Think Maharashtra
Статистикаथिंक महाराष्ट्र डॉट कॉम www.thinkmaharashtra.com थिंक महाराष्ट्रच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा - https://youtube.com/user/thinkm2010
- Последний пост
- 23 нояб.
- Последнее чтение
- 13 авг.
- Постов за неделю
- 0
- Всего постов
- 20
- Тип
- открытый
- Язык
- mr
- В каталоге с
- 13 авг.
- 1/24сутки в ленте
- —
- 1/48двое суток
- —
- 1/72трое суток
- —
Оценка по просмотрам недавних постов: пост набирает почти всё за первые сутки.
Посты
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
‘आपलं वडगाव’ नावाचा एक दिवाळी अंक दोन वर्षे (2024 पासून) प्रसिद्ध होत आहे. त्याच्या 2025 सालच्या विशेष अंकाचे प्रकाशन मुंबईचे चित्रकार व चित्रपट दिग्दर्शक रघुवीर कुल यांच्या हस्ते छोटेखानी समारंभात झाले. कुल यांनी कागदी आवरणातून अंक बाहेर काढला व समोरच्या श्रोत्यांसमोर धरला. त्याच वेळी त्यांची स्वत:ची नजरही अंकाच्या मुखपृष्ठावरून गेली. त्यामुळे ते एकाच वेळी चपापले व अतिशय आनंदितही झाले. मावळ तालुक्यात एक भव्य कलादालन निर्माण केले जावे असा उच्चार समारंभात वेगवेगळ्या वक्त्यांकडून वारंवार होत होता. रघुवीर कुल यांनी त्यांच्या मनोदयास भरभरून पाठिंबा व्यक्त केला... संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/heritage-of-maval-taluka-in-special-issue-of-aapala-vadagaon/
हमीद सय्यद हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील भातकुडगावचे. छोट्या गावातून आलेला हा मुसलमान मुलगा वयाची चाळिशी ओलांडित असताना राष्ट्रीय भारूडकार होऊन गेला आहे. आकाशवाणी कलावंत तर तो आहेच. तो वारकरी सांप्रदायिक पारंपरिक भारुड सादर करून प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच हुकूमत गाजवू शकतो. त्याची ती ताकद हेरून त्याचा अनेकविध प्रचारकार्यात उपयोग मुख्यत: केंद्र व राज्य शासनाच्या आणि अन्य संस्थांकडून करून घेतला जातो. हमीद सय्यद यांच्या स्वरचित भारूडांमध्ये गायन, नृत्याभिनय व चटपटीत-उद्बोधक संवाद हे वैशिष्ट्य असते... संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/hamid-sayyad-muslim-divotee-sings-hindu-bhajans/
गंगाधर पानतावणे यांचे नाव दलित साहित्याचे प्रवर्तक म्हणून घेतले जाते. त्यांनी मुख्यत: दलित साहित्याच्या प्रसारासाठी ‘अस्मितादर्श’ हे नियतकालिक तब्बल पन्नास वर्षे चालवले आणि अनेक नवनवीन लेखकांना साहित्यक्षेत्रात मार्गदर्शन केले. त्यांच्या स्वत:च्या लेखनातून बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान आणि दलितांची पीडा यांचा स्पष्ट आविष्कार झालेला दिसतो. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा नागरी सन्मान 5 जानेवारी 2018 रोजी जाहीर करून गौरवले. त्यांनी पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अमेरिकेतील सॅन होजे येथे 2009 मध्ये भूषवले होते... संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/asmitadarsh-editor-gangadhar-pantawane/
महाड हे रायगड जिल्ह्याच्या उत्तरेला सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे. ते ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक महत्त्व असलेले सुसंस्कृत शहर म्हणून प्रसिद्ध आहे. गाव सामाजिक भान जागते ठेवणाऱ्या अनेक घटनांचे साक्षीदार आहे. महाडचे चवदार तळे, तेथील सत्याग्रह. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या तळ्याची निवड करावी यामागे रोचक इतिहास आहे. महाडच्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने 1874 मध्ये वाचनालय सुरू केले होते; ते पहिले वाचनालय. हे वाचनालय ‘पुस्तक साखळी योजना’ हा खास कार्यक्रम अनेक वर्षे चालवत आहे. त्या अंतर्गत वेगवेगळ्या शाळांना मेंबर करून घेतात... संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/mahad-library-aims-to-promote-reading-in-school-children/
महाड हे रायगड जिल्ह्याच्या उत्तरेला सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे. ते ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक महत्त्व असलेले सुसंस्कृत शहर म्हणून प्रसिद्ध आहे. गाव सामाजिक भान जागते ठेवणाऱ्या अनेक घटनांचे साक्षीदार आहे. महाडचे चवदार तळे, तेथील सत्याग्रह. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या तळ्याची निवड करावी यामागे रोचक इतिहास आहे. महाडच्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने 1874 मध्ये वाचनालय सुरू केले होते; ते पहिले वाचनालय. हे वाचनालय ‘पुस्तक साखळी योजना’ हा खास कार्यक्रम अनेक वर्षे चालवत आहे. त्या अंतर्गत वेगवेगळ्या शाळांना मेंबर करून घेतात... संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/mahad-library-aims-to-promote-reading-in-school-children/
रामनाथ थरवळ यांची ओळख ज्येष्ठ लेखक, कुशल संपादक आणि बालनाटककार अशी आहे. त्यांनी त्यांचे जीवन बालमनाच्या संवर्धनासाठी आणि बालनाट्याच्या समृद्धीसाठी समर्पित केले. त्यांना नाट्यविश्वात ‘महाराष्ट्राच्या बालनाट्याचे भीष्माचार्य’ म्हणून ओळखले जाते. रामनाथ यांना बालनाट्याच्या क्षेत्रात पहिली संधी सुलभा देशपांडे यांच्या सहकार्याने मिळाली. त्यांनी ‘कलाघर’ या संस्थेची स्थापना केली आणि तब्बल एकेचाळीस वर्षे त्या संस्थेचे संचालक म्हणून कार्य केले. त्यांचे नाट्यलेखन आत्मीयतेने भरलेले असून बालमनाशी थेट संवाद साधणारे आहे. त्यांना मुलांची भाषा समजते, म्हणूनच त्यांचे लेखन मुलांच्या भावविश्वाला भिडते. त्यांनी पन्नासहून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केले असून, अनेक कथा, कविता, नाटिका आणि संशोधनपर लेखनही केले आहे... संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/ramnath-tharwal-theatre-activist/
रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावाचा गमतीने उल्लेख ‘रतनगडाच्या पायथ्याशी वसले जे गाव ! पाच पाडे मिळून तयाला दिधले शहाबाज हे नाव !’ असा करतात. शहाबाज गावाला मंदिरांचे गाव म्हणावे इतकी विविध देवतांची मंदिरे तेथे आहेत. पण गावाचे वैशिष्ट्य आहे ती तेथील प्राथमिक शाळा. त्यामुळे गावाची शैक्षणिक प्रगती झपाट्याने होत गेली. त्या गावाला प्राथमिक शिक्षक पुरवणारा गाव अशी प्रसिद्धी लाभली होती. तेथील वाचन चळवळीला चालना देण्याचा विचार गावातील प्रतिष्ठित मंडळींनी केला आणि त्याबरोबर शहाबाज गाव शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले... संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/library-brings-shahabaj-enlightenment/
видео или голосовое, без подписи
ठाणे नगरी शिलाहार राजवटीतील बिंब राजाने राजधानीसाठी निवडली, तो काळ साधारणतः नवव्या शतकातील होय. त्या काळात विविध पाखाड्यांमध्ये शिवमंदिरे; तसेच, स्थानिक ग्रामदेवतांची साठाहून अधिक मंदिरे बांधली गेली आणि मंदिरांच्या परिसरात तितकेच तलाव खणण्यात आले. ठाणे शहराची संस्कृती बहरली नि विसावली ती त्या नितांतसुंदर तलावांच्या कुशीत. त्यामुळे ठाणे नगर हे सुजलाम सुफलाम झाले आणि ठाणे हे नंतरच्या काळात तलावांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले ! मात्र, ठाणे शहराची ती ओळख पुसट होत गेली आहे. ठाणे शिलाहार राजसत्तेची राजधानी तेराव्या शतकापर्यंत होती. शिलाहार काळातील लोक शिवोपासक असल्याने मोठमोठे तलाव आणि त्यांच्या काठावर शिवमंदिरे असा सिलसिला घडून आला... संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/lake-city-thane/
ज्योती शेट्ये या डोंबिवलीच्या कार्यकर्त्या जम्मू राज्यात जानेवारी 2022 पासून काम करत आहेत. त्या प्रथम ईशान्य राज्ये, नंतर अंदमान व आता गेली तीन वर्षे जम्मू या भागांत स्थानिक मुलांना शिकवण्यात मदत करत असतात. त्यांचा जम्मूचा मुक्काम अतिरेक्यांच्या सततच्या दडपणामुळे अस्वस्थ व असुरक्षित असतो. यावर्षी तर विशेषच. तशात पहलगाम घडले आणि त्यांना तो प्रदेश सोडून परत यावे लागले. त्यांनी त्या परतवारीची हकिगत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’साठी लिहिली आहे. या वर्षीच्या दिवाळीच्या प्रकाशामधील अंधार वाचकांना कसली कसली याद देत राहील ... संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/jyoti-shetyes-travel-in-j-and-k-under-terrorists-threat/
दीपक आपटे यांचे नाव महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात फारसे परिचित नाही; परंतु ते सागरी जीवशास्त्राच्या क्षेत्रात सन्मानाने घेतले जाते. त्यांची व्यावसायिक वाटचालही वेगळीच आणि प्रेरणादायी आहे. त्यांचे क्षेत्र निसर्गाचा अभ्यास, पर्यावरणविषयक शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन हे होय. ते ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस) या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त मुंबईच्या संस्थेचे संचालक होते. त्यांनी ती संस्था 2021 मध्ये सोडली आणि पर्यावरणीय उपाययोजनेसाठी ‘सृष्टी कंझरव्हेशन फाउंडेशन’ची स्थापना केली. त्याचबरोबर, ते सध्या पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अॅडव्हान्स रिसर्च सेंटरचे संचालक आहेत... संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/deepak-aptes-contribution-to-marine-biology/
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
видео или голосовое, без подписи
दुर्गा खोटे यांच्यावरील स्वतंत्र वेबसाइटचे प्रकाशन ‘महाभूषण वेबसाइट’ मालिकेत अलिकडेच ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे करण्यात आले. त्या भारतीय चित्रपटसृष्टीतील आद्य अभिनेत्रींपैकी एक. त्यांनी मूकपटांपासून बोलपटांपर्यंत सहा दशकांचा अभिनयप्रवास गाजवला. त्यांनी ‘अयोध्येचा राजा’ मधील तारामतीपासून ‘मुघल-ए-आझम’ मधील जोधाबाईपर्यंत अनेक भूमिका अजरामर केल्या. त्यांनी स्त्रियांसाठी चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले केले. त्यांनी मराठी रंगभूमी, माहितीपट, दूरदर्शन निर्मिती आणि आत्मचरित्र लेखन अशा विविध क्षेत्रांतही ठसा उमटवला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमधील सहभाग हे त्यांच्या गौरवाचे शिखर. दुर्गा खोटे म्हणजे दृढनिश्चय, कलात्मकता आणि सामाजिक परिवर्तनाचा साक्षात इतिहास... संपूर्ण लेख - https://thinkmaharashtra.com/दुर्गा-खोटे-सहा-दशकांचा-अ/