🌹मराठी सुविचार, लेख आणि बरंच काही 🌹
Статистика🌠 मराठी भाषेमध्ये सुविचार, लेख आणि बरच काही 🌠 Admin : @HereIsAdmin
- Последний пост
- 11 июн. 2024 г.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
🌹मराठी सुविचार, लेख आणि बरंच काही 🌹 pinned «💫✨✨✨✨⚡️✨✨✨✨💫 🌺 *आजचा सुविचार* 🌺 💫✨✨✨✨⚡️✨✨✨✨💫 ════════════════════ अधिक मित्र हवे असतील, तर दुसऱ्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा ════════════════════ मित्र जास्त असणे हे एक लोकप्रियतेचे लक्षण आहे. आपण मित्रांमध्ये काही न काही चांगले गुण नक्कीच…»
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ काहीवेळेस नाती विसरून माणसाला कटू सत्य कठोरपणे आपल्याच जिव्हाळ्याच्या माणसांना अप्रिय शब्दात ऐकवावी लागतात. जीवन हे कर्तव्याची कठोर कास धरणाऱ्या माणसाच्या बाजूनेच खरा कौल देत असतं. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ स्वतःचा विकास करा, लक्षात ठेवा गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहे. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ तुमचे आयुष्यात काही ध्येय असेल, काहीतरी झक्कास असं करायचं असेल, लोकं तुम्हाला टोमणे मारत असतील, हसत असतील, नकारात्मक बोलून मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत असतील, आणि तुम्हाला या सर्व गोष्टींना थांबवायचे असेल तर तुमचे ध्येय, स्वप्न पूर्ण करूनच दाखविणे हा एकच पर्याय आहे. जर टिकेपासून वाचण्यासाठी सोपा मार्ग हवा असेल तर हे तीनच उपाय आहेत - 🎯 काहीही न करणे 🎯 काहीही न बोलणे 🎯 काहीही ध्येय न ठेवणे, जस चाललय त्यातच समाधान मानून जगणे. एक तर ध्येय, स्वप्न पूर्ण करा किंवा टिकेपासून वाचण्यासाठी सर्व ध्येय, स्वप्न ह्यांचा त्याग करा. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ तुमच्यातील विद्यार्थी नेहमीच जिवंत ठेवा, बदलत्या काळासोबत नवनवीन गोष्टी आत्मसात कराल तरच टिकाल. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच, सुख असो अथवा दुःख, आज असेल, उद्या नसेल, त्यामुळे चांगल्या काळात उन्मत्त होऊ नये, आणि, वाईट काळात खचू नये, आशा ठेऊन, हिंमत करून परिस्थिती बदलण्यासाठी मेहनत, प्रयत्न करून स्थिती बदलावी. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ ज्याच्याकडे स्वतःची बुद्धी वापरण्याचे आणि ठाम निर्णय घेण्याचे कौशल्य असतं ते कधीच दुसऱ्याच्या हातचं बाहुलं बनत नाही. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ "धैर्य" म्हणजे तुम्हाला कधीही भीती वाटणार नाही असे नाही, "धैर्य" म्हणजे तुम्हाला भीती वाटत असूनही तुम्ही कार्य तडीस नेण्याची धमक ठेवणे होय. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ तुमचा जीवनप्रवास कुणीही समजून घेणार नाही, ते ठीक आहे. पण, तुम्ही येथे आयुष्य जगण्याकरिता आहात, इतरांना समजविण्यासाठी नाही. कारण तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरीही लोकांना तुमच्याबद्दल पूर्वग्रहदूषित असतात तेच खरं मानून ते खुश असतात. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ जसजसे आपण मोठे होतो तसतसं आपल्याला कळायला लागतं की, फालतू, टुकार मित्रांच्या गर्दीपेक्षा मोजके १,२,३ मित्र असलेले कधीही बरं. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ ज्यांना उंच भरारी घ्यायची असते त्यांनी लहान लहान गोष्टींमध्ये अडकायचं नसते. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ कोण काय म्हणतंय यापेक्षा आपल्याला ते किती पटतंय हे सर्वात जास्त महत्वाचं असतं. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी समस्या आहेतच, त्यामुळे आपणच जगातील दुःखी, त्रस्त व्यक्ती आहोत असा विचार करत असाल तर तो मनातून काढून टाका. प्रत्येक गोष्ट योग्य वेळेत, योग्य त्या प्रयत्नांनी पूर्ण होणारच असतात. गरज हवी असते तर ती फक्त तुमच्या स्वतःवर असलेल्या विश्वासाची. प्रयत्न करत रहा, निराश/दुःखी झालात तर पुन्हा पेटून उठा, आणि कामाला सुरुवात करा, यश आपलेच आहे. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट एक सुंदर विचार करून करा. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ आयुष्यात अनेकदा चढ-उतार येत असतात. आपण खचतो, दुःख, निराशा, इ. नकारात्मक गोष्टींच्या विळख्यात अडकून जातो. तेव्हा पुस्तक वाचून, चित्रपट पाहून किंवा एखाद्या व्यक्तीला बघून आपल्याला प्रेरणा मिळते, मार्ग सापडतो. आपण ते अमलात आणायलाही सुरुवात करतो. पण काही सदाबहार नकारात्मक व्यक्ती ते मित्र-मैत्रिणी असतील किंवा परिवारातील सदस्य असतील त्यांच्या विचारशक्तीपलीकडंच आपण काही करत असतो. हे असे नकारात्मक लोक आपल्याला कळत-नकळत, जाणूनबुजून नकारात्मक बोलून जातात. आपण आणखी खचतो, भ्रमित होतो काय योग्य? काय अयोग्य? समस्या सुटण्याऐवजी आणखी वाढत जाते, त्यामुळे कालांतराने मानसिक, शारीरिक त्रासही होऊ लागतो. मग वेळ गेल्यावर काही अत्यंत वाईट की जे अपरिवर्तनीय (irreversible) आहे असं घडतं आणि आपल्या हातात काही उरत नाही. यावेळी आपण भयानक परिस्थितीत असतो, आपल्याला कळतं आपण आधी आपल्याला योग्य वाटलेला निर्णय घेतला असता तर आज ही स्थिती नसती. "केवळ लोक काय म्हणतील, कुणाला आवडेल किंवा नाही, कुणी आपल्या निर्णयामुळे दुखावल्या जाईल किंवा नाही." असे नानाविध विचार करून आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड चालवीत असतो. लोक फक्त सल्ले देऊ शकतात, पण वास्तविक परिस्थिती आपल्यालाच माहीत असते, लोकांना आपण कशातून जात आहोत हे कळणे सहज शक्य नसते. लोकांचा विचार केल्यामुळे खूप लोकांचे नुकसानच जास्त झालेले आहे. त्यामुळे, "काही निर्णय, काम, विचार करून तुमचं भलं होनार असेल, तुम्हाला मनापासून पटत असेल तर कुणाच्याही परवानगीची/ मान्यतेची वाट पाहू नका, बिनदास्त पुढे वाटचाल करा." आणि, कुणाला आपण प्रेरित करू शकत नसलो तर आपल्या बोलण्याने समोरील व्यक्ती खचून जाईल, निराश होईल असे न बोलण्याचा प्रयत्न तर आपण नक्कीच करू शकतो. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ आयुष्यात पुढे जाण्याकरीता एकच गुपित आहे, ते म्हणजे, "सुरुवात करणे" @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ जे लोक तुमच्यापाठीमागे बोलतात त्यांच्यावर बिलकुल लक्ष देऊ नका. याचा सरळ अर्थ हाच होतो की तुम्ही त्यांच्यापेक्षा दोन पाऊलं पुढे आहात. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ ज्याप्रमाणे समुद्रात कितीही साखर टाकली तरीही तो गोड बनत नाही, त्याप्रमाणेच स्वार्थी व्यक्तीला कितीही आपले बनविण्याचा प्रयत्न केला तरीही ती व्यक्ती आपली नाही होऊ शकत. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ मेहनत, चिकाटी, धैर्य नावाचे मित्र तुमच्या सोबतीला असतील, तर, अपयश नावाच्या शत्रूची भीती वाटत नाही. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃
🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃 ════════════════════ व्यक्तिमत्त्व सुंदर नसेल तर दिसण्याला काही अर्थ नसतो. कारण, सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असतो. @Marathi_Suvichar ════════════════════ 🍃🍂🍃🍂💫⚡️💫🍃🍂🍃🍂🍃