली....! . काय हो, दळण आणायला कशाला एवढं आवरून जायला पाहिजे...काय एवढं आवरायचं कारण? . तसं तिला म्हणालो.. "अगं असं कसं... त्या दळणाच्या गिरणीपाशी किती किती जण येतात.... . तिथं दळणाची वाट पहात उभं असताना कोण कोण भेटतं... . काही गाठीभेटी होतात... . दळण आणायला आलेल्या गेलेल्या; आता सारखं जातोय म्हंटल्यावर ओळखीच्या झाल्यात.... . बिचाऱ्या दोन शब्द बोलतात... . मग असं सगळ्यांसमोर गबाळ जावून कसं चालेल... जरा नीटनेटकं नसावं का माणसाने...! . असं म्ह्णून मी आपला मस्त शीळ वाजवत दळण आणायला गेलो.... यावेळी मुद्दाम जास्त वेळ लावला.... . घरी आलो तर रागाच्या थर्मामीटर मधला पारा ग्लास तोडून थयथया नाचत होता...मी आपलं निरागसपणे दळणाचा डबा जागेवर ठेवला.... . पुन्हा काही दिवस गेले...मी पुन्हा विचारले . काय गं, ते दळण आणायला कधी जावू..? . तसं फणकाऱ्याने माझे कान तृप्त करणारे शब्द कानी पडले ! . काही गरज नाही दळण आणायची, मी माझे बघते काय कसे आणायचे ते....तुम्ही नका पुन्हा लक्ष घालू त्यात... . मी आपलं निरागसपणे बरं... म्हणून सटकलो.... . पहिला विश्वचषक जिंकल्यावर जो आनंद झाला नसेल त्याच्या दुप्पट आनंद झाला...! . बेडरूममध्ये जाऊन मी मुठी आकाशात झेपावत, चुपचाप आनंद साजरा केला.... . आता कित्येक वर्षे झाली, दळण काही मागे लागले नाही... - - प्रशांत कुलकर्णी
सरपंच्याच्या घरी एकदा 2 मित्र भेटायला आले,सरपंचानी बंदुक काढून हवेत 2 दा गोळीबार केला.💥💥 मित्र : काही चुकलं का सरपंच आमचं ??.🤗🤗 सरपंच : नाही रे मित्रा,चौकातल्या हॉटेलमधे 2 चहा सांगितले.🤣🤣🤣 🐅सरपंच्याचा नादच खुळा.🐅 😎😎😎 . . भाऊ,जोकं इथंच नाही संपला !!.😷😷 . . . . . . . . . . . चौकातल्या हॉटेल वाल्याने 4 तोफांचे बार काढले. 💥💥💥💥 मित्र : हे काय होतं सरपंचसाहेब ??.🤔🤔🤔 सरपंच (शर्मिंदा होऊन) : पहिल्यांदा आधीची उधारी जमा करा म्हणतोय हरामखोर !!.😏😏😏 . . . . भाऊ,जोक इथंबी नाही संपला !!.🙄🙄 . . . . . . . . . . . . . . . . नंतर सरपंच बंदुकीच्या 7 गोळया आणि 12 तोफांचे बार उडवतो !!.💢💢💢💢💢💢💢 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 मित्र पुन्हा विचारतो : हे काय होतं,सरपंच ??. . . . . . . . सरपंच म्हणतात,त्या हरामखोराला आठवण करून देत होतो की तुझा 7/12 माझ्याकडं गहाण आहे हे विसरलास का ??. . . . आणि 5 चं मिनिटात चहा सोबत भजी पण आली !!. 😜😜😜😂😂😂🤣 . आयुष्य फार सुंदर आहे फ़क्त ग्रामपंचायत ताब्यात आली पाहिजे !!. 😜😜😂😂😂😜
. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 शाळेतून परत येताना एका नातवाने आपल्या आजोबांना एक प्रश्न विचारला....* _*😢 'बायको' आणि 'गर्लफ्रेंड'*_ यांच्यात काय फरक आहे? आजोबांनी एक मिनिट विचार केला आणि स्पष्टीकरण सोप्या भाषेत असे दिले; ऐक बाळा: *बायको* म्हणजे *टीव्ही* आणि *गर्लफ्रेंड* म्हणजे *मोबाईल* घरी तू टीव्ही *पाहतोस*, पण बाहेर जाताना तू मोबाईल *घेऊन जातोस*. कधीकधी तू टीव्हीचा *आनंद घेतोस*, पण बहुतेक वेळा, तू मोबाईलशी *खेळतोस*. टीव्ही आयुष्यभर (जवळजवळ) *फुकट* असतो, पण मोबाईलसाठी, जर तू *पैसे* दिले नाहीस, तर सेवा *बंद* केली जाते. टीव्ही *मोठा, अवजड* आणि बहुतेक वेळा *जुना* असतो, पण मोबाईल *सुंदर, स्लिम, आकर्षक, बदलण्याजोगा* आणि *सहज घेऊन फिरण्याजोगा* असतो. टीव्हीचा चालवण्याचा खर्च सहसा *परवडण्यासारखा* असतो, पण मोबाईलचा खर्च सहसा *जास्त* आणि *मागण्या करणारा* असतो. टीव्हीला *रिमोट* असतो, पण मोबाईलला *नसतो*. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मोबाईल हे *दुहेरी संवादाचे* माध्यम आहे (तू बोलतोस आणि ऐकतोस), पण टीव्हीच्या बाबतीत, तुला *फक्त ऐकावेच लागते* (तुझी इच्छा असो वा नसो)! 😝 आणि शेवटचे पण महत्त्वाचे!!! तरीही टीव्हीच श्रेष्ठ आहेत कारण टीव्हीमध्ये *व्हायरस* नसतात, पण मोबाईलमध्ये बहुतेक वेळा *असतात* 😂 आणि मोबाईल सहज *हॅक* किंवा *चोरले* जाऊ शकतात. *काळजी घे* *फक्त टीव्हीवरच लक्ष ठेव* 😃😂😄😂 स्वतःहसा आणि इतरांना हसवा ….
एका माणसाला रस्त्यात १००/- रु ची नोट सापडते . ती घेऊन तो hotel मध्ये जाऊन जेवतो व इतर हि भरपूर खातो . रु ५००/- बिल होते . तो manager कडे जातो आणि सांगतो , माझे रु ५००/- बिल झाले आहे . पण माझाकडे एक पैसा पण नाही . manager भयंकर रागावतो व पोलीसाना फोन करतो . पोलीस येतात . त्याला ताब्यात घेऊन जातात . वाटेत तो पोलिसाना पटवतो आणि रु १०० देऊन टाकतो . पोलीस खुश होऊन त्याला सोडून देतात ! याला म्हणतात financial management without M B A !
लै हुशार 😅 मित्र:- कबुतरखाण्या बद्दल तुझ काय मत आहे?🧐 मी:- माझा तर आधी पासून विरोध आहे , खायचचं असेल तर चिकन मटण खा ना.. 🤤😌
*खबरदार चौथा पेग भराल तर !* 🥃 कुकरची तिसरी शिट्टी ऐकु येताच धावत जावुन काका गॅस बंद करून हॉलमध्ये आला. टिव्हीवर मालिका पाहत बसलेली त्याची बायको... काय केलंत तिकडे जाऊन? गॅस बंद केला. (बायको कूकर फुटल्यागत उसळली) कुणी सांगितलं तुम्हाला? का बंद केला गॅस? (चंद्याचाही आवाज चढला) अगं बाई, कूकरच्या तीन शिट्या झाल्या, तुझ्या सीरियल पाहण्यात व्यत्यय नको, म्हणून मी धावत जाऊन गॅस बंद केला तर तू माझ्यावरच ओरडतेस? तुला काही वाटतं की नाही ! व्वा रे व्वा ! मिस्टर, तीन पेग ऑलरेडी झालेत तुमचे, खबरदार चौथा🥃 पेग भराल तर ! त्याचा काय संबंध? महोदय, त्या शेजारणीच्या कुकरच्या शिट्या होत्या, आपल्या गॅसवर पातेल्यात भाजी शिजतेय... लक्षकुठंआहे तुमचं? 😜😜
*नवरा आणि गाढव* उतारवयातही बायकोची कटकट कमी होत नाही, म्हणून कंटाळून त्यानं गावात जाऊन राहायचं ठरवलं. जागा आधी घेऊन ठेवलेली होतीच. तिथे फार्म हाऊस बांधलं. छोटंसं शेत होतं, त्यात भाज्या लावल्या. एक गाय घेतली, एक गाढव घेतलं. एक कुत्रा पाळला. या सगळ्यांच्या साथीत त्याचा दिवस मजेत जायचा. पुन्हा शहरात यायचं नावही काढायचं नाही, हे त्यानं ठरवलं होतं. मात्र त्याचं नशीब त्याची पाठ सोडायला तयार नव्हतं. बायको तिथेही त्याच्या मागोमाग आलीच. दर रविवारी ती गावात यायची आणि त्याच्या डोक्याशी कटकट करायची. हे कुठे खबदाडात घर बांधून ठेवलंय, धड रस्तासुद्धा नाहीये गावात यायला, कशा वेंधळ्यासारख्या पसरून ठेवल्यायंत ह्या वस्तू, काय कपडे घातलेत हे? शोभतात तरी का तुम्हाला? हे गाढव कशाला घेतलंय आणि? काय उपयोग ह्याचा? एक ना दोन शहरात असताना तेच, आता गावात आल्यावर तेच, तो पार वैतागून गेला. इथेही सुटका नाही म्हणजे काय? पण काय करू शकणार होता बिचारा? बायकोला ह्या वयात सोडूही शकत नव्हता. गाढवावरून तर ती दरवेळी त्याचं डोकं खायची. एके दिवशी ती आली, तेव्हा त्यानंच तिला सांगितलं, तुला गाढव नको असेल, तर तूच त्याची विल्हेवाट लाव. बायकोला हेच हवं होतं. तिनं गाढवाला बाजारात नेऊन विकून टाकायचं ठरवलं. गाढवाला सोडण्यासाठी तिनं दोरीला हात लावला मात्र, त्यानं मागच्या मागे दोन लाथा मारल्या, तशी बायको कडमडली व भेलकांडत कुठेतरी जाऊन पडली. पाय फ्रॅक्चर झाला, हाताला खरचटलं, पाठही चेचली गेली. डॉक्टरांनी दोन महिने तरी घरातून बाहेर पडायचं नाही, असं सांगितलं. काळजीपोटी त्यानं तिला शहरातल्या घरातच राहायला सांगितलं, दिमतीला एक मदतनीस दिली ही दुर्दैवी घटना कळल्यावर जवळची मंडळी भेटायला आली. सगळ्यांनी वेगवेगळ्या वेळी येऊन त्रास देऊ नये, म्हणून त्यानं एकच वार ठरवून दिला होता. सगळे त्याच दिवशी आले. तो डोक्याला हात लावून बसला होता. काक्या, मावश्या, आत्या, शेजारणी, ओळखीच्या कुणीकुणी बायका येत, त्याच्यापाशी जात. त्याच्याशी हळू आवाजात काहीतरी बोलत. तो होकारार्थी मान हलवून प्रतिसाद देई. ओळखीचे काका, मामा, शेजारचे पुरुष, मित्र येत, त्याच्यापाशी जात. त्याच्याशी हळू आवाजात काहीतरी बोलत. तो नकारार्थी मान हलवे. त्याच्या एका मित्राची बायको लांबून हा प्रकार बघत होती. न राहवून तिनं आपल्या नवऱ्याला विचारलं, बायका जवळ येऊन काहीतरी बोलतायंत, तुमचा मित्र होकार देतोय. पुरुष जवळ आल्यावर नकार देतोय, ही काय भानगड? मित्र शांतपणे म्हणाला, बायका जवळ येऊन काळजी व्यक्त करतायंत. काही लागलं तर सांगा, काकूंनी आधीच गावाला जायला नको होतं वगैरे सांगताहेत. त्यांच्या गुणांचं वर्णन करताहेत, हा होकार देतोय. आणि पुरुष? हं...! एक दीर्घ उसासा टाकून मित्र म्हणाला, ते मित्र त्याचं गाढव दोन दिवस भाड्याने मागतायत ... 🥹🥹🫣🫣🥲🥲
एका महि;लेने तिच्या शेजारीणला विचारले: का तुला असा माणूस आवडेल ज्याचे सर्व केस सफेद आहेत, हेयर कलर करून-करून तो जवा’न दिसण्याचा प्रयत्न करतो तो माणूस ४ पावले चालला कि त्याचा जीव घाबर’तो.. कामावरून घरी येताच तो दा’रू पिणे सुरु करतो आणि जेवल्यावर काही न करता लगेच म्हाता’ऱ्या माणसासारखा झोपून जातो… सकाळी उठला कि अंघोळ करत नाही.. घाणे’रडा वास सोडतो.. १-१ तासच संडा’सात बसून राहतो…. शेजारीण: अरे बाप रे ! मला असा माणूस अजिबात आवडणार नाही… अश्या माणसाला कोण प्रे’म करणार.. शीईईई महिला: मग झ’क मारा’यला माझ्या नवऱ्याच्या माघे लागलीय…
उच्चभ्रू होण्यासाठी एकमेकांशी बोलायचे नसते.. मुंबईतून पुण्याला येताना मुलाने मला ब्ला ब्ला पद्धतीने कारमधून बुकिंग करून दिले.. गाडीत सहा प्रवासी.प्रत्येकाकडे लॅपटॉप. मी सुरुवातीला बसलो. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाकडे हसून बघितले..त्यातील तिघांनी नजरेला नजरच दिली नाही. एक दोन जण माफक हसले...गाडी सुरू झाली.कोणीच कोणाशी बोलेना.मग मीच शेजाऱ्याला कुठे असता विचारले. त्याने एका वाक्यात उत्तरे द्या..पद्धतीने उत्तर दिले.. मग माझ्या लक्षात आले की आपणही मोबाईलवर मौन साधना करणे अपेक्षित आहे...४ तासाचा प्रवास पण कोणीही कोणाशी बोलले नाही.... मला विमान प्रवास आठवला..तिथेही असेच असते. कितीही तासाचा प्रवास. सन्नाटा असतो..मी प्रथम दिल्लीला गेलो. पुढच्या सीटवर एकाकडे इंग्रजी पेपर होता.वाचून होऊन त्याने. ठेवून दिला होता. मी त्याला शुक शुक केले.त्याने लक्ष दिले नाही म्हणून त्याच्या खांद्याला आमच्या ग्रामीण पद्धतीने हात लावला..तर अंगावर विंचू पडावा तशी त्याची स्थिती झाली.विमानात कोणी आपल्या अंगाला हात लावू शकते याची त्याने कल्पनाही केली नव्हती..त्याने आदिमानवावाकडे बघावे तसे माझ्याकडे तुच्छतेने बघितले व मगच तो इंग्रजी पेपर दिला.. शहरातील ज्या सोसायट्या आहेत..तिथे बहुतेक ठिकाणी वर्षानुवर्षे लोक एकत्र राहून अनेक वर्षे बोलत नाहीत... आता काही सोसायटीत उत्सव साजरे होतात..बदल होतोय पण मुख्य ट्रेंड हाच असतो माझा मित्र राजेंद्र धारणकर ने एका सोसायटीत घर होते ते सोडले..अनुभव हाच.निघताना पार्किंगमध्ये एकजण पाठीमागे उभा होता.याला वाटले निरोप द्यायचा आला असेल म्हणून हा भाऊक होऊन जवळ गेला व म्हणाला काय म्हणताय ?..तेव्हा तो कोरडेपणाने म्हणाला की तुमची गाडी काढल्यावर तिथे माझी गाडी लावायची म्हणून थांबलोय... आता बोला थोडक्यात तुम्हाला उच्चभू व्हायचे असेल तर फारसे कोणाशी बोलू नका...ही एक तुच्छता आहे..किंवा अती स्वातंत्र्याची भावना आहे...मला कोणाची गरज नाही..मी स्वतंत्र आहे...आणि पुन्हा मी का बोलू..त्याला गरज असेल तर त्याने बोलावे..असे काहीतरी मनोविश्लेषण आहे..प्रवास थोडा वेळ आहे समजू शकतो पण एका इमारतीत राहून एकमेकाची नावेही माहीत नसतात...आमच्या ग्रामीण भागात कोणाकडे काय भाजी केली हे माहित असते..त्यामुळे ही तथाकथित उच्चभ्रू होण्याची प्रक्रिया काही केल्या मला उमजत नाही... हेरंब कुलकर्णी
किराणा मालाचे दुकान हे पर्यटन स्थळ 🏝️ ही असू शकते , याची डी मार्ट मध्ये गेल्यावर खात्री पटते ✅. नवरा 👨🦱, बायको 👩🦱, मुलं 👧🧒, बाळं 👶 असं अख्खं कुटुंब वाणसामान घ्यावयास आलेलं असतं. दीड-दोन वर्षापर्यंतची बाळं ट्रॉलीत 🛒 बसून मोबाईलवर 📱 व्हिडिओ बघत मस्त सैर करत असतात 😍. थोडी मोठी मुलं आईच्या मागे मागे 👩🦱 सगळ्या गोष्टी उचकत-पाचकत मस्त फिरत असतात 🙈. पॅकिंगच्या वस्तु 📦 ही ते उघडुन ठेवतात 🤭. तिथल्याच गाड्या 🚗 खेळतात, पेन ✏️, पेन्सिली 🖊️, वह्या 📓 वापरुन बघतात. अजून थोडी मोठी मुले वस्तू शोधायला मदत करतात 🔍. काही नवरे फक्त ट्रॉली ओढायला 🚶♂️ आलेले असतात किंवा फोनवर 📞 बोलायला. सासू-सासरे 👵👴 ही मस्त AC मध्ये ❄️ फिरून येऊ म्हणून मागे मागे येतात. तर, डी मार्टमुळे 🛒, वाण-सामानाची खरेदी हा कौटुंबिक जिव्हाळ्याचा ❤️ त्याचबरोबर, मासिक पर्यटनाचा 🏖️ अतिशय लाडका विषय बनलाय. किराणा मालाची यादी 📝 ज्यात, फक्त गहू 🌾, तांदूळ 🍚, डाळी-साळी 🥘, कडधान्ये 🫘 यांचा समावेश असायचा, आणि प्रत्येक जिन्नसा पुढे ५ किलो, १ कि., १/२ कि., १/४ कि. असे पावकी-निमकीही असायचे ⚖️. हा प्रकार आता पूर्णपणे आउटडेटेड 🕰️ होऊन जे दिसेल ते, एक-दोन, पाच किलोच्या कॅरीबॅगमध्ये 🛍️ जेवढे मावेल तेवढे आपण घेऊन येतो. याबरोबरच कितीतरी नको असलेल्या वस्तूही ❌ आपोआप घरी येतात 🏠. अचानक तिथे बघितल्यामुळे त्या वस्तूची फार गरज निर्माण होऊन 🤔 ती आपल्या घराचा सदस्यही बनते 🪑. कपडे 👗, भांडी 🍲, चपला 👡, क्रोकरी 🍽️ ही कधीतरी वर्षातून एकदा होणारी खरेदी ही आता दर महिन्याला केली जाते 📅. सेफ्टी पिन्स 📌, टाचणी पासून ते घरातले पंखे 🌀, पडदे 🪟 पर्यंतचे सारे सामान तुम्हाला येथे सारखे बघावयास मिळते 👀. इथला छान छान डिस्प्ले ✨ बघून घरातल्या चादरी जुन्या वाटायला लागतात 🛏️ आणि नवीन गालिचे 🧶, टॉवेल 🛁 असे उगाचच आपोआप घरी येते 🏡. सिझनल गोष्टींची तर वेगळीच कथा ☔❄️🎄. प्रत्येक सीझनला नवीन खरेदी 🛒. परत तीच छत्री ☂️, रेनकोट 🧥, टिफीन 🍱, सजावटीचे सामान 🎀 वापरता येते हे आपण विसरून, इथल्या भुलाव्याला भुलून 😅, नव्या कोऱ्या करकरीत गोष्टी ✨ घरी घेऊन येतोच. केव्हाही कोणत्याही दिवशी 🌞🌙 गेलात तरी, डी मार्टमध्ये कायम गर्दीच 👫👭👬 बघायला मिळते. ट्रॉल्या भरभरून सामान घेऊन जाणारी माणसं 🛒 बघितल्यावर प्रश्न पडतो की, 👉 खरंच महागाई वाढलीय 📈 की अनावश्यक, अवास्तव खरेदी? 🤷 --- ✍️ शुभदा अमृतकर
Messages in this channel will be automatically deleted after 1 month
Messages in this channel will be automatically deleted after 1 month
Messages in this channel will be automatically deleted after 1 month
गण्याला एका मुलीचा मेसेज आला😊😊 . . . मुलगी बोलली-Hi😘😘 गण्या- yes!😋😋 . मुलगी बोलली- How r u?? गण्या- Fine😍 . मुलगी बोलली- Where r u from? गण्या- Mumbai 😊😊 . मुलगी बोलली- तूझं शिक्षण किती झालं आहे??😜😜 गण्या- तुझ्या एवढं😝😝 . मुलगी बोलली-माझ्या एवढं म्हणजे?? 😞 गण्या- मी पण एवढंच इंग्लिश बोलून डायरेक्ट मराठीत सुरू होतो... 😂😂😂😜😜😜😜
बाळू घरातल्या अडचणींना वैतागून ज्योतिषाकडे जातो... . . ज्योतिषी काही वेळ बाळूचं निरीक्षण करून म्हणतो, "उद्या घराच्या अंगणातली माती घेऊन ये, मग सगळं सांगतो" . . . बाळू दुस-या दिवशी जातो. ज्योतिषी माती हातात घेऊन निरीक्षण करून सांगतो...... तुझ्या घराची मातीच सगळं सत्य बाहेर आणेल " तुझी दोन्ही मुलं तुझी न्हाईत. तुझ्या मुलीचं गावात एका मुलासोबत लफडं हाय, आणि तुझी बायको शेजा-यामुळे पोटूशी हाय....." . . . बाळू जोरजोरात हसायला लागतो.... . . ज्योतिषी विचारतो हसायला काय झालं? .. ..... बाळू म्हणतो.... "घरून येताना माती आणायची विसरलो...म्हणून तुमच्या अंगणातली माती घेऊन तुम्हांला दाखवली..... 😂😂😂😂😜🤣🤣🤣🤣🤣