मराठी लेखन - Marathi Lekhan✍️
Статистикаसोशल जगतात गाजलेले आणि नावाजलेले लेख एकाच चॅनेल वर.. जॉईन करा @MarathiLekhan ✍️ नवनवीन लेखन आणि साहित्य दररोज...
- Последний пост
- 16 июл.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 21
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
⚡️ Join Marathi Lifetime Membership ✅ ✔️Backup Channel💟 ✔️Marathi Paid 16th ✔️Photo Channel ✔️Old Video Channel ⚡️Join Now Lifetime Membership 🔥 Send Screenshot @paycontact OFFER TIME 🎉🎉✅❤️ Price 499 Rs 599 Rs
महिलांचे अंतर्वस्त्र - अमृता खंडेराव
महिलांची अंतर्वस्त्रे ©®अमृता खंडेराव. महिला मदत केंद्रात येणाऱ्या चार विद्यार्थिनींना यूरीनल इन्फेक्शन आढळले होते. त्यांचे रोजच भयंकर पोट दुखायचे. काही जणींना थेंब-थेंब लघवी व्हायची आणि सू करताना खूप आग व्हायची. लघवी साफ होत नसे. चांगल्या डॉक्टरकडे दाखवल्यानंतर मूत्रमार्गाच्या अस्वच्छतेमुळे हे आजार होतात असे लक्षात आले. पण याचा त्रास फार भयंकर असतो. मुली एकदम सुकल्यासारख्या राहतात. ग्रामीण भागात मुलींच्या लैंगिक आरोग्याबद्दल अत्यंत अनास्था आढळते. मधल्या काळात मी स्वतः माता-पालक आणि मुलींचे शिबिर घेऊन शी-शूची जागा रोजच्या रोज स्वच्छ करणे किती महत्त्वाचे आहे हे शिकविले होते. तुरटीच्या पाण्याने लघवीची जागा धुतली पाहिजे हे सांगितले होते. सगळ्या गोष्टी अगदी न लाजता व्यवस्थित स्पष्ट केल्या होत्या. छोट्या मुली बाथरूमला जातात तेव्हा त्यांची फाटलेली आणि अत्यंत मळलेली अंतर्वस्त्रे पाहिल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा झाला. ग्रामीण भागात आजही मुली आणि महिलांची अंतर्वस्त्रे उन्हात वाळवली जात नाहीत. धुणे धुऊन उरलेल्या पाण्यात कशीतरी पिळून कुठेतरी कोपऱ्यात टाकली जातात. मुलींची अंतर्वस्त्रे नेहमीच एखाद्या लुगड्याखाली किंवा कपड्याखाली लपवून वाळवली जातात. त्यामुळे ती दमट राहतात आणि इन्फेक्शन होण्याच्या शक्यता वाढतात. लघवीच्या जागी खाज येण्याचा आजार ग्रामीण भागातल्या अनेक महिला आणि मुलींना होताना दिसतो. त्याचे कारणही कदाचित हेच असावे. याबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. सकाळच्या वेळी आंघोळ करून आल्यावर नवरा रोज हक्काने आपल्या बायकोला त्याचे चड्डी-बनियन मागतो. परंतु एखादी बाई कपडे विसरून आंघोळीला गेली असेल तर मोठ्याने हाका मारून तसे मागू शकत नाही. ग्रामीण भागात अंतर्वस्त्रे आणि सॅनिटरी नॅपकिन ही चैन समजली जाते. बायकांची या गोष्टी घरात मागायची हिंमत होत नाही. त्यांना या गोष्टी चोरून खरेदी कराव्या लागतात. शहरी लोकांना या गोष्टी हास्यास्पद वाटतील पण या गोष्टी मी डोळ्याने पाहिल्या आहेत. अशिक्षित कुटुंबामध्ये तर फारच हाल असतात. ज्या स्त्रीच्या जननेंद्रियातून मनुष्यजातीचा जन्म होतो त्याबद्दल इतकी अनास्था का? त्या स्त्रीच्या अंतर्वस्त्रांचा इतका तिरस्कार का? तिचे जननेंद्रिय, पाळी आणि अंतर्वस्त्रे गलिच्छ का मानली जातात? शिव्या देण्यासाठी तिच्या इंद्रियाचा वापर का केला जातो? पुरुषाची अंतर्वस्त्रे बायका साबण लावून चोळून घासतात परंतु स्वतःची मात्र कशीही पिळून टाकतात. खरे तर स्त्रीचा अंतर्भाग जास्त गुंतागुंतीचा आणि मृदू आहे त्यामुळे तिने स्वतःच्या अंतर्वस्त्रांची जास्त काळजी घेतली पाहिजे. वरच्या कपड्यांना भरपूर साबण लावला जातो परंतु अंतर्वस्त्रांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. दरम्यान वर्गात येणाऱ्या सर्व मुलींसाठी चांगल्या दर्जाची अंतर्वस्त्रे आणि रुमाल आणले आहेत. हात धुतल्यानंतर त्या मळक्या कपड्याला पुसतात. महिला मदत केंद्रात आपण त्यांना, एखादे स्वच्छ कापड नॅपकिन किंवा रुमाल वापरायचे शिकवत आहोत. यापूर्वीही सर्व विद्यार्थिनींना सुती रुमालांचे वाटप केले होते. बाईच्या अंतर्वस्त्रांबद्दल समाजामध्ये एक विचित्र गंड आहे. तो दूर झाला पाहिजे. प्रत्येक मनुष्याच्या शरीराला सर्व अवयव असणे अपरिहार्य आहे आणि त्या सर्व अवयवांची आणि कपड्यांची स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे या गोष्टी शिकविण्याबरोबरच आपण महिला मदत केंद्रातर्फे सर्व विद्यार्थिनी आणि महिलांना अंतर्वस्त्राचे जोड वाटप करत आहोत. ©®अमृता खंडेराव.
без подписи
@MarathiLekhan
*माझं मानसशास्त्र - भाग १* _एकलकोंडेपणातून स्वतःची सुटका करा._ एकलकोंडेपणा ही फक्त एकटेपणाची भावना नसून मनात निर्माण होणारी खोल रिक्तता असते. माणूस लोकांमध्ये असतानाही कधी कधी आतून एकटा वाटू शकतो. ही भावना दीर्घकाळ टिकली तर आत्मविश्वास कमी होतो, नकारात्मक विचार वाढतात आणि मनावर ताण निर्माण होतो. म्हणून एकलकोंडेपणातून स्वतःची सुटका करणे महत्त्वाचे आहे. एकलकोंडेपणातून बाहेर पडण्याची सुरुवात स्वतःला समजून घेण्यापासून होते. आपल्या भावना, विचार आणि गरजा याकडे शांतपणे लक्ष देणे आवश्यक असते. स्वतःशी प्रामाणिक संवाद साधला की मन हलके होते आणि आत्मस्वीकृती वाढते. दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे लहान-लहान सामाजिक संपर्क वाढवणे. कुटुंबीयांशी, मित्रांशी किंवा ओळखीच्या लोकांशी साध्या गप्पा मारणेही मनाला आधार देते. एखादा छंद जोपासणे, पुस्तक वाचणे, व्यायाम करणे किंवा समाजातील उपक्रमात सहभागी होणे यामुळे मनाला नवे उद्दिष्ट मिळते. तिसरे म्हणजे स्वतःबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे. प्रत्येक माणसात काहीतरी चांगले असते. स्वतःच्या गुणांना ओळखणे आणि त्यांचा विकास करणे यामुळे आत्मविश्वास वाढतो. जेव्हा आपण स्वतःशी मैत्री करतो, तेव्हा इतरांशी जोडणेही सोपे होते. म्हणूनच, एकलकोंडेपणातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग म्हणजे स्वतःला स्वीकारणे, लोकांशी जोडणे आणि जीवनात अर्थपूर्ण कृती करणे. हा प्रवास हळूहळू घडतो, पण प्रत्येक छोटा प्रयत्न मनाला पुन्हा आनंद आणि समाधानाकडे नेतो. धन्यवाद. *@मिनल वरपे ©️®️* #InnerPeace #mypsychology #minalvarpe #आपलंमानसशास्त्र
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи
без подписи